प्रकाशाचे परिणाम स्वाध्याय
प्रकाशाचे परिणाम स्वाध्याय इयत्ता सातवी स्वाध्याय
प्रश्न. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) रात्री गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास ……………….. व ……………….. या छाया पाहता येतात.
उत्तर :
रात्री गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास उपच्छाया व प्रच्छाया या छाया पाहता येतात.
2) चंद्रग्रहणाच्या वेळी …………………. ची सावली …………………… वर पडते.
उत्तर :
चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.
3) सूर्यग्रहणाच्या वेळी ……………….. ची सावली ………………….. वर पडते.
उत्तर :
सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.
4) सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी …………………. मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.
उत्तर :
सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशझोता मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.
प्रश्न. 2. कारणे लिहा.
1) पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.
उत्तर :
कारण – i) अवकाशाचा निळा रंग वातावरणातून विकिरण होणाऱ्या प्रकाशाशी संबंधित आहे.
ii) पृथ्वीच्या वातावरणापलीकडे वातावरण नसल्यामुळे प्रकाशाचे विकिरण होत नाही. म्हणून पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.
2) सावलीत बसून वाचता येते.
उत्तर :
कारण – सूर्याचे हानीकारक अतिनिल किरणे प्रत्यक्षपणे डोळ्यांपर्यंत पोहचत नाही व सावलीमध्ये सहजपणे वाचणे सोयीचे होते. म्हणून सावलीत बसून वाचता येते.
3) उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.
उत्तर :
कारण – i) फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढ्या भागातून सूर्य दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात.
ii) सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरणे पृथ्वीवर पोहोचतात.
iii) ही हानिकारक अतिनील किरणे डोळ्यांना घातक असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. म्हणून् उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.
प्रश्न. 3. प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा.
उत्तर :
प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातीलजीवनातील उदाहरणे –
i) सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आकाश लालसर किंवा नारिंगी दिसते.
ii) पहाटे सूर्य लालसर भासतो.
प्रश्न. 4. हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची/विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही ?
उत्तर :
जसजसे विमान किंवा पक्षी पृथ्वीपासून दूर दूर जाते, तसतशी त्यांची प्रच्छाया लहान लहान होत जाते व शेवटी नाहीशी होते. म्हणून हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची किंवा विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही.
प्रश्न. 5. बिंदुस्त्रोतामुळे उपच्छाया का मिळत नाही ?
उत्तर :
बिंदुस्त्रोतामुळे निघालेले किरण ज्या ठिकाणी पोहोचतात, त्या दरम्यान कोणतेही किरण न आल्याने तो भाग अप्रकाशित राहतो. म्हणून ती गडद छाया म्हणजे प्रच्छाया मिळते, पण उपच्छाया मिळत नाही.
प्रश्न. 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
1) प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ?
उत्तर :
जेव्हा प्रकाशकिरण अगदी लहान कणांवर पडतो. तेव्हा ते कन वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विक्षेपित करतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात.
2) शून्यछाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का ?
उत्तर :
शून्यछाया हा दिवस फक्त कर्कवृत्त (23.5° उ.) व मकरवृत्त (23.5° द.) यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. सगळीकडे आढळत नाही. म्हणजेच शून्यछाया स्थितीत छाया लुप्त होत नाही.
3) बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाशकिरण टाकल्यास तो दिसेल का ?
उत्तर :
बंद काचेच्या पेटीतील धूपाच्या कणांवर प्रकाशकिरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात. हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यांत शिरेल व ते प्रकाशकिरण आपणास दिसेल.
प्रश्न. 7. चर्चा करा व लिहा.
1) ‘सूर्य उगवलाच नाही तर’, यावर तुमच्या शब्दांत विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा.
उत्तर :
सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. वातावरणातील पाणी व सूर्याच्या प्रकाशसंश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात. प्रकाशाचा मूळ स्त्रोत अर्थातच सूर्य आहे. सजीवांना जगण्यासाठी प्राणवायूचे पुनर्विमोचनही याच प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत होत असते. सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही अप्रत्यक्षरित्या सूर्यच करीत असतो. ऋतूचक्र फिरते ठेवून नद्यांचे पाणी सजीवांपर्यंत पोहचविण्याची सोय सूर्यच करतो. यावरून स्पष्ट होते की जीवनाचे दुसरे नावच सूर्य असावे.
जर सूर्य नसेल तर जीवन संभवतच नाही. तसेच वातावरणातील आर्द्रता वाढेल. त्यामुळे श्वसनाचे रोग होतील. ऊर्जेचा जमवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपात कमी होत जाईल. ऋतूचक्र थांबेल. रात्र व दिवस होणार नाही. सर्वत्र अंधकार होईल.
2) ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल ?
उत्तर :
ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पुढील प्रयत्न करू.
i) ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. हे समजावून सांगू.
ii) जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. ही ग्रहणाची परिभाषा स्पष्ट करा.
iii) ग्रहणामुळे काहीही वाईट होत नाही हे समजावून सांगू.
3) विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती
उत्तर :
1. सूर्यग्रह 2. चंद्रग्रहण 3. खग्रास सूर्यग्रहण 4. खंडग्रास सूर्यग्रहण 5. खग्रास चंद्रग्रहण 6. खंडग्रास चंद्रग्रहण
i) सूर्यग्रहणाच्या वेळी फिरता फिरता सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.
ii) खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते.
iii) खंडग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही.
iv) चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि तिची सावली (छाया) चंद्रावर पडते.
v) खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र झाकला जातो.
vi) खंडग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राच्या काही भागावर पृथ्वीची छाया पडते.
प्रश्न. 8. फरक स्पष्ट करा.
1) प्रकाशाचे बिंदुस्त्रोत व विस्तारित स्त्रोत
उत्तर :
प्रकाशाचे बिंदुस्त्रोत | विस्तारित स्त्रोत |
i) प्रकाशाचा बिंदुस्त्रोत अगदी बिंदू इतका लहान असतो. ii) यांपासून गडद छाया मिळते. iii) यांपासून मिळालेल्या गडद छायेस प्रच्छाया म्हणतात. | i) विस्तारित स्त्रोत हा मोठा असतो. ii) यांपासून फिकट छाया मिळते. iii) यांपासून मिळालेल्या फिकट छायेला उपच्छाया म्हणतात. |
2) प्रच्छाया व उपच्छाया
उत्तर :
प्रच्छाया | उपच्छाया |
i) प्रच्छाया ही गडद छाया असते. ii) प्रच्छाया ही बिंदूस्त्रोत व विस्तारित स्त्रोत दोन्हींपासून मिळते. | i) उपच्छाया ही फिकट छाया असते. ii) उपच्छाया ही विस्तारित स्त्रोतांपासून मिळते. |