अति तिथं माती स्वाध्याय

अति तिथं माती स्वाध्याय

अति तिथं माती स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली ?

उत्तर :

संगीताला उत्तेजन देण्यासाठी प्रत्येकाने गाण्यातच बोलले पाहिजे अशी राजाने आज्ञा केली.

आ) जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही ?

उत्तर :

जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण त्याला त्यावेळी गाणे सुचले नाही.

इ) ही नाटिका तुम्हांला वर्गात सादर करायची आहे. त्यासाठी किती मुले लागतील ?

उत्तर :

ही नाटिका सादर करायला सेवक, राजा, प्रधान, गवई, दोन पहारेकरी, नवरा, बायको, राणी असे एकूण नऊ मुले लागतील.

प्रश्न. 2. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते, हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते ?

उत्तर :

‘गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. साथीच्या रोगानं शेपाचशे माणसे गेली या वाक्यांवरून चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे दिसून येते.

आ) या पाठातील कोणती वाक्ये वाचून तुम्हांला हसू येते ?

उत्तर :

‘पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा. मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याला कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही ही त्याच्याकडून लिहून घ्या.’ ही वाक्ये वाचून आम्हांला हसू येते.

इ) चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, हे कोणत्या वाक्यांवरून कळते ?

उत्तर :

‘गवईबुवा, तुम्हाला काय येतं ? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा’ या वाक्यांवरून चक्रमादित्य राजाला संगीताचे अजिबात ज्ञान नव्हते, ही कळते.

ई) महाराजांची कोणती आज्ञा अमलात आणणे शक्य नाही, असे तुम्हांला वाटते ? असे का वाटते ?

उत्तर :

‘आता जो कुणी गाईल त्याला सुळावर चढवण्यास येईल’ ही महाराजांची आज्ञा अमलात आणणे शक्य नाही असे आम्हांला वाटते. कारण गाणे हे मानवी जीवनाचे आवश्यक अंग आहे. मुले गाण्याच्या भेंड्या खेळतात, गाण्याच्या स्पर्धा होतात, सिनेमा, रेडिओ, टीव्ही यातही गाणे असते. ही सारे बंद करता येणे शक्य नाही.

उ) या पाठाला ‘अति तिथं माती’ हे नाव का दिले असावे ?

उत्तर :

कलेला उत्तेजन देणे चांगले पण त्याच्या अतिरेकाचे दुष्पपरिणाम या पाठात दाखवले आहेत. त्याविरुद्ध अजिबात गाऊ नये हाही अतिरेक वाईटच. अतिरेकाचे दुष्पपरिणाम या पाठात दाखवले आहेत. म्हणून या पाठाला ‘अति तिथं माती’ हे नाव दिले असावे.

प्रश्न. 4. वाक्यात उपयोग करा.

अ) साखरेसारखा गोड

उत्तर :

साखरेसारखा गोड – अतिशय मधुर

वा. उ. – लता मंगेशकरचा आवाज साखरेसारखा गोड आहे.

आ) उत्तेजन देणे

उत्तर :

उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे

वा. उ. – अवंतीने नृत्यकला शिकावी यासाठी आईवडिलांनी तिला उत्तेजन दिले.

इ) हसून हसून पोट दुखणे

उत्तर :

हसून हसून पोट दुखणे – पोट दु:खेपर्यंत हसणे. खूप हसणे

वा. उ. – सुशील विनोद करतो तेव्हा आमचे हसून हसून पोट दुखते.

प्रश्न. 5. खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा.

अ) तुम्हांला करमत नाही, हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात.

उत्तर :

करमत नाही आज मला मी सांगू कसे कुणाला ?

आ) शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहेत.

उत्तर ;

करुनिया गृहपाठ आणारे

नाहीतर वर्गाबाहेर घालवीन रे |

इ) रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे.

उत्तर :

घ्या हो स्वस्त चमकदार माल

नाही तर तुम्हीच पस्तावाल |

प्रश्न. 6. वांग्यांसाठी, कांद्यांसाठी कोणकोणती विशेषणे या पाठात आलेली आहेत ? वांगी, कांदे यांसाठी तुम्ही आणखी कोणती विशेषणे वापराल ?

उत्तर :

पाठ्यपुस्तकातील विशेषणे – वांगी – शेर दोन शेर, छान, सुरेख.

कांदे – पांढरा फेक, स्वच्छ, सुरेख.

आमची विशेषणे – वांगी – ताजी, टवटवीत, हिरवी

कांदे – शुभ्र, छान, पाल्याचे

प्रश्न. 7. तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा.

उत्तर :

आंबा – गोड, केळी – पिकलेल्या, भाजी – चविष्ट, पाणी – गार, उशी – नरम

प्रश्न. 8. चोरीमारी, गोरगरीब यांसारखे पाठातील व इतर जोडशब्द शोधा. लिहा.

उत्तर ;

पैसाअडका, धनदौलत, पाऊसपाणी, सामानसुमान, केरकचरा

प्रश्न. 9. खालील शब्द असेच लिहा.

उत्तर :

उत्कृष्ट, उत्तम, कार्यक्रम, स्वत:ला, उत्तेजन, पुन्हा, प्रिय

प्रश्न. 10. अ आणि ब या चौकटींत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्यांच्या जोड्या जुळवून लिहा.

प्रत्येक जोडीसाठी एक-एक वाक्य लिहा.

उदा., जवळ X दूर

शाळा माझ्या घरापासून जवळ आहे आणि दवाखाना माझ्या घरापासून दूर आहे.

‘अ’ गट‘ब’ गट
रुंद, गोरगरीब, रोख, सुंदर, हजर, मान, भरभर, उद्योगीअरुंद, श्रीमंत, गैरहजर, अपमान, सावकाश, आळशी

उत्तर :

रुंद X अरुंद – माझ्या घराकडे येणारी बोळ रुंद आहे रामच्या घराकडे जाणारी बोळ अरुंद आहे.

गोरगरीब X श्रीमंत – गोरगरिबांना खायला मिळत नाही आणि श्रीमंत लोक हॉटेलमध्ये पैसे उधळतात.

रोख X उधार – पैशाचा व्यवहार रोख करावा, उधारीचा व्यवहार करू नये.

सुंदर X कुरूप – सीता सुंदर होती, शूर्पणखा कुरूप होती.

हजर X गैरहजर – वर्गात हजर राहावे, गैरहजर राहू नये.

मान X अपमान – अतिथींचा मान करावा, अपमान करू नये.

भरभर X सावकाश – भरभर चालावे, सावकाश जेवावे.

उद्योगी X आळशी – माणसाने उद्योगी असावे, आळशी राहू नये.

Leave a Comment