पाण्याची गोष्ट स्वाध्याय
पाण्याची गोष्ट स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता ?
उत्तर :
रत्नाला घरचे पाणी भरायचे होते. मंगळवार हा तिच्याकडच्या नळाला पाणी येण्याचा दिवस होता आणि आज मंगळवार होता. म्हणून रत्नाला शाळेत जायला उशीर होणार होता.
आ) या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते ?
उत्तर :
या संवादातील रत्ना म्हणजेच तिचा भाऊ दीपक आणि सकीनाकडे मंगळवारी पाणी येते. रवी कौशाकडे रविवारी आणि मोहनकडे सोमवारी पाणी येते.
इ) कौशाच्या घरी पाणी भरणेसाठी कोणती तयारी करतात ?
उत्तर :
कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी शनिवारी रात्रीच सगळे हंडे, कळश्या, तपेल्या, बादल्या, डबे नेऊन रात्रीच रांगेत ठेवतात. नंतर सकाळपासूनच ते नळाजवळ थांबतात. अशाप्रकारे कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी तयारी करतात.
ई) पाऊस कमी पडल्यामुळे काय होते ?
उत्तर :
पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो. शेतीसाठी तर राहूच द्या, पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते. पाण्यासाठी वणवण करावी लागते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा अनेक, समस्या निर्माण होतात. गावोगावी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो.
उ) जमिनीला ‘पाण्याची बँक’ असे का म्हटले आहे ?
उत्तर :
बँकेत पैसे भरले तरच आपल्याला ते काढता येतात. त्याप्रमाणे जमिनीत पाणी मुरले तरच ते आपल्याला विहिरी, तलाव यातून मिळणार असते. म्हणून जमिनीला पाण्याची बँक म्हटले आहे.
प्रश्न. 2. ‘दुष्काळ’ या विषयावर आठ ते दहा ओळी लिहा.
उत्तर :
दुष्काळ
दुष्काळ दोन प्रकारचा असतो. एक कोरडा दुष्काळ आणि दुसरा ओला दुष्काळ. पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ निर्माण होतो आणि अति पाऊस पडला तर ओला दुष्काळ येतो.
कोरडा दुष्काळ पडतो तेव्हा नदीनाले, विहिरी, तलाव यातील पाणी आटलेले असते. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर राहूच द्या, पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा समस्या निर्माण होतात. गावोगावी टॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. पाखरे जनावरे पाण्याविना तडफडून मरतात.
याउलट ओला दुष्काळ आला तर नद्या-नाल्यांना पूर येतो. शेते, घरे, शाळा, रस्ते पाण्याखाली जातात. पिके नष्ट होतात.
पाण्याचा वापर जपून करणे, पाणी जमिनीत मुरवणे आणि नद्यांवर धरणे बांधणे, हे दुष्काळावरचे उपाय आहेत.
प्रश्न. 3. निरीक्षण करा, सांगा व लिहा.
अ) तुमच्या घरी पाणी कसे येते ? किती वेळा ? पाणी भरण्याचे काम कोण करते ?
उत्तर :
आमच्या घरी महानगरपालिकेने सोडलेले पाणी नळाद्वारे येते. दिवसातून एकच वेळा येते. सकाळी 8 ते 10 पाणीपुरवठा केला जातो. आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई करते.
आ) तुम्ही अंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता ? त्यात कशी बचत करता येईल ?
उत्तर :
आमच्या घरी सहा व्यक्ती आहेत. प्रत्येकजण अंघोळीसाठी प्रत्येकी एक बादली पाणी वापरतो. बादलीतून एक लोटा पाणी काढून ठेवले तर दर दिवशी सहा लोटे पाण्याची बचत करता येईल.
इ) घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये, म्हणून काय करता येईल, ते चर्चा करून लिहा.
1. शाळा
उत्तर :
शाळा – क्रीडांगणावर पाणी थोडे कमी टाकावे.
2. जलतरण तलाव
उत्तर :
जलतरण तलाव – तलाव पूर्ण न भरता थोडा कमी भरावा.
3. शेती
उत्तर :
शेती – ठिंबक सिंचन पद्धती उपयोगात आणावी.
4. सार्वजनिक नळ
उत्तर :
सार्वजनिक नळ – आपण पाणी भरताच नळाची तोटी बंद करावी.
5. हॉटेल
उत्तर :
हॉटेल – ग्राहकाला पूर्ण ग्लासभर पाणी न देता अर्धा ग्लास द्यावे. त्याला अजून हवे असल्यास पुन्हा द्यावे.
ई) पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे आठ जाणून घ्या. ते वापरुन वाक्ये बनवा.
1. पाणी जोखणे
उत्तर :
पाणी जोखणे – धमक ताडणे
वा. उ. – शिवाजी महाराजांनी शत्रूचे पाणी जोखून लढाया केल्या.
2. पाणी पाजणे
उत्तर :
पाणी पाजणे – बडवणे किंवा पराजित करणे.
वा. उ. – एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पाणी पाजले.
3. डोळ्यांत पाणी आणणे
उतरत :
डोळ्यांत पाणी आणणे – अश्रू गाळणे
वा. उ. – मुलगी सासरी जाताना आईने डोळ्यात पाणी आणले.
4. तोंडचे पाणी पळणे
उत्तर :
तोंडचे पाणी पळणे – भीतीने घाबरणे
वा. उ. – सापाला पाहताच माझ्या तोंडचे पाणी पळाले.
5. पाणी पडणे
उत्तर :
पाणी पडणे – निरुपयोगी होणे, फुकट जाणे, नाश पावणे.
वा. उ. – शंकर अपघातात मरण पावला. त्याचा वाचवण्याच्या डॉक्टरांच्या सर्व प्रत्नावर पाणी पडले.
6. पालथ्या घड्यावर पाणी
उत्तर :
पालथ्या घड्यावर पाणी – निष्फळ प्रयत्न
वा. उ. – दारू पिऊ नकोस म्हणून सर्वानी तात्याला समजावून सांगितले पण पालथ्या घड्यावर पाणी.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
1) उठतो, बसतो, हसतो, पळतो, मुलगा.
उत्तर :
मुलगा – कारण इतर सर्व शब्द क्रियापदे आहेत. ‘मुलगा’ क्रियापद नाही.
2) तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही.
उत्तर :
मुलीला – कारण इतर सर्व शब्द सर्वनामे आहेत. ‘मुलीला’ सर्वनाम नाही.
3) सुंदर, फूल, टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार
उत्तर :
फूल – कारण इतर सर्व शब्द विशेषणे आहेत. ‘फूल’ विशेषण नाही.
4) रत्नागिरी, जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड
उत्तर :
जिल्हा – कारण इतर सर्व शब्द विशेषनाम आहेत. ‘जिल्हा’ विशेष नाम नाही.
5) पालापाचोळा, सगेसोयरे, दिवसरात्र, दगडधोंडे
उत्तर :
सगेसोयरे – कारण इतर सर्व शब्द निर्जीव आहेत. ‘सगेसोयरे’ निर्जीव नाही.
6) सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती
उत्तर :
गोड – कारण इतर सर्व शब्द भाववाचक नाम आहेत. ‘गोड’ विशेषण आहे.
7) नद्या, झाड, फुले, पाने, फळे
उत्तर :
नद्या – कारण इतर सर्व शब्द झाडाशी संबंधित आहेत. ‘नद्या’ झाडाशी संबंधित नाही.
8 ) इमारत, वाडा, खोली, खिडकी, बाग
उत्तर :
बाग – कारण इतर सर्व शब्द इमारतीचे भाग आहेत. ‘बाग’ इमारतीचा भाग नाही.
9) खाल्ला, खेळते, लिहिते, वाचले, पाहिले
उत्तर :
खेळते – कारण इतर सर्व क्रियापदे भूतकाळी आहेत. ‘खेळते’ वर्तमानकाळी आहे.
10) जाईल, येईल, बोलेल, आला, लिहीन
उत्तर :
आला – कारण इतर सर्व क्रियापदे भविष्यकाळी आहेत. ‘आला’ भूतकळी आहे.
11) प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार, गैरसमज
उत्तर :
प्रसिद्ध – कारण इतर सर्व शब्द नाम आहेत. ‘प्रसिद्ध’ विशेष आहे.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. म्हणी ओळखा व लिहा. त्यांचा वाक्यांत उपयोग लिहा.
1) अंथरूण पाहून पाय पसरावे – मिळकतीप्रमाणे खर्च करावा.
वा. उ. – इच्छा खूप असतात, पण अंथरूण पाहून पाय पसरावे.
2) हातच्या कंकणाला आरसा कशाला – जे उघड आहे त्याला पुराव्याची गरज नसते.
वा. उ. – अनुज बावीस वर्षाचा आहे. तो तरुण आहे हे सिद्धच आहे. त्यासाठी हातच्या कंकणाला आरसा कशाला ?
3) पुढच्यास ठेच मागचा शहाणा – आधीच्या घटनेवरून नंतरच्या माणसांनी शहणपण शिकणे.
वा. उ. – सुरेशकडे रमा मोलकरणीने चोरी केली होती. म्हणून श्रीने तिला कामावर घेण्यास नकार दिला. कारण पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
4) थेंबे थेंबे तळे साचे – थेंबासारखी लहान गोष्ट साचत गेली की तळ्यासारखी मोठी होते.
वा. उ. – जयाने काटकसर करून एकएक पैसा शिल्लक टाकला. आता तिच्याजवळ थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने भरपूर पैसा शिल्लक आहे.