आप्पांचे पत्र स्वाध्याय
आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) कारणे लिहा.
अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण …………………..
उत्तर :
कारण त्यांना शिक्षण घेता आले.
आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण………………….
उत्तर :
कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.
2) आकृती पूर्ण करा.
अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

3) योग्य पर्याय निवडा.
अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ………………
1) हृदयाची धडधड वाढते.
2) कपाळावरच्या आठ्या वाढतात.
3) विद्यार्थ्याचे गुण वाढतात.
4) विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.
उत्तर :
आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.
आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ………………..
1) तो रोज उपस्थित असतो.
2) तो सर्वांची काळजी घेतो.
3) तो चांगलं काम करतो.
4) तो सर्वांशी चांगले बोलतो.
उत्तर :
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो.
4) आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
अ) आप्पांचे शिक्षणप्रेम –
उत्तर :
मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन.
आ) स्वच्छता –
उत्तर :
आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर धूळ दिसणार नाही.
5) चौकटी पूर्ण करा.

उत्तर :

6) खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.
अ) ती लगबगीने घरी पोहोचली.
उत्तर :
लगबगीने
आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
उत्तर :
सहज
इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
उत्तर :
आज
7) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शोधा.
अ) पक्ष्याचे दाण्यांवर झडप घातली.
उत्तर :
पक्ष्याचे दाण्यांवर झडप घातली.
आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
उत्तर :
तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
इ) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
उत्तर :
छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
उत्तर :
परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
8) स्वमत
अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वतःच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
गळणाऱ्या नळामुळे खूप पाणी वाया जाते. त्यामुळे पाण्याच्या सार्वजनिक टंकीत पाणी उरत नाही. म्हणून लोकांना प्यायच्या पाण्याचाही पुरवठा होऊ शकत नाही. लोकांचे हाल होतात. ते दुःखी होतात व त्यांच्या डोळ्यांत पाणी येते आपण जर गळके नळ दुरुस्त केले, वाया जाणारे पाणी वाचवले तर ते पाण्याच्या सार्वजनिक टाकीत जमा राहील. पाण्याचा योग्य पुरवठा होईल. लोकांचे हाल होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. म्हणजे पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणे हे दुःखी माणसातल्या डोळ्यातले पाणी पुसण्याएवढेच महत्त्वाचे काम आहे.
आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले ? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
उत्तर :
परीक्षेचा निकाल लागला की परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळाले यावरून ते आपली परीक्षा करतात. वास्तविक, परीक्षेत मिळालेल्या गुणांना जीवनात एवढे मोठे महत्त्व नसते. महत्त्व असते आपल्या अंगच्या गुणांना, या गुणांनीच माणूस मोठा होत असतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामच काय पण जेवढी जेवढी जगात थोर माणसे झाली, ती काही दहावीत प्रथम आलेली माणसे नव्हती. पण त्यांचीच छायाचित्रे घराघरात लागली आहेत. म्हणून आप्पा म्हणतात की जग तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळाले ते विचारतील; पण मी मात्र तुम्ही किती गुणी आहात, ते सांगेन.
इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर :
आप्पांच्या आमच्याकडून चार अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा म्हणजे पुस्तकाची पानं आणि झाडाची पानं दोन्ही आम्ही प्रेमाने बघितली पाहिजेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही अभ्यासही करू आणि वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागही घेऊ. आप्पांची दुसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी बरेच जण परदेशात जाणार आहेत. त्यातला एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसला पाहिजे. यासाठी आम्ही परदेशात जाओ न जाओ; कोणत्याही एका कलेत प्राविण्य मिळवू. कला खूप आहेत. तिसरी अपेक्षा म्हणजे आमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. आमच्यापैकी एकाने तरी लिहिलेले पुस्तक शाळेच्या ग्रंथालयात दिसले पाहिजे. आमच्यापैकी लेखनकलेचे जे भोक्ते असतील, ते हे काम अवश्य करतील. किंवा आम्ही ज्या कलेत प्रावीण्य मिळवू त्याच संदर्भात त्यावर ग्रंथ लिहू. चौथी अपेक्षा म्हणजे आप्पाला आमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचे आहे. याचा अर्थ शिक्षणानंतर नोकरीच केली पाहिजे, असे नाही. उत्तम शेतीही करता येते व नावही मिळवता येते. ना. धों, महानोर हे श्रेष्ठ कवी व्यवसायाने शेतकरी आहेत. शेती व्यवसायाकडे वळण्याचा आम्हीही विचार करू.