ध्वनी : ध्वनीची निर्मिती स्वाध्याय
ध्वनी : ध्वनीची निर्मिती स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध ……………….. ध्वनी निर्माण होतो.
उत्तर :
कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो.
2) ध्वनीची वारंवारिता …………………. मध्ये मोजतात.
उत्तर :
ध्वनीची वारंवारिता हर्ट्स मध्ये मोजतात.
3) ध्वनीचा ………………… कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो.
उत्तर :
ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो.
4) ध्वनीच्या ……………….. साठी माध्यमाची आवश्यकता असते.
उत्तर :
ध्वनीच्या प्रसारा साठी माध्यमाची आवश्यकता असते.
प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) बासरी 2) वारंवारिता 3) ध्वनीची पातळी 4) श्राव्यातील ध्वनी 5) श्राव्य ध्वनी | अ) वारंवारिता 20Hz पेक्षा कमी आ) वारंवारिता 20000Hz पेक्षा जास्त इ) हवेतील कंपने ई) Hz मध्ये मोजतात उ) डेसिबेल |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) बासरी 2) वारंवारिता 3) ध्वनीची पातळी 4) श्राव्यातील ध्वनी 5) श्राव्य ध्वनी | इ) हवेतील कंपने ई) Hz मध्ये मोजतात उ) डेसिबेल आ) वारंवारिता 20000Hz पेक्षा जास्त अ) वारंवारिता 20Hz पेक्षा कमी |
प्रश्न. 2. शास्त्रीय कारणे लिहा.
1) जुन्या काळी रेल्वे कधी येई, हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत.
उत्तर :
कारण – रेल्वेच्या रुळांमध्ये कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. म्हणून रेल्वे येत आहे की नाही हे पाहण्यासाठी रुळांना कान लावून अंदाज घेतला जात असे.
2) तबला व सतार यांपासून निर्माण होणार ध्वनी वेगवेगळा असतो.
उत्तर :
कारण – तबल्याचा पृष्ठभाग हा चामड्याचा असतो आणि सतार मध्ये तारा जोडलेल्या असतात. म्हणून चामड्यात होणारी कंपने आणि तारांमध्ये होणारी कंपने वेगळी असतात आणि त्यातून निर्माण होणारा ध्वनी हा वेगवेगळा असतो. म्हणून तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो.
3) चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली, तर त्याला ती ऐकू येणार नाही.
उत्तर :
कारण – चंद्रावर हवा नाही. आणि ध्वनी निर्माण होण्यासाठी हवेच्या माध्यमाची आवश्यकता असते. हवा नसल्यामुळे कंपने निर्माण होत नाही आणि त्यामुळे ध्वनी सुद्धा निर्माण होत नाही. म्हणून चंद्रावर हाक मारली तर ती दुसऱ्या व्यक्तीला ऐकू जाणार नाही.
4) डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
उत्तर :
कारण – डासांचे पंख हे खूप छोटे असतात म्हणून ते खूप लवकर लवकर हलवतात. त्यांची वारंवारिता ही जास्त असते. त्यांची वारंवारिता ही 1000Hz आहे. हा श्राव्य ध्वनी आहे. तसेच आपल्या हातांची वारंवारता ही कमी आहे त्यामुळे त्यातून निघणाऱ्या ध्वनीची वारंवारिता ही कमी आहे. जी अश्राव्य आहे. म्हणून डासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही.
प्रश्न. 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) ध्वनीची निर्मिती कशी होते ?
उत्तर :
वस्तूंच्या लयबद्ध कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. वस्तूंमध्ये निर्माण होणारी कंपने हवेतील रेणूंना दिली जातात आणि ध्वनी निर्माण होतो.
2) ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?
उत्तर :
ध्वनीची तीव्रता ही खालील गोष्टींवर अवलंबून असते.
i) ध्वनीची उच्चनीचता ii) माध्यम iii) ध्वनीची पातळी iv) ध्वनी कंपनाचा आयाम
3) दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा.
उत्तर :
दोलकाचा दोलनकाल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. दोलकाची लांबी वाढल्यास दोलकाचा दोलनकालही वाढतो. आयाम कमी-अधिक झाली तरी वारंवारिता कायम राहते.
4) ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्चनीचता कोणत्या दोन मार्गानी बदलता येते, ते स्पष्ट करा.
उत्तर :
लाकडाच्या ठोकळ्यामुळे तारेतील तणाव कमी होतो. त्यामुळे कंपने कमी होऊ ध्वनीची उच्चनीचता बदलता येते.