पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय

पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय

पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय इयत्ता सहावी परिसर अभ्यास भाग 1

1. काय करावे बरे ?

कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत.

उत्तर :

i) धान्य कडक उन्हात वाळवावे.

ii) त्यानंतर ज्यात ते साठवायचे आहे त्यात कडूलिंबाचा पाला टाकावा.

iii) तसेच हिंग कापडात बांधून त्यात ठेवावे त्यामुळे धान्याला किड लागत नाही.

iv) धान्य साठवण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी म्हणजे धान्यात कीड होण्याचा संभव कमी असतो.

2. जरा डोके चालवा.

अन्नसारखी तयार करा :

बेडूक, घार, अळी, साप, गवत.

उत्तर :

गवत → अळी → बेडूक → साप → घार

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) अन्नसाखळी म्हणजे काय ? उदाहरण लिहा.

उत्तर :

i) एका सजीवावर दुसरा संजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रितीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. अशा साखळीला अन्नसाखळी म्हणतात.

ii) सूर्याच्या प्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न बनवतात. अशा वनस्पतींची पाने अळ्या खातात. नाकतोडे अळ्यांना खातात. नाकतोडयांना चिमण्या खातात, ही एक अन्नसाखळी आहे.

गवत → अळी → बेडूक → साप → घार

आ) पर्यावरणाचे संतुलन कसे खाल्ले जाते ?

उत्तर :

कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळी असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात. जलचक्र, कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन चक्र अशा चक्रात सजीव-निर्जीव यांच्यातही परस्पर देवाणघेवाण होत असते. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की, पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

4. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे ?

उत्तर :

वनस्पतींच्या वाढीसाठी मातीमधल्या पोषक पदार्थाची आवश्यकता आहे. हे पोषक पदार्थ खतांवाटे वनस्पतींना मिळतात तसेच प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते.

5. चूक की बरोबर ते लिहा.

अ) पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो.

उत्तर :

बरोबर

आ) जैवविविधता जपणे आवश्यक आहे.

उत्तर :

बरोबर

इ) नाकतोडा पक्ष्याला खातो.

उत्तर :

चूक

Leave a Comment