सर्वासाठी अन्न स्वाध्याय

सर्वासाठी अन्न स्वाध्याय

सर्वासाठी अन्न स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. काय करावे बरे ?

कुंडीतील रोप वाढत नाही.

उत्तर :

कुंडीतल्या कुडीत रोपांना योग्य पोषक घटक मिळत नाही म्हणून कुंडीतील माती खोरून खालीवर करावी. त्यात खत मिसळवावे. तसेच सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळेल अशा ठिकाणी ते ठेवावे. योग्य त्याच वेळी पाणी द्यावे.

2. जरा डोके चालवा.

घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो ?

उत्तर :

विशिष्ट ऋतूतील धान्य इतर ऋतूत महाग होतात. एकदा घेतलेले धान्य वर्ष दोन वर्ष पुरले पाहिजे. म्हणून घरामध्ये अन्नधान्याचा साठा केलेला असतो.

3. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

अ) शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे.

चूक – शेती करण्याच्या दोन पद्धती आहे. पारंपरिक पद्धत व आधुनिक पद्धत.

आ) आपला भारत देश शेतीप्रधान आहे.

उत्तर :

बरोबर

इ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही.

उत्तर :

चूक – सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते.

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात ?

उत्तर :

सुधारित बियाणांच्या वापरामुळे पुढील फायदे होतात.

i) सुधारित बियाणी अधिक पीक देतात.

ii) किडीला बळी पडत नाहीत.

iii) काही बियाण्यांपासून पिकांनी वाढ झपाट्याने होते.

iv) काही बियाणी कमी पाण्यातही भरघोस पीक देतात.

आ) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या ? त्यांचे फायदे कोणते ?

उत्तर :

ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित (आधुनिक) पद्धती आहे.

इ) ठिंबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.

उत्तर :

ठिंबक सिंचन पद्धतीमध्ये छिद्रे असलेल्या नलिका वापरतात. त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होतो.

ई) कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते ?

उत्तर :

किडीमुळे किंवा रोग पडून वाढत्या पिकांचे नुकसान होते.

उ) पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात ?

उत्तर :

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकांवर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यांवर औषधे चोळतात. इत्यादी उपाय योजतात.

ऊ) जमिनीचा कस कशामुळे कमी होतो ?

उत्तर :

एकाच जमिनीवर वारंवार पिके घेतल्याने, रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने, तसेच शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनीचा कस कमी होतो.

ए) आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत ?

उत्तर :

i) पूर्वी शेतीची कामे शेतकरी स्वतः किंवा बैलाच्या मदतीने करीत असे. परंतु आता शेतकरी कापणी, मळणी यांसारखी कामे यंत्राच्या साहाय्याने करतो.

ii) सुधारित बियाणांमुळे पिकांत वाढ झाली.

iii) सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमुळे मोटे ऐवजी यंत्राने पिकांना योग्य तेवढेच पाणी दिल्या जाते व पाण्याची बचत होते. अशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत असे बदल झाले आहे.

ऐ) कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते ?

उत्तर :

धान्य पुढील पद्धतीने टिकवता येते.

i) धान्य उन्हात वाळवावे.

ii) धान्य साठवणीच्या जागी योग्य ती औषधे फवारणे किंवा धान्यसाठ्याभोवती पसरवणे.

iii) धान्यसाठ्यात कडूनिंबाला पाला घालणे.

iv) धान्यसाठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषध मिळतात. त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही.

v) धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवावी. तसेच हवा खेळती राहील याची काळजी घेणे.

ओ) शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते ?

उत्तर :

पावसाबरोबरच नदी, तलाव, विहिरी तसेच नद्यांवर धरणे बांधून, पावसाचे पाणी अडवून पाणी साठविले जाते. अशा सर्व ठिकाणांहून शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाते.

5. जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) दमट हवेतील धान्यसाठा अ) धान्याला बुरशी न लागणे.
2) कोरड्या हवेतील धान्यसाठा आ) कीड-मुंगी न लागणे.
3) धान्यसाठ्यात औषधे ठेवणे. इ) बुरशी लागणे

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) दमट हवेतील धान्यसाठा इ) बुरशी लागणे
2) कोरड्या हवेतील धान्यसाठा अ) धान्याला बुरशी न लागणे.
3) धान्यसाठ्यात औषधे ठेवणे. आ) कीड-मुंगी न लागणे.

Leave a Comment