निर्णय स्वाध्याय
निर्णय स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) खालील आकृती पूर्ण करा.
अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

2) कारणे लिहा.
अ) हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण ……………….
उत्तर :
हॉटेल मालकाने चार रोबो खरेदी केले, कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता.
आ) हॉटेल मालकाची द्विधा मन:स्थिती संपली, कारण …………….
उत्तर :
हॉटेल मालकाची द्विधा मन:स्थिती संपली, कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे, हे मालकांना पटले.
3) रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

4) खालील शब्द समूहांचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
| अ) वाळवंटातील हिरवळ | |
| आ) कासवगती | |
| इ) अचंबित नजर | |
| ई) द्विधा मनःस्थिती |
उत्तर :
| अ) वाळवंटातील हिरवळ | वाळवंट हा कोरडा आणि कडक प्रदेश असतो. अशा परिस्थितीत हिरवळीचा उगवणं हे दुर्मिळ आणि अनपेक्षित असतं. त्यामुळे, वाळवंटातील हिरवळ हे सौंदर्य आणि आशेचं प्रतीक बनतं. |
| आ) कासवगती | अत्यंत मंद गती |
| इ) अचंबित नजर | चकित झालेली दृश्य म्हणजे काही दृश्य किंवा अनुभव ज्यामुळे आपण आश्चर्यचकित |
| ई) द्विधा मनःस्थिती | दुटप्पीपणा म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दोन पर्यायांमधील निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा ती कोंडीची अवस्था म्हणूनही ओळखली जाऊ शकते. |
5) खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा.
अ) आनंद गगनात न मावणे –
1) आनंद हद्दपार होणे.
2) आकाश हातात न मावणे.
3) खूप आनंद होणे.
4) आकाशाशी नाते जडणे.
उत्तर :
खूप आनंद होणे.
आ) काडीचाही त्रास न होणे –
1) प्रचंड त्रास होणे.
2) काडीमोड होणे.
3) अजिबात त्रास न होणे.
4) खूप त्रास न होणे.
उत्तर :
अजिबात त्रास न होणे.
6) शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
अ) अपेक्षा नसताना
उत्तर :
अनपेक्षित
आ) ज्याचे आकलन होत नाही असे
उत्तर :
अनाकलनीय
इ) कुठलीही अपेक्षा न ठेवता
उत्तर :
निरपेक्ष
7) स्वमत
अ) रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे चार रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वत:हून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोंसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळलाच नाही. ती बाई बेशुद्ध पडलेली आहे, हे मनोजला कळले, म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वत:ची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार.
आ) ‘तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, हे यंत्राला ठरवता येत नाही, ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात, यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वत:च्या बुद्धीने, स्वत:च्या अंत:करणाने काम करतो. यंत्र ही सांगकाम्या नोकर असते. त्याला सज्जन-दुर्जन, पापी-पुण्यवान ही काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते, म्हणजे ते माणसाला पूरक आहे, ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही.
इ) ‘माणसुकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो, या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटरसंबंधातल्या समस्या दूर करता आल्या, यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारांमध्ये एवढे पुरेसे नसते. माणसांशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की, कोणत्याही घटनेने माणसांच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनालाच शक्य आहे. माणसाकडेच माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला, याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय.
भाषाभ्यास
खालील कृती सोडवा.
अ) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
१) वरील उदाहरणातील अलंकार –
उत्तर :
चेतनागुणोक्ती
२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये –
उत्तर :
i) निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे आरोपण करणे.
ii) वसंत ऋतुला फेरीवाला असे संबोधित आहे.
आ) लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।
१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी –
उत्तर :
i) मुंगी
ii) ऐरावत नावाचा हत्ती
२) वरील उदाहरणातील अलंकार –
उत्तर :
दृष्टान्त
३) या अलंकाराची वैशिष्ट्ये –
उत्तर :
i) नम्रता या गुणाची महती सांगितली आहे.
ii) एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत.
इ) संसार सागरी विहरे जीवन नौका
१) वरील उदाहरणातील उपमेये –
उत्तर :
संसार, जीवन
२) वरील उदाहरणातील उपमाने –
उत्तर :
संसार, नौका
३) वरील उदाहरणातील अलंकार –
उत्तर :
रुपक
ई) खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.
सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।
| उपमेय | उपमान | अलंकाराचे नाव | अलंकाराची वैशिष्ट्ये |
|---|---|---|---|
उत्तर :
| उपमेय | उपमान | अलंकाराचे नाव | अलंकाराची वैशिष्ट्ये |
|---|---|---|---|
| सावळा रामचंद्र | चंद्र | व्यतिरेक | उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. |