पर्यावरण आणि आपण स्वाध्याय
पर्यावरण आणि आपण स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. काय करावे बरे ?
नदी, तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे.
उत्तर :
नदी, तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली तर ती जलपर्णीची चादर काढावी लागेल. जेणेकरून पाण्यातील सजीवापर्यंत सूर्यप्रकाश पोहचू शकेल.
2. जरा डोके चालवा.
एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल ? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल ? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल ?
उत्तर :
एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर सापांची संख्या वाढेल. उंदीर, घुशी व चिमण्यांसारखे छोटे पक्षी यांची संख्या वाढेल.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) स्थलांतर म्हणजे काय ?
उत्तर :
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणे, यालाच स्थलांतर असे म्हणतात.
आ) पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा.
उत्तर :
घरटी बांधणे, अंडी घालणे, पिले मोठी झाली की पिलांसह परत दुसऱ्या ठिकाणी जाणे.
इ) हवा प्रदूषणाची दोन कारणे लिहा.
उत्तर :
i) इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो. त्यामुळे हवा प्रदूषण होते.
ii) उद्योगधंद्यांतूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
ई) जमिनीवरच्या उपलब्ध वन क्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो ?
उत्तर :
जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण रस्ते बांधणे, वसाहती, उद्योगधंदे, शेती तसेच लोहमार्ग तयार करण्यासाठी करतो.
4. कारणे लिहा.
अ) जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
उत्तर :
कारण – i) मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत.
ii) पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला, तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
आ) वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
उत्तर :
कारण – i) वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नांस माणूस अधिकाधिक जमीन व जलस्त्रोत वापरत आहे.
ii) शेती, वसाहती, उद्योगधंदे, तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते.
iii) पृथ्वीतलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते. अशाप्रकारे वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
5. चूक की बरोबर ते लिहा.
अ) अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो.
उत्तर :
बरोबर
आ) जैवविविधता जपणे आवश्यक आहे.
उत्तर :
बरोबर
6. खाली दिलेल्या वस्तू/पदार्थ/घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा.
माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फीन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट
उत्तर :
मानवनिर्मित | निसर्गनिर्मित |
---|---|
पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट | माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फीन, पाणी, कापूस, झाडे |