चुंबकाची गंमत स्वाध्याय

चुंबकाची गंमत स्वाध्याय

चुंबकाची गंमत स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. कसे कराल ?

अ. पदार्थ चुंबकीय आहेत की अचुंबकीय हे ठरवायचे आहे.

उत्तर :

पदार्थजवळ लोहचुंबक नेला असता जे पदार्थ चुंबकाला चिकटतील त्या पदार्थाला चुंबकीय ठरवायचे. जे पदार्थ चुंबकाला चिकटणार नाही त्याला अचुंबकीय पदार्थ ठरवायचे.

आ. चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते, हे समजावून द्यायचे आहे.

उत्तर :

एका कागदावर लोखंडाचा किस घ्या. त्यावरून चुंबक फिरवा. ज्या भागात लोखंडाचा किस चिकटला ते त्या चुंबकाचे क्षेत्र असेल आणि ज्या भागाला लोखंडाचा किस चिकटलेला नसेल ते त्या चुंबकाचे क्षेत्र नाही असे म्हणता येईल.

इ. चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे.

उत्तर :

एका पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकवा. चुंबक कोणत्या दिशेत स्थिर झाला ते नोंदवा व पुन्हा चुंबक गोल फिरवा आता स्थिर झाला की पुन्हा दिशा नोंदवा. असे अनेक वेळा करा. चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुव असे म्हणतात. तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव म्हणतात.

2. कोणता चुंबक वापराल ?

अ. कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे.

उत्तर :

विद्युत चुंबक

आ. तुम्ही जंगलात वाट चुकला आहात.

उत्तर :

दिशादर्शक चुंबक/होकायंत्र

इ. खिडकीची झडप वाऱ्यामुळे सतत उघड-बंद होते.

उत्तर :

कायमचे चुंबक

3. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा.

अ. पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या …………….. ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो.

(दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम)

उत्तर :

पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो.

आ. एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास …………….. पट्टी चुंबक तयार होतात, तर एकूण …………… ध्रुव तयार होतात.

(6, 3, 2)

उत्तर :

एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास 3 पट्टी चुंबक तयार होतात, तर एकूण 6 ध्रुव तयार होतात.

इ. चुंबकांच्या……………. ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते, तर त्याच्या ……………. ध्रुवांमध्ये आकर्षण असते.

(विजातीय, सजातीय)

उत्तर :

चुंबकांच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असते, तर त्याच्या विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते.

ई. चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला……………. प्राप्त होते.

(कायम चुंबकत्व, प्रवर्तित चुंबकत्व)

उत्तर :

चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला प्रवर्तित चुंबकत्व प्राप्त होते.

उ. एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो, तर तो तुकडा …………… असला पाहिजे.

(लोखंडाव्यतिरिक्त इतर कोणताही धातू, चुंबक किंवा लोखंडी तुकडा, अचुंबकीय पदार्थ)

उत्तर :

एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो, तर तो तुकडा चुंबक किंवा लोखंडी तुकडा असला पाहिजे.

ऊ. चुंबक …………….. दिशेत स्थिर राहतो.

(पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर)

उत्तर :

चुंबक दक्षिण-उत्तर दिशेत स्थिर राहतो.

4. प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ. विद्युतचुंबक कसा तयार करतात ?

उत्तर :

साहित्य, अंदाजे 10 सेमी लांबीचा लोखंडी खिळा, एक मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी, टाचण्या किंवा इतर चुंबकीय वस्तू. खिळ्याभोवती तांब्याची तार गुंडाळा, तारेची दोन्ही टाके बॅटरीला जोडा. आता लोखंडी खिळ्याच्या टोकाजवळ टाचण्या न्या. टाचण्या खिळ्याला चिकटतात. आता विद्युतप्रवाह बंद करून काय होते ते पहा. खिळ्याला चिकटलेल्या टाचण्या पडतात. विद्युतप्रवाहामुळे खिळ्यामध्ये चुंबकत्व निर्माण होते. तो बंद केला की चुंबकत्व नाहीसे होते. अशा चुंबकास विद्युतचुंबक म्हणतात.

आ. चुंबकाचे गुणधर्म लिहा.

उत्तर :

i) चुंबक प्रत्येक वेळी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर होतो.

ii) चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांकडे एकवटलेले असते.

iii) चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत म्हणजेच एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात.

iv) चुंबकाच्या सान्निध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व म्हणतात.

v) चुंबकांच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण, पण विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते.

इ. चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते ?

उत्तर :

चुंबकाचे व्यावहारिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.

i) ATM कार्ड, क्रेडिट कार्ड यांवर एक चुंबकीय पदार्थाची पट्टीका असते.

ii) दैनंदिन जीवनात पिन होल्डर, दारावरची घंटा, क्रेन, फ्रिजच्या दारामध्ये चुंबक वापरलेल्या असतो.

iii) तसेच कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, ऑडिओ, व्हिडिओ, सीडी यांमध्येही चुंबकीय पदार्थाचा वापर केला जातो.

iv) त्याशिवाय मॅगलेव्ह ट्रेनमध्ये विद्युतचुंबकाचा वापर केला जातो.

Leave a Comment