नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय

नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय

नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. आकृती पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 2. ‘नातं’ या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा.

उत्तर :

जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच ‘नातं’ नावाची माळ लेऊन येतो. त्या माळेत ‘नातं’ नामक मोती गुंफलेले असतात. नात्यांची वीण प्रत्येकाभोवती न कळत विणली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी स्वकीय होते तर कधी परक्याप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असोत, त्यात स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच !

माणूस जन्माला येतो तोच कुणाची तरी मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, नातू इत्यादी नातं घेऊनचं. नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती नात्याच्या विणीला समृध्द व सुंदर करतात. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम व धारदारही असते. ही बहुरंगी बीण नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी आणते, तर कधी त्या आठवणीसह ह्रदयात ती नाती कायमची जपून ठेवते.

प्रश्न. 3. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा.

अ) ‘पारितोषिक आणि शिक्षा’ या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते.

उत्तर :

आई कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालते.

आ) जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते.

उत्तर :

मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो.

प्रश्न. 4. वर्गीकरण करा.

उत्तर :

प्रश्न. 5. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास

उत्तर :

तारुण्यातील नात्याचा प्रवास वार्धक्यातील नात्याचा प्रवास
1) तारुण्यात मुलाची झेप सातासमुद्रापलीकडे जायला लागते.
2) तारुण्यात निखळ नात्याचा विचार येत नाही.
1) वार्धक्यात यामुळे दु:खी होऊन आईवडील पोरके होतात.
2) वार्धक्यात मागे वळून पाहताना आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मानअपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो.

प्रश्न. 6. स्वमत

अ) माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर :

i) माणसाच्या जडणघडणीत आई या नात्याचं महत्त्व – प्रत्येक आई मुलाला घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखते तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालते. जिजामातेने शिवाजीमहाराजांना याच पद्धतीने घडवले.

ii) बापाचे महत्त्व – मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप सतत प्रयत्न करीत असतो. कंसमामाच्या हातून श्रीकृष्णाचा वध होऊ नये म्हणून वासुदेव या पित्याने त्याला गोकुळात नेले.

iii) मित्राचे महत्त्व – हे नातं अतिशय तरल आहे. मैत्रीच्या नात्यानेच पावनखिंडीत स्वतःचे प्राण देऊन बाजीप्रभूंनी शिवाजीचे प्राण वाचवले.

iv) गुरूचे महत्त्व – गुरू हितचिंतक व मार्गदर्शक असतो. गुरूने दिलेला मंत्र पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करावी ते शिकवतो. म्हणूनच सर्व विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय गुरूंना देत असतात. याचाच अर्थ माणसाच्या जडणघडणीत नात्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आ) तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव काय ? मैत्रीचं नाते तुम्ही कसे निभवता ते सविस्तर लिहा.

उत्तर :

माझ्या सर्वात जवळच्या मित्राचे नाव ऋषिकेश आहे. त्याच गणित कच्चे होते. मी त्याला गणित शिकवले. आता तो गणितातील हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. माल पाण्यात पोहण्याची भीती वाटायची. त्याने माझी ती भीती पर घालवली. कुठे काही घडले की आम्ही दोघंही एकदमच धावून जातो त्याच्या घरचे लोक मला व माझ्या घरचे लोक त्याला सारखेच मानून जबाबदारीची कामे सांगतात. त्यानेच माझ्या आईला मी घरी नसताना दवाखान्यात नेले होते. सख्खा भावापेक्षाही आमचं नातं श्रीकृष्ण-अर्जूनासारखं अतूट आहे.

1 thought on “नात्यांची घट्ट वीण स्वाध्याय”

  1. तुम्ही आणखी छोटे उत्तर लिहत जा जेणेकरून आम्ही लवकर लवकर लिहू शकतो

    Reply

Leave a Comment