गवतफुला रे गवतफुला स्वाध्याय

गवतफुला रे गवतफुला स्वाध्याय

गवतफुला रे गवतफुला स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुठे व कशी भेट झाली ?

उत्तर :

कवितेतील मुलगा आपल्या मित्रासोबत माळावर पतंग उडवीत फिरत होता. त्याचे लक्ष गवतावर उगवलेल्या गवतफुलाकडे गेले. त्याने गवतफुलाला पाहिजे. अशी त्याची गवतफुलाशी भेट झाली.

आ) गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला ?

उत्तर :

गवतफुलाला पाहून मुलगा नभीचा पतंग विसरला. तसाच तो आपल्या मित्रांनाही विसरून गेला.

इ) कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे ?

उत्तर :

गवतफुलाची पाने हिरवी, नाजूक, रेशमासारखी आहेत आणि दोन बाजूंना सळसळती एक नीळनिळूली पाकळी आहे. कवयित्रीने असे वर्णन केले आहे.

ई) गवतफुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे ?

उत्तर :

गवतफुलाला भेटायला वारा सानुले रूप घेऊन भेटायला आला आहे. रात्रदेखील लहान होऊन गवत फुलाला अंगाई गीत गात आहे.

उ) गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत ?

उत्तर :

गवतफुलाबरोबर राहून मुलाला त्याची भाषा शिकायची आहे. त्याला गोष्टी सांगायच्या आहेत. त्याचे खेळ शिकायचे आहेत, त्याला जादू शिकवायची आहे. आभाळाशी हट्ट करायचा आहे. त्याच्यासोबत खाऊ खाणे व त्याचे रंगीत कपडे घालून फुलपाखराला फसवणे ह्या गोष्टी मुलाला करायच्या आहेत.

प्रश्न. 2. तुम्हांला फुलपाखरू भेटले, तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल ? तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

मला फुलपाखरू भेटले तर मी त्याला म्हणेन, फुलपाखरा ! किती गोड दिसतोस तू ! मला मुझे रंग खूप आवडतात. तू या फुलावरून त्या फुलावर असा सारखा फिरत असतोस. फूल जेवढे नाजूक तेवढाच तूही नाजूक. मला तू खूप आवडतोस. आपण मैत्री करूया.

प्रश्न. 3. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

अ) तुझे रंग पाहून मी स्वत:ला विसरून गेलो.

उत्तर :

उन्हामधे हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे !

आ) मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते.

उत्तर :

मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे

इ) तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या.

उत्तर :

तुझी शिकून गोजिरी भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या.

ई) तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे.

उत्तर :

तुझे घालुनी रंगित कपडे, फुलपाखरां फसवावे !

प्रश्न. 4. या कवितेत गवतफुलाचे वर्णन करताना कोणत्या, कोणते रंग वापरले आहेत ते लिहा.

उदा., रेशिम-पाती-हिरवी

1) पाकळी –

उत्तर :

पाकळी-निळी

2) पराग –

उत्तर :

पराग-पिवळे

3) तळीची पाकळी –

उत्तर :

तळीची पाकळी – लाल

प्रश्न. 5. गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यांमधील साम्य व भेद लिहा.

उत्तर :

साम्य – दोन्ही फुले आहेत. त्यामुळे नाजूक व सुंदर दिसतात.

भेद – गवतफूल गवतावर तर इतर फुले वेलींवर किंवा झाडावर जन्मतात. गवतफुलाची कुणी जोपासना करत नाही. इतर फुलांची जोपासना करतात. गवतफुलांना सुगंध नसतो. इतर फुलांना सुगंध असतो.

प्रश्न. 6. ‘सळसळ’ यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर :
भरभर, सरसर, घरघर, करकर, गरगर, खरखर, चरचर, झरझर, टरटर, थरथर, मरमर, वरवर, हरहर, कुरकुर, टुरटुर, पिरपिर

खेळूया शब्दांशी

अ) समान अर्थाचे शब्द लिहा.

उत्तर :

आ) रंगरंगुल्या, सानसानुल्या, नीळनिळूली यासारखे शब्द शोधा व लिहा.

उत्तर :

रागरागिणी, साजिरीगोजिरी, मायमाऊली

इ) गवतफुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा.

उत्तर :

कविता करूया

सोनालीप्रमाणे आपणही खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया.

1. माझी शाळा म्हणते खेळ खेळा

वेळ, काळ तुम्ही नियमित पाळा

उत्तर :

माझी शाळा म्हणते खेळ खेळा

वेळ, काळ तुम्ही नियमित पाळा

अस्वच्छतेचा विचार गाळा

प्रार्थनेला व्हा सगळे गोळा !

2. जाऊ जंगल सफरीला

पाहू आनंदे निसर्गाला

उत्तर :

जाऊ जंगल सफरीला

पाहू आनंदे निसर्गाला

निसर्गाची किमया पाहूया

आनंदे सारे डोलूया !

Leave a Comment