ऊर्जा साधने स्वाध्याय

ऊर्जा साधने स्वाध्याय

ऊर्जा साधने स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

अ) पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल ?

1) रोहनला पतंग उडवायचा आहे.

उत्तर :

हवा (वारा)

2) आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे.

उत्तर :

शेकोटी पेटविण्यासाठी लाकूड

3) सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे.

उत्तर :

बत्तीचा स्ट्रोव्ह, छोटी गॅस, लाकूड

4) सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे.

उत्तर :

इलिक्ट्रिक इस्त्री, कोळशाची इस्त्री

5) रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे.

उत्तर :

वीज, कोळसा.

6) अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे.

उत्तर :

गिझर, पाणी तापवायचा बंब, हिटर

7) सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.

उत्तर :

रॉकेल, वीज

ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो ? त्याचे कारण काय असेल ?

उत्तर :

i) मानव पेट्रोल, वारा, विद्युत, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश या ऊर्जा साधनांचा वापर करतो. त्यापैकी पेट्रोल व विद्युत या ऊर्जा साधनांचा सर्वाधिक वापर करतो.

ii) कारण मानवाला घरगुती वापरापासून ते कारखान्यात/कार्यालयात काम करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी विद्युत ऊर्जेची गरज असते. त्याशिवाय त्याला वाहतूक करण्यासाठी पेट्रोल या ऊर्जा साधनांची गरज असते.

2) ऊर्जा साधनाची गरज काय ?

उत्तर :

i) मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर करतो.

ii) याशिवाय इतरही ऊर्जा साधनांचा वापर करत असतो. अर्थात मानवाला आपल्या गरजा भागविण्यासाठी ऊर्जा साधनाची गरज असते.

3) पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे ?

उत्तर :

i) ऊर्जा साधने ही पारंपरिक व अपारंपरिक अशी असतात. पारंपरिक ऊर्जासाधने प्रामुख्याने संपणारी असतात.

ii) अपारंपरिक ऊर्जा साधने ही पर्यावरणपूरक असतात. सूर्य, वारे, जैविक पदार्थ, भूगर्भातील उष्णता, सागरी लाटा या नैसर्गिक स्रोतांद्वारे अपारंपरिक ऊर्जा मिळवता येते.

iii) अपारंपरिक साधनांची निर्मिती पुन्हा पुन्हा करता येते. ती दीर्घकाळ निर्माण करता येते. त्यापासून पर्यावरणाला धोका नसतो. प्रदूषण होत नाही. त्यामुळे अशा पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर करणे गरजेचे आहे.

क) खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

(उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे)

1) खनिज तेल व सौरऊर्जा

उत्तर :

खनिज तेलसौरऊर्जा
i) सामान्यपणे सागरतळातील विविध प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती यांच्या अवशेषांपासून खनिज तेल उपलब्ध होते.
ii) खनिज तेल हे ज्वलनशील असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. तसेच प्रदूषण निर्माण करते.
iii) खनिज तेलाच्या वापरामुळे प्रदूषण होते.
iv) खनिज तेलाचे साठे मर्यादित असतात.
v) खनिज तेलाद्वारे औष्णिक विद्युत निर्मिती व वाहतुकीची साधने चालविण्यासाठी उपयोग होतो.
i) सौर ऊर्जा ही सूर्यप्रकाशापासून उपलब्ध होत.
ii) सौर ऊर्जा ही प्रदूषण विरहित असल्यामुळे पर्यावरणपूरक साधन आहे.
iii) सौर ऊर्जा ही स्वच्छ व प्रदूषण विरहित ऊर्जा साधन आहे.
iv) सौरऊर्जा ही विफल प्रमाणात उपलब्ध होते.
v) सौर ऊर्जेद्वारा कुकर, दिवे, हिटर, वाहने इ. उपकरणे चालवता येतात.

2) जलऊर्जा व भुगर्भीय ऊर्जा

उत्तर :

जलऊर्जाभुगर्भीय ऊर्जा
i) जलऊर्जा ही भूगर्भीय ऊर्जेच्या मानाने कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
ii) जलऊर्जेचा वापर करणे हे पर्यावरणपूरक असते.
iii) जलऊर्जा निर्मिती करण्यासाठी जास्त खर्च येत नाही.
i) भूगर्भीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
ii) परंतु भूगर्भीय ऊर्जा साधन वापरणे हे त्यामानाने कमी पर्यावरणपूरक असते.
iii) त्यामानाने भूगर्भीय ऊर्जा निर्मिती करण्यासाठी अधिक खर्च येतो.

Leave a Comment