आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सहावी

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सहावी

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा ?

अ. पोलीस नियंत्रण कक्ष

उत्तर :

100

आ. अग्निशामक यंत्रणा

उत्तर :

101

इ. रुग्णवाहिका

उत्तर :

102

ई. देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर

उउत्तर :

108/112

2. तात्काळ काय उपाय कराल ?

अ. कुत्रा चावला

उत्तर :

i) जखम निर्जतुक द्रावणाने अथवा पोटॅशिअम परमॅगनेटच्या पाण्याने धुवावी.

ii) जखमेवर कोरडे कापड ठेवावे.

iii) डॉक्टरी इलाज करावे. अँटीरेबीजचे इंजेक्शन घ्यावे.

आ. खरचटले / रक्तस्त्राव

उत्तर :

i) रक्तस्त्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा व तो ह्रदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा.

ii) जंतुनाशक मलम लावावे.

iii) जखम जास्त असल्यास डॉक्टरांकडे न्यावे.

इ. भाजणे / पोळणे

उत्तर :

i) जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा.

ii) पिण्यास पाणी द्या.

iii) निर्जतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या.

iv) तेलकट मलम लावू नका. जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका.आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सहावी

ई. सर्पदंश

उत्तर :

i) जखम पाण्याने धुवावी

ii) बाधितास धीर द्यावा.

iii) दश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

उ. उष्माघात

उत्तर :

i) रुग्णास सावलीत, थंड ठिकाणी न्यावे.

ii) शरीर थंड पाण्याने पुसावे. मानेवर थंड भिजवलेले कापड ठेवावे.

iii) पिण्यास भरपूर पाणी, सरबतासारखी पेये द्यावी.

iv) उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असेल तर मान एका बाजूस करून पोटावर उताणे झोपवावे. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा दवाखान्यात हलवावे.

3. असे का घडते ?

अ. महापूर

उत्तर :

i) महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे.

ii) अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते, तेव्हा पुराचे संकट ओढवते.

iii) बेसुमार पाऊस झाला, की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तंबुतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते.

आ. जंगलांना आग

उत्तर :

i) वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो.

ii) निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलाला आग लावू शकते.

इ. इमारत कोसळणे / दरडी कोसळणे

उत्तर :

i) बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. विजांचे कोसळणे, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशांत लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता. इमारती बांधण्यात वापरण्यात आलेला खालच्या दर्जाचे मटेरिअल.

ii) ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या, डोंगर खचतात आणि खाली येतात.

ई. वादळ

उत्तर :

हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात.

उ. भूकंप

उत्तर :

i) भुगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात.

ii) भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत.

4. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ. आपत्ती म्हणजे काय ?

उत्तर :

अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.

आ. आपत्तीचे प्रकार कोणते ?

उत्तर :

आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे मुख्य दोन प्रकार आहेत.

इ. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?

उत्तर :

आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळविणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.

ई. आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते ?

उत्तर :

आपत्कालीन नियोजन आणि व्यवस्थापन असे आपत्ती व्यवस्थापनाचे दोन मुख्य घटक आहेत.

5. सर्पमित्र कसे काम करतात ?

उत्तर :

i) साप दिसताच त्याचा जीव घेऊनच लोक शांत होतात. मात्र प्रत्येक साप हा विषारी नसतो. म्हणून साप पकडून त्यांना जीवनदान देण्यासाठी धडपडणारे व त्यांना जंगलात सोडून देणारे म्हणजे सर्पमित्र.

ii) सापांचे रक्षण करणे, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य.

iii) प्रत्यक्षात सापांच्या थोड्याच जाती विषारी आहेत. अशी माहिती ते लोकांना देतात.

iv) नागपंचमीच्या सणात सापांवर अत्याचार होत असतील तर ते सापांची गारुड्यांपासून सुटका करतात.

6. प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते, त्याची माहिती घ्या.

उत्तर :

प्रथमोपचार पेटीत असणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहेत.

निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या, जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी, चिकटपट्टी, त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेजेस, औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस, छोटी विजेरी (टॉर्च), कैची, रबराचे हातमोजे, छोटा चिमटा, सुई, स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे, अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन), थर्मामीटर, पेट्रोलियम जेली, निरनिराळ्या आकाराच्या सेप्टी पिना, साबण इत्यादी.

7. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा.

उत्तर :

आपत्ती उपाययोजना
आगi) आग लागल्यास सर्वप्रथम 101 या नंबर वर अग्निशामक यंत्रणेला फोन करावा.
ii) लागलीच 100 या नंबरवर फोन करून पोलिसांना आग लागल्याची माहिती द्यावी.
iii) आग विझविण्यास आपल्याकडून जितकी मदत करता येईल तितकी मदत करावी.
इमारत कोसळणेi) पोलिसांना व अग्निशामक दलाला घटनेची त्वरित माहिती देणे.
ii) नागरिकांच्या मदतीने इमारतीच्या मलम्याखालीदबलेल्या लोकांना काढण्याचे प्रयत्न करावे.
iii) जखमी लोकांना त्वरित प्रथमोपचार द्यावा.
iv) गंभीर लोकांना इस्पितळात नेण्याची व्यवस्था करावी.
अपघातi) अपघात झालेल्या ठिकाणी गर्दी न करता अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.
ii) घटनेची माहिती पोलिसांना द्यावी.
पूरi) नदी किनाऱ्यावरील राहणाऱ्या व्यक्तींना व प्राण्यांना पूर स्थिती निर्माण होण्याच्या अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवावे.
ii) हवामान खात्याच्या बातम्या लक्षपूर्वक ऐकाव्या व त्याप्रमाणे योजना आखाव्या आणि अमलात आणाव्या.
iii) उंचावर उभे राहावे आणि वाहत्या पाण्यात उतरू नये.
युद्धेi) युद्धे ही सीमाप्रांत भागात होत असतात. परंतु त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले जाते. अशावेळी अफवांना बळी पडू नये.
ii) पोलिस यंत्रणा जे सांगत असेल ते लक्षपूर्वक ऐकावे व त्यांचे पालन करावे.
बॉबस्फोटi) बॉबस्फोट झालेल्या ठिकाणी जखमी लोकांना मदत करावी.
ii) संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तींविषयी पोलिसांना कळवावे.
iii) कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नये.
iv) गर्दीचे ठिकाण जसे – रेल्वेस्टेशन, बसस्टॉप, मोठेमोठे मॉल्स्, विमानतळ, मार्केटचे ठिकाण इत्यादी ठिकाणी बॉबस्फोटची घटना घडू शकते. अशा ठिकाणी सतर्क राहावे.
भूकंपi) भूकंप ही नैसर्गिक घटना आहे. भूकंपग्रस्त भागात जमेल तितकी मदत करावी. अन्न, वस्त्र, निवारा या आवश्यक बाबींची मदत करावी.
महापूरi) महापूरच्या वेळी नदीकाठच्या परिसरातील लोकांना अन्यत्र सुरक्षित जागी आसरा द्यावा. शक्यतोवर उंचावर थांबावे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये.
वादळi) समुद्रकिनाऱ्यावरील लोकांना वादळाचे दुष्परिणाम भोगावे लागते. म्हणून त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे. कारण वादळाची हवामान खात्याकडून आधीच माहिती दिली जाते.
ii) वादळ उठल्यावर बाहेर जावू नये. कारण अशावेळी झाडे उन्मळून पडतात. अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
त्सुनामीत्सुनामीच्या आगामी सूचना मिळाल्यास समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी तसेच बेटांवरील लोकांनी ती जागा सोडून दूर जावे.
दुष्काळदुष्काळग्रस्तांना शक्य तेवढी मदत करावी. अन्नाची पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची मदत पुरवावी.
दरडढगफुडी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात. टेकड्या, डोंगर खचतात आणि खाली येतात. अशावेळी आश्रयासाठी डोंगरपायथ्याशी राहणाऱ्यांनी ती जागा सोडून द्यावी.

Leave a Comment