जलदिंडी स्वाध्याय

जलदिंडी स्वाध्याय

जलदिंडी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.

परिणामघटना/कृती
अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. 1)
आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. 2)
इ) इतर लोक आपली घृणा विसरले. 3)

उत्तर :

परिणामघटना/कृती
अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. 1) लेखकाने मुलाला भित्रट म्हटले होते. त्याचा हा परिणाम होता.
आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. 2) शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजी पणामुळे हा परिणाम घडून आला होता.
इ) इतर लोक आपली घृणा विसरले. 3) दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला त्याचा हा परिणाम होता.

प्रश्न. 2. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 3. लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा.

उत्तर :

प्रश्न. 4. पालखीसोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उत्तर :

i) पाल

ii) लळा

iii) खिळा

iv) सोळा

प्रश्न. 5. स्वमत लिहा.

अ) नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.

उत्तर :

मैलापाणी, रसायनं, तरंगत बुडत आलेल्या टाकाऊ वस्तू नदीच्या पाण्यात मिसळणे. तसेच वापरा आणि फेका या माणसाच्या संस्कृतीला धरून जे काही आपण वापरतो आणि वापर झाल्यानंतर त्या वस्तू फेकतो त्या सर्व वस्तू नदीत जातात.

आ) पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.

उत्तर :

मोठ्या हौसेने लेखकांनी आपल्या मुलाला नौका शिकवायला नेले. होडी चालू झाली आणि वेग वाढला तेव्हा ती हेलकावू लागली. होडी उलटी होऊन आपण पाण्यात पडू की काय, असे त्या मुलाला वाटू लागले. या क्षणी तो मुलगा घाबरला. लेखकांना वाटले की तो बुडण्याला घाबरत होता. खरे तर मुलगा पट्टीचा पोहणारा होता. खडकवासला धरणातही पोहण्याचा त्याला आत्मविश्वास होता. मात्र या नदीचे पाणी प्रचंड घाण झालेले होते. येथे नाना त-हेचा केरकचरा, सांडपाणी, मलमूत्र, टाकाऊ वस्तू जमा झालेल्या होत्या. अशा पाण्यात कोणालाही उतरण्याची किळस आली असती. तीच त्या मुलाला वाटली. त्या घाण पाण्याचा त्याला स्पर्शसुद्धा नको होता. म्हणून तो पाण्यात पडायला घाबरत होता.

इ) ‘जलदिंडी’ मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणते कामे आवडीने कराल ते लिहा.

उत्तर :

मी प्रथम पोहायला शिकेन. पाण्यात कोणतेही काम करणाऱ्याला पोहता यायलाच हवे. त्याचबरोबर बुडणाऱ्याला कराव्या लागणाऱ्या युक्त्या मी शिकून घेईन. त्यानंतर मी होडी चालवायला शिकेन. जलदिंडीमध्ये वस्तूंची व माणसांची वाहतूक करण्यासाठी होडी चालवता येणे आवश्यक आहे. यामुळे जलदिंडीतील बरीचशी कामे मला करता येतील. तसेच मी साफसफाईचे कोणतेही काम अत्यंत आवडीने करीन. जलदिंडीमध्ये नको नको त्या घाण वस्तू उचलण्याची वेळ येते. मी न कंटाळता या वस्तू उचलीन. जलदिंडी चालू असताना मी नदीकाठी वेगवेगळी झाडे लावण्याचे काम करीन.

ई) ‘स्वतःचे हात वापर की कचरा काढायला’ लेखकाच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल ? सोदाहरण लिहा.

उत्तर :

दुसऱ्यांना उपदेश करून सांगितलेली कामे कधीच पार पडत नाहीत. मात्रशाळेत काही कार्यक्रम असेल तेव्हा आमचे वक्ते सर कोणाला काहीही सांगत नाहीत. तेच सतरंजीचे एक टोक उचलतात आणि पसरायला सुरुवात करतात. मग काय सर्व मुले धावतात . मग ते चार-पाच मुलांना सतरंजी पसरण्याचे काम वाटून देतात. टेबल-खुर्ची पुसायची असेल तर फडका घेतात आणि सुरुवात करतात. अशा प्रकारे वक्ते सर न बोलता काम करून घेतात, म्हणूनच लेखकांच्या आईला उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो, हेच खरे.

खेळूया शब्दांशी

अ) खालील वाक्यांतील काळ ओळखा.

अ) जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.

उत्तर :

भविष्यकाळ

आ) मदतीचा हात लगेच पुढे आला.

उत्तर :

भूतकाळ

इ) त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.

उत्तर :

भूतकाळ

ई) पंढरपूरला लोक चालत जातात.

उत्तर :

वर्तमानकाळ

आ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.

अ) पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का ?

उत्तर :

प्रश्नार्थी वाक्य

आ) पण एवढं मोठं कार्य !

उत्तर :

उद्गारार्थी वाक्य

इ) त्यांना थकवा जाणवत नव्हता.

उत्तर :

विधानार्थी वाक्य

ई) कचरा काढायला स्वतःचेच हात वापर.

उत्तर :

आज्ञार्थी वाक्य

आपण समजून घेऊया

3) द्वंद्व समास

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

1) भाजीपाला –

उत्तर :

भाजीपाला – भाजी, पाला वगैरे

2) सुखदुःख –

उत्तर :

सुखदुःख – सुख आणि दुःख

3) स्त्रीपुरुष –

उत्तर :

स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष

4) केरकचरा –

उत्तर :

केर, कचरा वगैरे

4) बहुव्रीही समास

खालील उदाहरणे अभ्यासा व त्यांतील सामासिक शब्द शोधा.

अ) चंद्र, तारे अनंत आकाशात उगवतात.

उत्तर :

अनंत – नाही अंत ज्याला तो

आ) शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले.

उत्तर :

चौकोन – चार आहेत कोन त्याला तो (चार कोनांचा समूह)

इ) लंबोदराला मोदक आवडतात.

उत्तर :

लंबोदर – लंब आहे उदर ज्याचे असा तो

ई) दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे ?

उत्तर :

निर्धन – निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

1) नीरस –

उत्तर :

नाही ज्यात उरला रस ते

2) दशमुख –

उत्तर :

दहा मुखे आहेत ज्याला असा तो.

3) निर्बल –

उत्तर :

निघून गेले आहे बळ ज्यातून तो.

4) मूषकवाहन –

उत्तर :

मूषक ज्याचे वाहन आहे असा तो.

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
अ) चहापाणी
आ) क्षणोक्षणी
इ) त्रिभुवन
ई) गजानन

उत्तर :

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
अ) चहापाणी चहा, पाणी वगैरे द्वंद्व
आ) क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला अव्ययीभाव
इ) त्रिभुवन तीन भुवनांचा समूह तत्पुरुष (द्विगू)
ई) गजानन ज्याने आनन (तोड) गजासारखे (हत्ती) आहे असा तो बहुव्रीही

Leave a Comment