तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा

उत्तर :

क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी ९.०० च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.

गोदावरी नदी – गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नदयांमध्ये केली जाते. या नदीला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर ११ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात झाला आहे. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा, वैनगंगा इ. उपनदया असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्रीपासून १० किमी अंतरावर व समुद्रापासून ८० किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,१९,८१० असून या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. या नदीच्या उगमस्थानाची उंची १,६२० मी. (५,३१० फूट) इतकी असून सरासरी प्रवाह ३,५०५ घन मी./से. (१,२३,८०० घन फूट/से.) आहे. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा या गोदावरीच्या उपनदया आहेत. 

गोदावरी नदीतील पाणी ऋतुप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. गोदावरी नदीवर गंगापूर, नांदूर मधमेश्वर, डौलेश्वरम या ठिकाणी धरणे बांधली आहेत. या परिसरातील लोकांचे जीवन या नदीने समृद्ध केले आहे. म्हणून गोदावरीस महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. 

नदी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. ती मानवाला बरेच काही देऊन जाते. परंतु मानव स्वार्थापोटी त्यात प्रदूषण करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. 

या परिसराची माहिती दिल्याबद्दल मी व माझा मित्र परिवार तसेच शिक्षक या स्थानिक परिसरातील लोकांचे मनःपूर्वक आभारी आहोत. 

Leave a Comment