संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय
संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र
प्रश्न. 1. संघराज्य शासनपद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशाप्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा.
उत्तर :
प्रश्न. 2. योग्य शब्द लिहा.
1) संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा –
उत्तर :
संघशासन
2) निवडणुका घेणारी यंत्रणा –
उत्तर :
निवडणुक आयोग
3) दोन सूचींव्यतिरिक्त असलेली यंत्रणा –
उत्तर :
समवर्ती सूची
प्रश्न. 3. लिहिते व्हा.
1) संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
उत्तर :
i) मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे.
ii) मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते, दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते.
iii) तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
2) शेषाधिकार म्हणजे काय ?
उत्तर :
i) संघसूची व राज्यसूची या सूचींव्यतिरिक्त तीसरी एक ‘समवर्ती सूची’ असून त्यात 47 विषय आहेत.
ii) या तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. या अधिकाराला ‘शेषाधिकार’ म्हणतात.
3) संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
उत्तर :
i) वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात.
ii) न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते.
iii) तसेच न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये. म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
प्रश्न. 4. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (EVM) वापरल्यामुळे कोणते फायदे होतात, याची माहिती मिळवा.
उत्तर :
2004 पूर्वी भारतामध्ये मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोरील चिन्हावर शिक्का मारून मतदार मतदान करीत होते. नोव्हेंबर 1998 मध्ये दिल्ली, राज्यस्थान आणि मध्यप्रदेश या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 16 मतदारसंघात या इलेक्ट्रॉनिक यंत्राचा पहिल्यांदा वापर केला गेला. यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदानाकरिता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केल्या जाऊ लागला. मतदान यंत्रात उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दिलेले असते. या चिन्हासमोरचे बटन दाबून मतदार आपले मत नोंदवितो. अशाप्रकारे मतमोजणीच्या दिवशी या मतदान यंत्रातील मते मोजली जातात. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र वापरल्यामुळे वरील फायदे होता.