विश्वाचे अंतरंग स्वाध्याय

विश्वाचे अंतरंग स्वाध्याय

विश्वाचे अंतरंग स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. आम्हांला ओळखा.

अ. ताऱ्यांचे जन्मस्थान

उत्तर :

तेजोमेघ

आ. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह

उत्तर :

गुरू

इ. आपल्या शेजारील आकाशगंगा

उत्तर :

देवयानी

ई. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह

उत्तर :

शुक्र

उ. सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह

उत्तर :

गुरू

ऊ. आम्हांला एकही उपग्रह नाही.

उत्तर :

बुध आणि शुक्र

ए. माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे.

उत्तर :

शुक्र

ऐ. मी शेपटी घेऊन वावरतो.

उत्तर :

धूमकेतू

2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

अ. आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगाच्या समूहामध्ये आहे, त्या समूहाला ………….. म्हणतात.

उत्तर :

आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगाच्या समूहामध्ये आहे, त्या समूहाला स्थानिक दीर्घिका म्हणतात.

आ. धूमकेतू हे ………….. पासून तयार झालेले असतात.

उत्तर :

धूमकेतू हे धूळ व बर्फ पासून तयार झालेले असतात.

इ. …………… हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो.

उत्तर :

युरेनस हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो.

ई. ………….. हा वादळी ग्रह आहे.

उत्तर :

गुरू हा वादळी ग्रह आहे.

उ. ध्रुव तारा …………… ताऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे.

उत्तर :

ध्रुव तारा रुपविकारी ताऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे.

3. दिलेली विधाने चूक की बरोबर आहेत ते ठरवा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.

अ. शुक्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.

उत्तर :

चूक. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.

आ. बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात.

उत्तर :

चूक. गुरू ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात.

इ. गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.

उत्तर :

बरोबर

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय ?

उत्तर :

i) मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.

ii) मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो. म्हणून त्याला ‘लाल’ ग्रह म्हणतात.

iii) मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब ऑलिम्पस मॉन्स हा आहे.

आ. दीर्घेकेचे प्रकार कोणते ?

उत्तर :

चक्राकार/सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार, अवरुद्ध चक्राकार, अनियमित असे दीर्घेकेचे प्रकार पडतात.

इ. आकाशगंगेमध्ये कोणकोणाचा समावेश होतो ?

उत्तर :

आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहे. तसेच सूर्यमाला, त्यातील ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू व बटूग्रह यांचा समावेश होतो.

ई. ताऱ्यांचे प्रकार कोणते ?

उत्तर :

i) सूर्यसदृश तारे

ii) तांबडे राक्षसी तारे

iii) महाराक्षसी तारे

iv) जोड तारे

v) रूपविकारी तारे. हे ताऱ्यांचे प्रकार आहेत.

उ. धूमकेतुंचे प्रकार कोणते ? कशावरून ?

उत्तर :

धूमकेतूंचे दीर्घ मुदतीचे धूमकेतू व अल्पमुदतीचे धूमकेतू असे प्रकार पडतात.

i) दीर्घ मुदतीचे धूमकेतू. या धूमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो.

ii) अल्प मुदतीचे धूमकेतू या धुमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी करण्यास दोनशे वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो.

ऊ. धुमकेतुमध्ये काय काय असते ?

उत्तर :

i) धूमकेतू हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असतात.

ii) सूर्यापासून दूर असताना ते बिंदूप्रमाणे दिसतात, मात्र सूर्याच्या उष्णतेमुळे धुमकेतूतील द्रव्याचे वायूंत रुपांतर होते.

iii) हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात.

iv) हे धुमकेतू सुर्याजवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे व कमी अंतरामुळे ते डोळ्यांना सहज दिसू शकतात.

ए. उल्का व अशनी यांमध्ये कोणता फरक आहे ?

उत्तर :

i) उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात.

ii) मात्र जे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना उल्का म्हणतात. तर काही वेळेस उल्का पूर्णत: न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी असे म्हणतात.

ऐ. नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

i) सूर्यमालेतील नेपच्यून हा आठवा ग्रह आहे.

ii) नेपच्यूनवरील एक ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो.

iii) या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.

iv) या ग्रहाला 13 उपग्रह आहेत.

v) या ग्रहाचा परिवलनाचा काळ 16 तास 11 मिनिटे इतका असतो.

5. जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. आकाशगंगा अ. पूर्वेकडून पश्चिमेकडे
2. धूमकेतु आ. 33 उपग्रह
3. सूर्य सदृशतारा इ. सर्पिलाकार
4. शनी ई. व्याध
5. शुक्र उ. हॅले

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. आकाशगंगा इ. सर्पिलाकार
2. धूमकेतु उ. हॅले
3. सूर्य सदृशतारा ई. व्याध
4. शनी आ. 33 उपग्रह
5. शुक्र अ. पूर्वेकडून पश्चिमेकडे

Leave a Comment