इतिहास आणि कालसंकल्पना स्वाध्याय
इतिहास आणि कालसंकल्पना स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) आपण वापरतो ती दिनदर्शिका ………………. वर आधारलेली असते.
उत्तर :
आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवीसना वर आधारलेली असते.
आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला ………………. असे म्हटले जाते.
उत्तर :
इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते.
2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो ?
उत्तर :
कालमापन करण्यासाठी कर्ब 14 आणि काष्ठवलय या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो.
आ) इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो ?
उत्तर :
इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ ‘इ.स. 1-100’ असा लिहिला जातो.
3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय ?
उत्तर :
काळाची विभागणी आपण वार – आठवडा – पंधरवडा – महिना – वर्ष अशी क्रमवार करतो. शंभर वर्षांचा काळ म्हणजे शतक, तर हजार वर्षे संपली की एक सहस्त्रक पूर्ण होते, काळाच्या अशा विभागणीला एकरेखीक विभागणी असे म्हणतात.
आ) कालगणना करण्याची एकके कोणती ?
उत्तर :
सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्त्रक
4. पुढील तक्ता पूर्ण करा.
उत्तर :