छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय
छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या ?
उत्तर :
पावसाळ्यात पाऊस पडला नाही आणि उन्हाची तल्खली वाढली म्हणून कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
आ) लोक शाहूमहाराजांविषयी काय बोलू लागले ?
उत्तर :
‘इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आलं,’ असं ;लोक शाहूमहाराजांविषयी बोलू लागले.
इ) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ?
उत्तर :
‘विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा’ असा पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी आदेश दिला.
ई) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली ?
उत्तर :
रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी ‘शिशू संगोपनगृह’ ही योजना सुरू केली.
प्रश्न. 2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) शाहूमहाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला ?
उत्तर :
महाराष्ट्रभर दुष्काळाने थैमान घातले. जनावरे उपाशी पडली. शेतकऱ्यांचे काळीज दगडाचे झाले. गावपांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली होती. गोरगरीब करपून जायला लागले होते. गावंच्या गावं ओस पडायला लागली होती. म्हणून शाहूमहाराजांचा जीव वरखाली होऊ लागला.
आ) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला ? त्याठिकाणची परिस्थिती कशी होती ?
उत्तर :
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती. महाराजांच्या कानावर प्रजेचं गाऱ्हाण येत होतं. तेथील परिस्थिती अशी दयनीय होती.
इ) महाराजांनी व्यापऱ्यांना कोणती विनंती केली ?
उत्तर :
तुम्ही धान्याच्या किंमती कमी करा. खरेदीच्या किंमतीत प्रजेला धान्य दिलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ पण धान्याच्या किंमती कमी करा अशी महाराजांनी व्यापऱ्यांना विनंती केली.
ई) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोई केल्या ?
उत्तर :
महाराजांनी छावण्या उभारून जित्राबांना छावण्यात आणले. त्यांना वैरण, दाणागोटा देऊ लागले. सरकारी थट्टीत जित्राबं जगली. संस्थांनच्या मालकीच्या जंगलात गुरं चारायला मोकळीक दिली. जित्राबांसाठी महाराजांनी ह्या सोई केल्या.
उ) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले ?
उत्तर :
केवळ माणसांना धान्य व जनावरांना चारा देणे एवढ्यावर भागत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला पैसा लागतो म्हणून शेतकऱ्यांना पैसा देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले.
ऊ) महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम का दिला.
उत्तर :
रोजगार हमी योजनेच्या कामावर बायका येत होत्या. त्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली आणि इकडे तिकडे फिरत होती, उपाशी होती, रडत होती. त्यांची नीट व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी शिशु संगोपनगृह चालू करण्याचा हुकूम लिहा.
प्रश्न. 3. खाली दिलेले शब्द वाचा व पुन्हा लिहा.
उत्तर :
तल्खली, अस्मानी, हाहाकार, संस्थान, जित्राबंम् हद्द, चिल्लीपिल्ली, छावण्या, हुकूम.
प्रश्न. 4. या पाठामध्ये ‘बिनव्याजी’ हा शब्द आला आहे. तुम्हांला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.
उत्तर :
बिनधास्त, बिनमिठाचे, बिनसाखरेचा, बिनदांडीचा (कप) बिनतोड, बिनधोक, बिनशत, बिनबुडाचा
प्रश्न. 5. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ) दुष्काळ X
उत्तर :
दुष्काळ X सुकाळ
आ) सुपीक X
उत्तर :
सुपीक X नापीक
इ) लक्ष X
उत्तर :
लक्ष X दुर्लक्ष
ई) तोटा X
उत्तर :
तोटा X नफा
उ) स्वस्त X
उत्तर :
स्वस्त X महाग
खालील वाक्यांतील क्रियापदे अधोरेखित करा.
1. समीरने पुरणपोळी खाल्ली.
उत्तर :
समीरने पुरणपोळी खाल्ली.
2. शाळा सुरू झाली.
उत्तर :
शाळा सुरू झाली.
3. मुलींनी टाळ्या वाजवल्या.
उत्तर :
मुलींनी टाळ्या वाजवल्या.
4. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
उत्तर :
शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले.
5. रमेशने अभ्यास केला.
उत्तर :
रमेशने अभ्यास केला.
6. वैष्णवी सुंदर गाते.
उत्तर :
वैष्णवी सुंदर गाते.
कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्ये पूर्ण करा.
(लागला, गेले, सोडले, करतात)
1. तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात ………………
उत्तर :
तिचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले.
2. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध …………….
उत्तर :
एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात.
3. त्याने घर ………………. व तो रामटेकच्या जंगलात भटकू ………………..
उत्तर :
त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला.