श्रावणमास स्वाध्याय

श्रावणमास स्वाध्याय

श्रावणमास स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.

प्रसंग काय घडते
1) पहिला पाऊस आल्यावर
2) सरीवर सरी कोसळल्यावर

उत्तर :

प्रसंग काय घडते
1) पहिला पाऊस आल्यावर पहिला पाऊस आल्यावर वैशाखात वाढलेला प्रचंड दाह शांत होतो. लोकांना हायसे वाटते. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहतात. पहिल्या पावसाने त्यांची मने फुलून येतात. लहान मुले पावसात आनंदाने भिजतात व नाचतात. धरणीमाता ही शांत होते. पहिला पाऊस आषाढ महिन्यात येत असतो. श्रावण महिन्यात नव्हे.
2) सरीवर सरी कोसळल्यावर हेही दृश्य आषाढ महिन्यातच पाहायला मिळते. सरीवर सरी कोसळतात. रस्त्यावर नदीसारखे पाणी वाहू लागते. लहान लहान मुले त्या पाण्यात कागदांच्या होड्या सोडतात. त्या सरींमध्ये पक्षी भिजून जातात. ह्या सरी जर रात्रभर कोसळल्या तर नद्या नाल्यांना पूर येतात.

प्रश्न. 2. निरीक्षण करा व लिहा.

उत्तर :

प्रश्न. 3. खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 4. ‘सुंदर बाला या फुलमाला’ या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.

उत्तर :

i) श्रावणमासी हर्ष मानसी

ii) क्षणात येती सरसर शिरवे

iii) सुंदर हरिणी हिरव्या कुरणी

प्रश्न. 5. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा.

अ) क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते.

उत्तर :

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

आ) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.

उत्तर :

तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.

इ) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.

उत्तर :

सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.

प्रश्न. 6. कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

उत्तर :

आषाढ महिन्यात भरपूर पाऊस आलेला असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात सृष्टी हिरवी हिरवी झालेली असते. झाडे हिरवी दिसतात. गवत तर हिरवे हिरवे गार मखमलीचे गालिचेच वाटतात. त्यामुळे मनात खूप आनंद दाटून येतो. त्यातच इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारा असा ऊन – पावसाचा खेळ श्रावण महिना खेळत असतो. छान ऊन पडलेले असते तोच एकाएकी पावसाचे शिरवे येतात. आता पाऊस चांगलाच बरसणार असे वाटू लागतातच पाऊस अदृश्य होतो आणि चक्क ऊन पडते. हा खेळ मानला मोठा आल्हाददायक वाटतो. ज्याच्यावर प्रेम करावं असा हा श्रावण आनंददायी महिना आहे.

खेळूया शब्दांशी

खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

उत्तर :

खेळ खेळूया

खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे – उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरायच्या आहेत.

उत्तर :

लिहिते होऊया

श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

वैशाख उन्हाळ्यात तर श्रावण पावसाळ्यात येतो. वैशाखात प्रचंड गरमी असते. सूर्य लवकर उगवतो व उशिरा मावळतो. दिवस मोठा व रात्र लहान असते. आकाश निरभ्र असत. हवा कोरडी असते. वैशाखात पाऊस येत नाही. पावसाचे शिरवेही येत नाहीत. नदी, नाले, तलाव कोरडे पडतात. शिरवे येत नसल्यामुळे इंद्रधनुष्य दिसत नाही. झाडे व गवत सुकलेली असतात.

श्रावणात मात्र चोहिकडे हिरवळच हिरवळ पसरलेली असते. गवत म्हणजे मखमलीचे हिरवेहिरवे गार गालिचे वाटतात. आकाशातून अचानक शिरवे पडतात आणि लगेचच ऊनही पडते. हवेत आर्द्रता असते. नदी, नाले, तलाव पाण्यानी भरलेले असतात. आकाशात कितीदा तरी इंद्रधनुष्य पाहायला मिळते.

चला संवाद लिहूया.

पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा.

उत्तर :

पाऊस : मी खरा समाजसेवक आहे. लोक माझी आतुरतेनं वाट पाहतात. तू काय आहेस ?

छत्री : मी पण समाजसेवक आहे. लोकांना तू भिजवतोस, त्यापासून मी त्यांना वाचवतो.

पाऊस : माझ्यामुळं शेतं पिकतात. तू ?

छत्री : माझ्यामुळं ते निरोगी राहतात ?

पाऊस : कसे ?

छत्री : वेड्या, एकानं मला जवळ घेतलं नव्हतं. तो ऊन लागून मेला.

पाऊस : माझी लोकांना शेतीसाठी, पाणी पिण्यासाठी गरज असते.

छत्री : माझी त्यांना सावलीसाठी गरज असते.

पाऊस : खरं आहे. आपण दोघंही लोकांचे हितकर्ते आहोत.

Leave a Comment