कोळीण स्वाध्याय
कोळीण स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर :
i) हॉलिवूडपासून दूर असलेल्या एका डोंगरावर जाऊन लेखकाने कोळिणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझनभर ढेकळं स्वत:च्या स्टुडिओत आणली.
ii) ती ढेकळं खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलवर ठेवली.
iii) अंधाराचा पडदा सोडून कोळिणीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून त्या ढेकळांवर रात्रांदिवस प्रकाशाचा झोत टाळला.
iv) डझनभर कोळिणीपैकी फक्त एकीनं लेखकाच्या आवश्यकतेप्रमाणे जुळवून घेतल्यामुळे तिला लेखकाने खुणावून प्रशिक्षण दिलं.
v) ती कोळीण लेखकाच्या चित्रपटाची जणू तारका बनली. ती सोबगला अगदी सहज पकडे. पण लेखकाला त्यात रोमहर्षक घटना हवी होती म्हणून त्याने तिचे भक्ष्य म्हणून शतपाद मिळवले. आता तरी रोमहर्षक संघर्ष पाहायला मिळेल व कॅमेऱ्यात ते टिपता येईल असे त्याला वाटले.
vi) लेखक त्या कोळिणी तारकेला अतिशय श्रमपूर्वक आणि कौशल्याने पढवत होते.
vii) लेखकाने कोळीण व शतपाद यांचा संघर्ष रंगतदार व्हावा म्हणून मोठ्या आकाराने शतपाद तिच्या समोर नेले. तिनं अधीरतेनं त्याच्यावर झडप मारली. शतपादाला शंभर पाय असले तरी त्यातील पन्नास जमिनीला खिळून राहायचे. राहिलेले पन्नास पाय धडपडत आणि वळवळत स्वत:चं संरक्षण करण्याकरिता तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असत. कितीतरी सेकंद हे नाट्य चालू असताना ते लेखक कॅमेऱ्याने टिपत असे.
प्रश्न. 2. असे का घडले ते लिहा.
अ) लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.
उत्तर :
कारण लेखक कोळ्याच्या घरट्याचा शोध घेत होते.
आ) लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.
उत्तर :
कारण लेखक कोळिणीच्या घराच्या बंद दाराकडे पाहण्यात गुंग झाले होते.
इ) लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.
उत्तर :
कारण लेखकानं चाकूच्या पात्यानं ते दार उघडलं होतं. कोळिणीनं ते चाकूचं पातं विलक्षण ताकदीनं ओढलं होतं. लेखकाला अंधार पडल्यावर परत तिथे यायचे असल्यामुळे त्याने घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.
ई) कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.
उत्तर :
कारण तिच्या माघारी बिळाचे दार लागले तर ते तिला कधीच उघडता येत नाही. तिच्या माघारी दार बंद होणं म्हणजे तिच्या मृत्यूच.
प्रश्न. 3. खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
---|---|
1) लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. | |
2) पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. | |
3) कोळिणीच्या माघारी दार बंद होणे. | |
4) कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला. |
उत्तर :
घटना | परिणाम |
---|---|
1) लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं. | दार उघडलं |
2) पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला. | जमीन थोडी ओलसर झाली. |
3) कोळिणीच्या माघारी दार बंद होणे. | कोळिणीचा मृत्यूच |
4) कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला. | कोळीण चुळबूळ करू लागली. |
प्रश्न. 4. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा.
उत्तर :
प्रश्न. 5. तुम्हांला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती खालील चौकटींत लिहा.
उत्तर :
खेळूया शब्दांशी
खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा.