स्वराज्यस्थापना स्वाध्याय

स्वराज्यस्थापना स्वाध्याय

स्वराज्यस्थापना स्वाध्याय इयत्ता सातवी

प्रश्न. 1. गटात न बसणारा शब्द शोधा.

1) पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू

उत्तर :

बंगळुरू

2) फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत

उत्तर :

फलटणचे जाधव

3) तोरणा, मुरूंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग

उत्तर :

सिंधुदुर्ग

प्रश्न. 2. चला, लिहिते होऊया !

1) शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईनी केलेले विविध संस्कार लिहा.

उत्तर :

शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईनी शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले.

2) शिवाजी महराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

उत्तर :

i) मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैर्ऋत्य दिशांचा भाग होय.

ii) मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता.

iii) मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. या सर्व बाबींमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली.

प्रश्न. 3. शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा.

उत्तर :

शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी –

येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नर्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यांतील काही नावे होत.

प्रश्न. 4. शोधा आणि लिहा.

1) शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात ?

उत्तर :

i) शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते.

ii) प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता.

iii) शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असतात त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.

iv) परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वत:ची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात.

2) शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले ?

उत्तर :

i) शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकल्यानंतर रायगडही जिंकून घेतला.

ii) जावळीच्या विजयामुळे महाराजांचे कोकणातील प्रदेशाकडे लक्ष गेले. त्यांनी किनारपट्टीवरील कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली.

iii) त्यावेळी त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सत्तांसोबत आला आणि या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

3) शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला ?

उत्तर :

i) शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रातांवर स्वारी केलेली होती.

ii) यावेळी शिवाजीमहराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता. अशावेळी शिवाजीमहाराज दुहेरी संकटात सापडले. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर नाही, हे शिवाजीमहारांनी लक्षात घेतले.

iii) त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यावर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला.

4) शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन कसे निसटले ?

उत्तर :

i) शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्यावेळी महाराजांनी सिद्दीशी बोलणी केल्यामुळे सिद्दीने पन्हाळगडावरील वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण केली.

ii) या प्रसंगी गडावरील शिवा काशिद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखच होता. त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला.

iii) पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली. सिद्दीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशिदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले.

iv) या दरम्यान शिवाजीमहाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. अशाप्रकारे शिवाजीमहराज पन्हाळगडावरुन निसटले.

3. धार्मिक समन्वय

4. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

Leave a Comment