प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा.
1. शिकणे कधी ………………… चुका.
उत्तर :
शिकणे कधी संपत नाही, होऊ द्या लाख चुका.
2. क्रिकेटची …………………… ?
उत्तर :
क्रिकेटची बॅट लाकडी का ?
3. खोकल्याची ………………… ?
उत्तर :
खोकल्याची उबळ येते का ?
4. सर्दीत …………………….. ?
उत्तर :
सर्दीत नाक गळते का ?
5. मेंदूला …………………. ?
उत्तर :
मेंदूला वास कळतो का ?
6. रंगीत तारे ……………… ?
उत्तर :
रंगीत तारे असतात का ?
7. दिवसा तारे ……………….. ?
उत्तर :
दिवसा तारे दिसतात का ?
8. माणसासारखा ………………… ?
उत्तर :
माणसासारखा माणूस दिसेल का ?
प्रश्न. 2. कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) कुत्रा | अ) चमचम करणे |
2) पेंग्विन | आ) वेडीवाकडी चाल |
3) साप | इ) तोकडी मान |
4) वटवाघूळ | ई) पाण्यात तरणे |
5) मासे | उ) दिव्यावर मरणे |
6) पतंग | ऊ) रात्रीचे फिरणे |
7) काजवा | ए) वाकडी शेपूट |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) कुत्रा | ए) वाकडी शेपूट |
2) पेंग्विन | इ) तोकडी मान |
3) साप | आ) वेडीवाकडी चाल |
4) वटवाघूळ | ऊ) रात्रीचे फिरणे |
5) मासे | ई) पाण्यात तरणे |
6) पतंग | उ) दिव्यावर मरणे |
7) काजवा | अ) चमचम करणे |
प्रश्न. 3. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
अ) तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो. तुम्ही काय कराल ?
उत्तर :
आम्ही त्याला शुद्ध कसे लिहावे ते समजून सांगू.
आ) वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन:पुन्हा होतात ? त्या टाळण्यासाठी काय कराल ?
उत्तर :
वाचन करताना आमच्या चुका पुन्हा पुन्हा होत नाहीत कारण आम्ही तशी काळजी घेतो.
प्रश्न. 4. या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न तुम्हांला कधी पडतात का ? याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हांला पडतात ? त्या प्रश्नांची यादी करून पालक, शिक्षक पालक, शिक्षक, मित्रमैत्रिणींना दाखवा. चर्चा करून उत्तरे मिळवा. वर्गात सांगा.
उत्तर :
या कवितेतील प्रश्नासारखे प्रश्न कधीकधी आम्हांलाही पडतात.
i) लहानशा झुरळालाही बायका का घाबरतात.
ii) बकऱ्या कुत्र्यासारख्या का भुंकत नाहीत ? चिमणी कावळ्याप्रमाणे मेलेल्या ढोराचे मांस का खात नाही ?
प्रश्न. 5. शिकणे कधी संपत नाही, असे तुम्हांला वाटते का ? खालील व्यक्तींकडून, प्राण्यांकडून, निसर्गातील विविध गोष्टींतून तुम्ही काय काय कराल ते लिहा.
1) आई 2) वडील 3) झाडे 4) पर्वत 5) नदी 6) गाढव 7) कुत्रा
उत्तर :
1) आईकडून भिकाऱ्यांबद्दल द्या.
2) वडिलांकडून शिस्त
3) झाडाकडून परोपकार
4) पर्वताकडून खंबीरपणा
5) नदीकडून-प्रवाहीपणा
6) गाढवाकडून सोशिकपणा आणि
7) कुत्र्याकडून प्रामाणिकपणा आम्ही शिकू