बालसभा स्वाध्याय

बालसभा स्वाध्याय

बालसभा स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा.

अ) इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते ?

उत्तर :

महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते.

आ) बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला ?

उत्तर :

बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर, कुणाल आणि चंदर यांनी सहभाग घेतला.

इ) बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली ?

उत्तर :

बालसभेचे नियोजन करताना शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी, मीनल, प्रकाश, जॉन, कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा यांनी मदत केली.

प्रश्न. 2. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ-दहा ओळींत लिहा.

उत्तर :

महात्मा जोतीबा फुले यांनी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढली. त्यामुळेच आज स्त्रीशिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवाविवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले. त्यांनी आपल्या पत्नीला सर्वप्रथम शिक्षित करून. त्यांच्यामाध्यमातून स्त्री शिक्षणाचा प्रसार केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृहे निर्माण भरून विद्यार्थ्याच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी बहुजन समाजासाठी अद्वितीय अशी कामगिरी केली आहे. त्यांनी बहुजन समाजाला बौद्ध धर्माची दिक्षा दिली.

प्रश्न. 3. तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ? ते क्रमाने लिहा.

उत्तर :

प्रथम हॉल स्वच्छ करू. हॉलमध्ये थोर वैज्ञानिकांचे फोटो लावू नंतर व्यासपीठ तयार करू. बैठक व्यवस्था करू. अध्यक्षपद, सूत्रसंचालन आणि व्याख्याते आधीच ठरवून त्यांना तसे कळवू व त्यांची संमती घेऊ. एका खुर्चीवर सरस्वतीचा फोटो ठेवून हार, पुष्पे व निरांजन याची व्यवस्था करू. शाळेत लाऊडस्पिकर असेल तर तीही व्यवस्था करू.

प्रश्न. 4. शाळेमध्ये बालसभांव्यितिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा.

उत्तर :

i) गणराज्यदिन (जानेवारी)

ii) मराठी राज्यभाषा दिन (फ्रेबुवारी)

iii) स्वातंत्र्यदिन (ऑगस्ट)

iv) शिक्षकदिन (सप्टेंबर)

v) गांधीजयंती (ऑक्टोंबर)

vi) बालक दिन (नोव्हेंबर)

प्रश्न. 5. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात ? त्या विषयांची यादी करा.

उत्तर :

i) पर्यावरण

ii) वाचन संस्कृती

iii) विज्ञाननिष्ठा व अंधश्रद्धा

iv) ग्रामसुधार

प्रश्न. 6. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ? ते लिहा.

उत्तर :

हे करून पाहूया

अ) तुमच्या शाळेत ‘बालिका दिन’ साजरा केला आहे. त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा.

उत्तर :

त्रिविधा विद्यालयात बालिका दिन संपन्न

त्रिविधा विद्यालयात बालिका दिन संपन्न झाला. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर मुलींनी स्वागतगीत म्हटले. अध्यक्षस्थान मालती कावरे यांनी भूषविले. डॉ. मनोहर पवार हे प्रमुख अतिथी होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, “बालिकांना वाचवा, वाढवा आणि शिकवा. तरच देशाची प्रगती होऊ शकते. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी | ती जगाते उद्धारी ?” राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सीमा ढोमणे यांनी सूत्रसंचालन केले. मंगला फाये यांनी आभारप्रदर्शन केले.

आ) स्वातंत्र्यदिननिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हांला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रणपत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रणपत्रिका तयार करा.

उत्तर :

निमंत्रण पत्रिका

माननीय अध्यक्ष

शाळा व्यवस्थापन समिती

सा. न.

मान्यवर महोदय,

आपल्या शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सकाळी 9 वाजता होणार आहे. आपण कृपया कार्यक्रमाला उपस्थित राहावे म्हणून हे निमंत्रण पाठवित आहे.

आपली

…………

(मुख्याध्यापिका)

दि. 10 ऑगस्ट 2018

इ) तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

आपण समजून घेऊया

वाक्यातील क्रियापदाला ‘कोण’ असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते, तो शब्द त्या वाक्याचा ‘कर्ता’ असतो. वाक्यातील क्रियापदाला ‘काय’ असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते, तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील ‘कर्म’ होय.

खालील वाक्ये वाचा.

1) श्रीरंगने बासरी वाजवली.

2) सुगंधाने आंबे खाल्ले.

3) राजूने पतंग उडवला.

4) मधूने पुस्तक वाचले.

वरील वाक्यांतील क्रियापदांना ‘कोण’ आणि ‘काय’ या शब्दांनी प्रश्न विचारूया.

अ.क्र.क्रियापद‘कोण’ ने प्रश्नउत्तर (कर्ता)‘काय’ ने प्रश्नउत्तर (कर्म)
1.वाजवलीवाजवणारा कोण ?श्रीरंगवाजवले ते काय ?बासरी
2.खाल्लेखाणारी कोण ?सुगंधाखाल्ले ते काय ?आंबे
3.उडवलाउडवणारा कोण ?……..उडवले ते काय ?……..
4.वाचलेवाचणारी कोण ?……..वाचले ते काय ?……..

उत्तर :

अ.क्र.क्रियापद‘कोण’ ने प्रश्नउत्तर (कर्ता)‘काय’ ने प्रश्नउत्तर (कर्म)
1.वाजवलीवाजवणारा कोण ?श्रीरंगवाजवले ते काय ?बासरी
2.खाल्लेखाणारी कोण ?सुगंधाखाल्ले ते काय ?आंबे
3.उडवलाउडवणारा कोण ?राजूउडवले ते काय ?पतंग
4.वाचलेवाचणारी कोण ?मधूवाचले ते काय ?पुस्तक

पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा.

वाक्यकर्ताकर्मक्रियापद
1. तारा क्रिकेट खेळते.
2. यास्मीन पुस्तक वाचते.
3. पक्षी किलबिल करतात.
4. राजू अभ्यास करतो.
5. शबाना स्वयंपाक करते.
6. जॉन व्यायाम करतो.

उत्तर :

वाक्यकर्ताकर्मक्रियापद
1. तारा क्रिकेट खेळते. ताराक्रिकेटखेळते
2. यास्मीन पुस्तक वाचते. यास्मीनपुस्तकवाचते
3. पक्षी किलबिल करतात. पक्षीकिलबिलकरतात
4. राजू अभ्यास करतो.राजूअभ्यासकरतो
5. शबाना स्वयंपाक करते. शबानास्वयंपाककरते
6. जॉन व्यायाम करतो. जॉनव्यायामकरतो

Leave a Comment