पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय
पृथ्वीचे अंतरंग स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल
प्रश्न. 1. अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.
1) भूकवचाचे हे दोन थर आहेत.
i) बाह्य व अंतर कवच
ii) खंडीय व महासागरीय कवच ✓
iii) भूपृष्ठ व महासागरीय कवच
iv) प्रावरण व गाभा
2) प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामाईक असतो.
i) सिलिका
ii) मॅग्नेशिअम ✓
iii) अँल्युमिनिअम
iv) लोह
3) पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्य आढळतात ?
i) लोह-मॅग्नेशिअम
ii) मॅग्नेशिअम-निकेल
iii) अँल्युमिनिअम-लोह
iv) लोह-निकेल ✓
4) अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे ?
i) वायुरूप
ii) घनरूप ✓
iii) द्रवरूप
iv) अर्ध घनरूप
5) बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे ?
i) लोह ✓
ii) सोने
iii) हायड्रोजन
iv) ऑक्सिजन
6) आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात ?
i) प्रावरण
ii) गाभा
iii) भूकवच ✓
iv) खंडीय कवच
7) कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात ?
i) प्राथमिक लहरी ✓
ii) द्वितीय लहरी
iii) पृष्ठीय लहरी
iv) सागरी लहरी
प्रश्न. 2. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त नाही.
1) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थाची घनता सारखी नाही.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
2) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभ्यात लोह व निकेल या मूलद्रव्याचे प्रमाण जास्त आहे.
3) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
4) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
खंडीय कवच हे सिलिका व अँल्युमिनिअम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे.
प्रश्न. 3. उत्तरे लिहा.
1) भूकवचाचे दोन भाग कोणते ? त्यांच्या वर्गीकरण आधार काय ?
उत्तर :
भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे दोन भाग आहेत. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या वर्गीकरणाचा आधार पुढीलप्रमाणे आहे.
i) पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते.
ii) भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणी खाली 40 किमीपेक्षा जास्त असते. तर सागर पृष्ठखाली ती 10 किमीपेक्षा कमी आढळते.
2) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात ?
उत्तर :
i) भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व भिन्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात.
ii) उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळते. ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात.
3) पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा.
उत्तर :
पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, हे पुढीलप्रमाणे स्पष्ट होते.
i) बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते.
ii) या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भू-जनित्र असेही संबोधले जाते.
iii) पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भू-चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते.
iv) पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे पाचवे व महत्त्वाचे आवरण आहे.
प्रश्न. 4. सुबक आकृत्या काढून नावे द्या.
1) पृथ्वीच्या अंतरंगाची सुबक आकृती काढून नावे लिहा.
उत्तर :
2) चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त
उत्तर :
प्रश्न. 5. भौगोलिक कारणे लिहा.
1) पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात.
उत्तर :
कारण – i) भूकवच (शिलावरण) व प्रावरण यांच्या दरम्यानच्या थराला मोहो विलगता म्हणतात.
ii) प्रावरण व गाभा यांच्या दरम्यान थराला गुटेनबर्ग विलगता (खंडित्व) म्हणतात. यावरून हे सिद्ध होते की पृथ्वीच्या अंतरंगाचा विलगता आढळतात.
2) मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे.
उत्तर :
कारण – i) भूकवचाच्या वरचा थर हा खंडीय कवचाचा आहे. या थरातील खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अँल्युमिनिअमचे प्रमाण अधिक आढळते. ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात. यांचा सियाल असा उल्लेख केला जातो.
ii) भूकवचाच्या खालील थरास महासागरीय कवच आहे. या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशिअमच्या संयुगाने बनलेले आहेत. हा थर खंडीय कवचापेक्षा जड असतो. याचा सायमा असा उल्लेख केला जातो.
iii) प्रावरण लोह-मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने तयार झाले आहे.
iv) गाभा हा थर प्रावरणाखाली असून या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने लोह व निकेल या खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या भागाचा निफे असा ही उल्लेख केला जातो.
3) प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.
उत्तर :
कारण – i) प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन पविभाग केले जातात. उच्च प्रावरण जास्त प्रवाही असून याच भागात शिलारस कोठी आढळते.
ii) ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो.
iii) भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागातच आढळतात.
iv) प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. म्हणून प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्रे आहे, हे सिद्ध होते.
4) भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
उत्तर :
कारण – i) भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणींखाली 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागरपृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी आढळते.
ii) भूपृष्ठ व सागरपृष्ठ हे भूकवचाचेच दोन उपविभाग आहेत. भूपृष्ठीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किमी आहे. तर सागरीय पृष्ठाची या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किमी आहे. यावरून हे स्पष्ट होते की भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.
5) चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.
उत्तर :
कारण – i) पृथ्वीच्या परिवलनामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते.
ii) पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भू-चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. अशाप्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे सरंक्षण होते.