वदनी कवळ घेता स्वाध्याय
वदनी कवळ घेता स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मते लिहा.
उत्तर :
श्रुती नाराज झाली होती. परिणामी घरी आल्यावर तिने आपल्या पानातील फक्त एक गुलाबजाम खाल्ला आणि उरलेल्या सर्व पदार्थासहित आपली डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. आमच्या मते ही तिने फार मोठी चूक केली. माणूस कितीही नाराज असला तरी त्याने ती नाराजी अन्नावर काढू नये. व चुकीच्या वाटेने जाऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे.
प्रश्न. 2. आई श्रुतीवर का रागावली ?
उत्तर :
श्रुतीला खायचं नव्हतं तर तिने ती अन्नभरली डिश आईला द्यायला हवी होती. पण तसे न करता तिने ती बेसिनमध्ये ठेवली. म्हणून श्रुतीवर आई रागावली.
प्रश्न. 3. श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला ?
उत्तर :
कधीही अन्न न टाकण्याचा नवीन वर्षाचा संलल्प श्रुतीला सुचला.
प्रश्न. 4. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मुखी घास घेता करावा विचार |
कशासाठी हे अन्न मी सेविणार ||
उत्तर :
आपण मुखात जेवणाचा घास घेत असताना ‘मी कशासाठी हे अन्न सेवन करत आहे’, याचा विचार केला पाहिजे. कारण कोणाला जेवणासाठी जगायचे असते, आणि त्यासाठी अन्न घेणे आवश्यक असते. याचा विचार जेवण घेत असताना करायला हवा.
खालील काही कृती दिलेल्या आहेत. त्या योग्य की अयोग्य आहेत ते ठरवा. पुढे दिलेल्या चौकटींमध्ये ते नोंदवा.
अ) वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्या वेळी अनुजाने स्वत:च्या डब्यातील पोळीभाजी तिला दिली.
उत्तर :
योग्य
आ) राजेंद्र सतत बाहेरचे जंकफूड खातो.
उत्तर :
अयोग्य
इ) यास्मिन टीव्ही बघत जेवण करते.
उत्तर :
अयोग्य
ई) आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो.
उत्तर :
योग्य
उ) पीटर जेवताना खूपच बडबड करतो.
उत्तर :
अयोग्य
ऊ) रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते.
उत्तर :
योग्य
आपण समजून घेऊया
खालील चित्रांची नावे लिहा.
उत्तर :