या काळाच्या भाळावरती स्वाध्याय
या काळाच्या भाळावरती स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे ?
उत्तर :
नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी तू सूर्यफुलांच्या बागा फुलव काट्यामधल्या वाटांमधून पुढे चालत जा. अंधाराला तुडवत जाऊन नवी पहाट घेऊन ये. उंच आभाळी झेपा घेऊन नव्या दिशा शोधून काढ. नवीन वारे घेऊन ये तुझ्या करणीमधून धरणीवरल्या शिळा गाऊ दे. हे प्रयत्न करायला कवी सांगत आहे.
आ) पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते ?
उत्तर :
काट्यामधल्या वाटांमधून तू चालत पुढे पुढे जा. मग या वाटा पाऊसभरल्या नभाकडे अलगद नेतील. उन्हाच्या झळा सरून जातील. तेव्हा पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते.
इ) नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे ?
उत्तर :
तू नवीन वारे घेऊन यावे. नवीन दिशा घेऊन यावे आणि तुझ्या करणीमधून धरणीवरच्या प्रत्येक शिळा गाऊ लागाव्यात. हे सारे व्हावे म्हणून कवी नवीन दिशा शोधायला सांगत आहेत.
प्रश्न. 2. ‘आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा’ या ओळीचा अर्थ सांगा.
उत्तर :
मानवसमाजातील सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट व्हावेत. जन्मजात प्रतिष्ठा नष्ट व्हावी. प्रतिष्ठा कर्तृत्वावर आधारलेली असावी आणि मानवता हा एकच मानवांचा धर्म असावा. या विचारांचा मळा तुझ्या श्रमातून आणि कर्तृत्वातून फुलू दे असा या ओळीचा अर्थ आहे.
प्रश्न. 3. मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ-दहा वाक्यांत लिहा.
उत्तर :
महात्मा जोतीबा फुले हे मानवतेचे कार्य करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती होय. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्याही आधी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य केले. त्याकाळी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास बंदी होती. जोतीबांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गूरू मानतात. त्याकाळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. पण तरीही महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यांनी स्त्रियांना एक नियम व पुरुषांना दुसरा नियम असा भेदभाव कधीच केला नाही. त्यामुळेच त्यांनी विधवा दुसरा नियम असा भेदभाव कधीच केला नाही. त्यामुळेच त्यांनी विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीस सक्रिय पाठिंबा दिला. बालहत्या प्रतिबंधक गृह निर्माण केले. मानवतेच्या कार्यातून समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
प्रश्न. 4. तुमची इतरांना मदत होईल, असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा.
उत्तर :
बाबा एकदा हॉस्पिटलमध्ये कुणा रुग्णाला भेटायला गेले. सोबत त्यांनी मलाही नेलं होतं. जाताना आम्ही काही फळं खरेदी करून घेऊन गेलो. वार्डात गेल्यावर बाबा त्या रुग्णाजवळ बसले. बाबांना पाहून त्याला खूप आनंद झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून व बोलण्यावरून दिसत होते. काही वेळाने बाबांचे लक्ष त्या वार्डातल्या एका म्हाताऱ्या बाईकडे गेले. प्रत्येक रुग्णाजवळ कुणी ना कुणी भेटायला आलेले दिसत होते. पण म्हातारीजवळ मात्र कुणीच दिसत नव्हते. ती एकटीच बेडवर पडून होती. बाबांनी मला तिच्याजवळ जायला सांगितले. मी गेलो आणि तिला म्हणालो, ‘आजी, मी आलो आहे.’ ती थोडी उठून बसली. मला आपल्या पोटाशी घेण्याकरिता तिनं हात पसरले. ती म्हणाली, तूच माझा खरा नातू. मला मुलं आहेत, सुना आहेत, नातू आहेत. पण कुणीच मला भेटायला येत नाही. तू माझा नातू मला भेटायला आला. ‘तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी हेलावून गेलो. ‘आजी येतोच मी.’ असं सांगून बाबांकडे आलो. त्यांना आजीकरिता थोडे फळ मागितले. त्यांनी दिले. ती फळं घेऊन तिनं खूप खूप आशीर्वाद दिले. भेटीची वेळ संपल्यावर आम्ही घरी परतलो. ती आजी अजून माझ्या डोळ्यापुढं उभी आहे. तेव्हापासून रुग्णांची करता येईल ती सेवा करणं आणि त्यासाठी सुट्टीच्या दिवशी एक तास रुग्णसेवेत घालवणं हे काम करायचं मी ठरवलं आहे. मी रुग्णसेवा करू इच्छितो.
प्रश्न. 5. कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता?
उत्तर :
माझा भारत स्वच्छ असावा. कोणतीही घाण त्याच्या मनात व परिसरात असू नये. पर्यावरण असे निर्माण असू नये. पर्यावरण असे निर्माण करावे की ऋतचक्र नियमितपणे सुरू राहिले पाहिजे. म्हणजे योग्य वेळी योग्य तेवढा पाऊस येईल, शेती धन धान्याने समृद्ध होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतिहासजमा होतील. माणूस जन्माने नव्हे तर कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरेल. मग आरक्षणाची गरजच भासणार नाही. कारण सर्वांना सारखीच संधी मिळेल आणि संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांना सारखेच वातावरण उपलब्ध असेल. स्त्री-पुरुष हा भेदच कायमचा नष्ट होईल. अशी स्वप्ने मी पाहत असतो.
प्रश्न. 6. खालील तक्त्यात ‘अ’ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत. ‘ब’ गटात ओळींचा अर्थ लिहा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
अ) सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी | |
आ) काट्यांमधल्या वाटांमधूनि चालत जा तू पुढे पुढे | |
इ) अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाट | |
ई) उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधुनि नव्या दिशा |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
अ) सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी | सूर्यामुळे सूर्यफुलते फुलते. तसाच चांगल्या विचारांचा सूर्य उगवावा. आणि त्याचा प्रकाश घरोघरी पडू सूर्यफुलांच्या बागा फुलाव्या. |
आ) काट्यांमधल्या वाटांमधूनि चालत जा तू पुढे पुढे | आपल्या प्रगतीचा मार्ग अडचणी आणि संकटे या काट्यांनी भरलेला असतो. या काट्यांवर मात करून तू पुढे जा. संकटांना भिऊन तू मागे वळू नकोस. |
इ) अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाट | सर्वत्र विषमतेचा अंधार पसरला. तो पायाने तुडवून तू समतेचा प्रकाश देणारी नवी पहाट घेऊन ये. |
ई) उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधुनि नव्या दिशा | जीवन आकाशासारखे विशाल व व्यापक आहे. त्यात भराऱ्या घे आणि समस्या सोडवण्याच्या नव्या दिशा शोधून काढ. |
खेळूया शब्दांशी
अ) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा.
अ) कपाळ –
उत्तर :
कपाळ – भाळ, ललाट
आ) प्रयत्न –
उत्तर :
प्रयत्न – यत्न
इ) आकाश –
उत्तर :
आकाश – आभाळ
ई) पृथ्वी –
उत्तर :
पृथ्वी – धरा
उ) सकाळ –
उत्तर :
सकाळ – उषा
ऊ) दगड –
उत्तर :
दगड – शिळा
आ) कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.

उत्तर :

इ) ‘कणाकणाला’ म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा.
उत्तर :
i) क्षणाक्षणाला – प्रत्येक क्षणाला
ii) माणसामाणसाला – प्रत्येक माणसाला
iii) मिनिटामिनिटाला – प्रत्येक मिनिटाला
iv) तासातासाला – प्रत्येक तासाला
v) खणाखणात – प्रत्येक खाण्यात
vi) तासातासाला – प्रत्येक तासाला
vii) गाण्यागाण्याला – प्रत्येक गाण्याला
प्रश्न. 7. नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत. हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा.
उत्तर :
नवी स्वप्ने – हा शब्दसमूह लोकहिताची नवी ध्येये या अर्थाने आला आहे.
नवी पहाट – हा शब्दसमूह कालबाह्य रूढींचा त्याग व नव्या हितकारी रुढींची प्रस्थापना या अर्थाने आला आहे.
नवी दिशा – पारंपरिक विचार टाकून नव्या विचारांच्या मार्गाचा शोध या अर्थाने हा शब्दसमूह आला आहे.
प्रश्न. 8. या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे तुम्हांला घरातील व्यक्ती कोणत्या कामासाठी कसे प्रोत्साहन देतात ? ते लिहा.
उत्तर :
मी संगीतकलेत रस घ्यावा म्हणून घराच्यांनी मला तबल्याचा क्लास लावून दिला. मला फूटबॉल खेळणे आवडते म्हणून ऑन लाईन फूटबॉल बोलावून दिला. पोहण्याचे क्लास दूर उन्हाळ्यात लावून देतात. घरच्या व्यक्ती मला असे प्रोत्साहन देत असतात. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेण्यासाठीही मला प्रोत्साहन देतात.
विचार करून सांगूया
सानिया आईबाबांबरोबर बाजारात गेली होती. तिला बाजारात दोन-अडीच वर्षाची एक मुलगी एकटीच रडताना दिसली. ती लहान मुलगी फारच घाबरलेली होती. कदाचित ती बाजारात हरवली होती. तिला पाहून सानिया अस्वस्थ झाली. तिला काही सुचेना आता काय करावे ? तुम्ही तरी सांगा………….
उत्तर :
सानियाने तिला आपल्या आईबाबांकडे न्यावे. ते त्या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेतील. शोध लागला नाही तर पोलिसांची मदत घेतील. आणि तिला तिच्या आईबाबांची भेट घडवून देतील.
आपण समजून घेऊया
पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.
1) सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली.
उत्तर :
सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली.
2) काल आम्ही सहलीत खूप मजा केली.
उत्तर :
काल आम्ही सहलीत खूप मजा केली.
3) केवढा मुसळधार पाऊस पडला काल.
उत्तर :
केवढा मुसळधार पाऊस पडला काल.
वरील वाक्यांतील क्रियापदे भूतकाळी आहेत. सर्व क्रिया भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय.
पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.
1) गिर्यारोहकाने कडा सर केला होता.
उत्तर :
गिर्यारोहकाने कडा सर केला होता.
2) आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता.
उत्तर :
आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता.
3) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते.
उत्तर :
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते.
वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या रुपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेला आहेत, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.
पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.
1) शंतनू क्रिकेट खेळत होता.
उत्तर :
शंतनू क्रिकेट खेळत होता.
2) जॉन चित्र काढत होता.
उत्तर :
जॉन चित्र काढत होता.
3) मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती.
उत्तर :
मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती.
क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते की वरील वाक्यांत खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्ण आहे. अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो.
पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.
1) उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे.
उत्तर :
उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे.
2) तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे.
उत्तर :
तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे.
3) चंदू सनई वाजवत असे.
उत्तर :
चंदू सनई वाजवत असे.
अधोरेखित क्रियापदावरून ऊसतोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे. असा अर्थ व्यक्त होतो. म्हणून हा रीती भूतकाळ होय.
खालील वाक्यांत क्रियापदांची योग्य रूपे घाला.
1) बिरबल स्वाचातुर्याने सभा ………….. (जिंकणे)
उत्तर :
बिरबल स्वाचातुर्याने सभा जिंकत असे.
2) अभय गोष्टी…………… (लिहिणे)
उत्तर :
अभय गोष्टी लिहितो.
3) सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा ……………. (विचार करणे)
उत्तर :
सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा विचार करत होती.
पुढील वाक्यांत क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला.
1) काल पाच वाजता सोनाली शाळेतून …………. (येणे)
उत्तर :
काल पाच वाजता सोनाली शाळेतून येत होती.
2) वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय ……………. (करणे)
उत्तर :
वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय करत होती.
3) काल नऊ वाजत सौरभ आकाशाचे …………… (निरीक्षण करणे)
उत्तर :
काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करत होता.