ढोल स्वाध्याय
ढोल स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे ?
उत्तर :
आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे.
आ) अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता ?
उत्तर :
अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.
इ) ‘आमश्या डोहल्या’ ने कोणती शपथ घेतली होती ?
उत्तर :
‘आमश्या डोहल्याने’ ‘यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू’ ही शपथ घेतली होती.
प्रश्न. 2. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा.
उत्तर :
सातपुड्याच्या परिसरातील घनदाट जंगल आहे. हे जंगल कंदमुळे, फळे आणि पानाफुलांनी बहरलेली आहे. सागाची झाडे खूप आहेत. संपूर्ण परिसर डोंगर रांगांनी वेढलेले आहे.
आ) आमश्याच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते ?
उत्तर :
आमश्या ढोल वाजवू लागला, की पाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात आमश्या पटाईत होता. हे आमश्याच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य होते.
इ) ढोल कसा तयार करतात ?
उत्तर :
ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात. अशा प्रकारे ढोल तयार करतात.
ई) ‘ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील,’ हे पटवून देण्यासाठी भगताने काय सांगितले ?
उत्तर :
‘ढोलाच्या रूपाने आमश्या आपल्यातच राहील’, हे पटवून देण्यासाठी भगताने सांगितले की आमश्याला उद्या सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्या मातीत एखादी सागाची बी रूजेल. त्याचं झाड होईल. त्याच्या लाकडाचा कुणीतरी ढोल बनवील. तो ढोल कुणीतरी वाजवील. अशा रीतीने आमश्या आमच्यात राहील.
प्रश्न. 3. वाक्यात उपयोग करा.
i) आसमंतात घुमणे
उत्तर :
आसमंतात घुमणे – सभोवताली आवाज पसरणे
वा. उ. – वरातीतील बॅडचा आवाज आसमंतात धुमतो.
ii) पटाईत असणे
उत्तर :
पटाईत असणे – सराईत असणे
वा. उ. – नील पतंग उडवण्यात सराईत आहे.
iii) दणाणून सोडणे
उत्तर :
दणाणून सोडणे – जोराने दणदणने
वा. उ. – क्रुद्ध भाऊ एवढ्या जोराने बोलत होते की, त्यांनी सारे घर दणाणून सोडले.
iv) शपथ घेणे
उत्तर :
शपथ घेणे – प्रतिज्ञा करणे.
वा. उ. – आम्ही स्वातंत्र्यदिनाला ग्राम स्वच्छतेची शपथ घेतली.
v) रिंगण धरणे
उत्तर :
रिंगण धरणे – गोल गोल फिरणे.
वा. उ. – वारकरी भजन गातांना कधी कधी रिंगण धरतात.
प्रश्न. 4. तुम्ही ‘होळी’ हा सण कसा साजरा करता, त्याचे वर्णन करा.
उत्तर :
होळी फाल्गुन पौर्णिमेला असते. या दिवशी आम्ही होळीसाठी लाकडे जमवतो. होळीचा रात्रीचा मुहूर्त असतो. त्या मुहूर्तावर आम्ही आमच्या अंगणात होळी पेटवतो. होळीच्या व होळा अशा दोन मोळ्या रचलेल्या असतात. मोळ्या थोड्या पेटल्या की आई, वहिनी, ताई होळीच्या पूजेचे ताट घेऊन येतात. गंध, अक्षता, कुंकू, हळद व फुले वाहून होळीची पूजा करतात. नारळ फोडण्याचे काम माझ्याकडे असते. शेजारच्या बायकाही होळीची पूजा करायला येत असतात. घरातील सर्वजण होळी पाहायला येत असतात. तेही पूजा करून नमस्कार करतात. होळीला पुरणपोळी करतात. पुरणपोळीचा नैवेद्य होळीत टाकला जातो. त्यानंतर जेवणे होतात. आमच्या घरी होळीचा सण असा साजरा होत असतो.
जी सत्ये बदलत नाहीत ती दर्शवितांनाही वर्तमानकाळी क्रियापदे योजतात.
उदा.. 1) सूर्य पूर्व दिशेला उगवतो.
2) सूर्य पश्चिमेला मावळतो.