वाहतूक स्वाध्याय
वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. वाहतुकीच्या सोईचा तुम्हांला झालेला फायदा, यावर पाच वाक्ये लिहा.
उत्तर :
i) वाहतुकीच्या सोईमुळे कामे जलद गतीने होतात.
ii) वेळ व श्रमांची बचत होते.
iii) विविध वस्तू सहज उपलब्ध झाल्याने जीवनमान सुधारते.
iv) वाहतुकीच्या सोईमुळे विविध पर्यटनाला भेट देता येते.
v) जास्त आजारी असतांना त्वरित उपचाराची आवश्यकता असते. अशावेळी कुठलाही विलंब न करतांना वाहतुकीच्या सोईमुळे दवाखान्यात जाऊन उपचार करता येतो.
2. वाहतुकीच्या सोइमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा.
उत्तर :
वाहतुकीच्या सोईमुळे बाजारपेठ, मोठे दवाखाने, महाविद्यालय, शाळा इत्यादी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत…
3. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा.
उत्तर :
i) कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे.
ii) वेळच्या वेळी वाहनांची व दुरुस्ती करणे.
iii) शक्यतो सार्वजनिक वाहनांवर वापर करणे.
iv) वृक्ष लागवड करणे.
4. तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा ?
उत्तर :
आमच्या परिसरापासून 8 किलोमीटर दूर शेतात एक मंदिर आहे. हा परिसर प्रदूषणापासून दूर आहे.
कमी प्रदूषित असण्यामागची करणे
i) मुख्य रस्त्यापासून व गावापासून दूर हिरवळीच्या परिसराचा हा भाग आहे.
ii) तिथे जायचे म्हणजे पायदळ किंवा छोटी वाहनेच जावू शकतात.
iii) परिसर शांत व सभोवार झाले असल्याने हवा शुद्ध व खेळती असते. वातावरणात थंडावा असतो.
5. CNG व LPG ची विस्तारित रूपे लिहा.
उत्तर :
CNG – Compress Natural Gas ( कॉम्प्रेस नॅच्यूरल गॅस)
LPG – Liquefied Petroleum Gas (लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस)
6. अ) वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते ?
उत्तर :
बस हे प्रदूषण करणारे वाहन आहे.
आ) या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल ?
उत्तर :
i) कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर करणे. जसे – CNG किंवा LPG यांसारखी इंधने वापरणे.
ii) वेळच्या वेळी बस या वाहनाची देखभाल व दुरुस्ती करणे.