मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय
मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. माझे सोबती कोण-कोण आहेत ?
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) स्टेनलेस स्टील 2) चांदी 3) भाजणीचे दळण 4) मीठ 5) कोळसा 6) हायड्रोजन | अ) अधातू आ) संयुग इ) मिश्रण ई) मूलद्रव्य उ) संमिश्र ऊ) धातू |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) स्टेनलेस स्टील 2) चांदी 3) भाजणीचे दळण 4) मीठ 5) कोळसा 6) हायड्रोजन | उ) संमिश्र ऊ) धातू इ) मिश्रण आ) संयुग अ) अधातू ई) मूलद्रव्य |
प्रश्न. 2. Zn, Cd, Xe, Br, Ti, Cu, Fe, Si, Ir, Pt या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा.
उत्तर :
1) Zn – जस्त
2) Cd – कॅडमियम
3) Xe – झेनॉन
4) Br – ब्रोमिन
5) Ti – टायटेनियम
6) Cu – तांबे
7) Fe – लोखंड
8) Si – सिलिकॉन
9) Ir – इरिडियम
10) Pt – प्लॅटिनम
प्रश्न. 3. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत ?
हायड्रोक्लोरीक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज, मिथेन
उत्तर :
1) हायड्रोक्लोरीक आम्ल – HCl
2) सल्फ्युरिक आम्ल – H2SO4
3) सोडियम क्लोराईड – NaCl
4) ग्लुकोज – C6H12O6
5) मिथेन – CH6
प्रश्न. 4. शास्त्रीय कारणे लिहा.
1) लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
उत्तर :
कारण – i) ताक हे एक प्रकारचे मिश्रणच आहे. लोणी काढताना आपल्याला ताकाची गरज असते.
ii) ताक घुसळल्यावर त्यात असणारे लोण्याचे कण एकत्र येऊन त्याच गोळा बनतो. व ताक वेगळे होते. अशावेळी आपण मिश्रणांतून आपल्याला आवश्यक असणारे घटक वेगळे करतो. म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.
2) रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यतच कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.
उत्तर :
कारण – i) रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पदार्थाच्या दोन गुणधर्माचा उपयोग केलेला आहे.
ii) पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता हे या पद्धतीतील दोन गुणधर्म आहे.
iii) ते परस्परविरोधी आहेत व ते वेगवेगळ्या गुणधर्माचे आहेत. त्यामुळे रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.
3) उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.
उत्तर :
कारण – i) उन्ह्याळ्यात सरासरीपेक्षा तापमानात वाढ होते. त्यामुळे पाणी साठवलेल्या भांड्याचे तापमान ही वाढते. त्यामुळे पाणी सुद्धा गरम होते.
ii) पाण्याचे तापमान वाढू नये म्हणून पाण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडालेले जाते. त्यामुळे पाण्याचे भांडे पान थंड राहण्यास मदत होते. म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते.
प्रश्न. 5. फरक स्पष्ट करा.
1) धातू आणि अधातू
उत्तर :
धातू | अधातू |
i) धातूंना चकाकी असते. ii) धातू वर्धनीय असतात. ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो. iii) धातूंना तन्यता असते. त्यांच्यापासून बारीक तार काढता येतो. iv) धातू सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात. अपवाद – पारा हा द्रव अवस्थेत असतो. | i) अधातू चकाकत नाहीत. ii) अधातू ठिसूळ असल्याने वर्धनीय नसतात. iii) अधातू ठिसूळ असल्याने त्यात तन्यता नसते. बारीक तार काढता येत नाही. iv) अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. अपवाद – ब्रोमीन |
2) मिश्रणे आणि संयुगे
उत्तर :
मिश्रणे | संयुगे |
i) दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे म्हणजे मिश्रण होय. ii) मिश्रणातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. iii) उदा. स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमिअम आणि निकेल यांचे संमिश्र आहे. | i) दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुगे होय. ii) संयूगाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या घटकांत विभाजन करता येते. iii) उदा. पाणी हे संयुग आहे. |
3) अणू आणि रेणू
उत्तर :
अणू | रेणू |
i) रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा व मूलद्रव्यांचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. ii) अणू मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणांना अणू असे म्हणतात. | i) मूलद्रव्यांचे किंवा संयुगाचे सर्व गुणधर्म असणाऱ्या तसेच स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या लहानात लहान कणास रेणू म्हणतात. ii) पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू. |
4) विलगीकरण व ऊर्ध्वपातन
उत्तर :
विलगीकरण | ऊर्ध्वपातन |
i) एकमेकांत न विरघळणारे दोन द्रवांचे मिश्रण वेगवेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो. ii) विलगीकरणाला उष्णतेची आवश्यकता नसते. | i) अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. ii) ऊर्ध्वपातनाला उष्णतेची आवश्यकता असते. |
प्रश्न. 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
1) मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात ?
उत्तर :
मिश्रणातील विविध घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे तसेच संल्प्वन यांसारख्या सहज सोप्या पद्धतींचा वापर केला जातो.
2) आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो ?
उत्तर :
आपण दैनंदिन वापरात खालील मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे वापरतो.
i) मूलद्रव्ये – (धातू) तांबे, लोखंड, एॅल्युमिनियम, सोने, चांदी, पारा.
(अधातू) – फॉस्फरस, कार्बन, आयोडिन, ऑक्सिजन, हयड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन.
ii) संयुगे – पाणी, साखर, मीठ
iii) मिश्रणे – हवा, ताक, पाणी
3) दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो ?
उत्तर :
i) ताक घुसळवून लोणी वेगळे करणे.
ii) वाॅशिंग मशिनमध्ये कपडे वाळवणे.
iii) रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी.
iv) व्ह्याॅक्युम क्लिनर घरातील कचरा साफ करण्यासाठी.
4) ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो ? का ?
उत्तर :
i) ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी होतो.
ii) मिश्रणातील न् विरघळणाऱ्या दोन द्रवांना वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो.
5) ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
उत्तर :
ऊर्ध्वपातन पद्धत वापरताना –
i) जागा ही मोठी असली पाहिजे.
ii) साहित्य काळजीपूर्वक वापरावे.
विलगीकरण पद्धत वापरताना –
i) हात स्वच्छ धुणे.
ii) यंत्र काळजीपूर्वक हाताळणे.
iii) मास्क, रबरी, हातमोजे वापरणे.
iv) विलगीकरण नरसाळे स्टॅडला पक्के बसवा.
v) नरसाळ्याची तोटी बंद करा.