फुलपाखरे स्वाध्याय
फुलपाखरे स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी
प्रश्न. 1. वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
फुलाचे नाव | देठ | पाने | फुले |
---|---|---|---|
1) झेनिया | |||
2) पारिजातक |
उत्तर :
फुलाचे नाव | देठ | पाने | फुले |
---|---|---|---|
1) झेनिया | राठ | रुक्ष | विविधरंगी |
2) पारिजातक | खडबडीत | खरखरीत | नाजूक, सुगंधी |
प्रश्न. 2. कारणे लिहा.
अ) लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण ……………..
उत्तर :
शरीराच्या अस्वास्थामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती.
आ) लेखकाच्या मनावरचे मळभ दूर झाले, कारण ……………..
उत्तर :
झेनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवननृत्य लेखकाने पाहिले.
प्रश्न. 3. योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) सृष्टी | अ) पारिजातक |
2) राठ दांडा | आ) सुफल |
3) नाजूकपणा | इ) फुलपाखरे |
4) बहुढंगी | ई) झेनिया |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) सृष्टी | आ) सुफल |
2) राठ दांडा | ई) झेनिया |
3) नाजूकपणा | अ) पारिजातक |
4) बहुढंगी | इ) फुलपाखरे |
प्रश्न. 4. पाठाच्या आधारे तुलना करा.
फुलपाखरांचे जीवन | मानवी जीवन |
---|---|
1) | 1) |
2) | 2) |
उत्तर :
फुलपाखरांचे जीवन | मानवी जीवन |
---|---|
1) मकरंदास्वाद घेणारे | 1) अडचणी व संकटे असह्य. |
2) चैतन्य व आनंदाचे जीवन नृत्य | 2) मनाची स्थिरता किंवा शांती नसते. |
प्रश्न. 5. पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
अ) या पाठातून लेखकाने दिलेला संदेश.
उत्तर :
मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याने जीवन बहारीचे बनले पाहिजे. ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये.
आ) निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात.
उत्तर :
फुले, फुलपाखरे इ. घटक मानवी जीवन आनंदी करतात. कारण या घटकात जीवनाची, आनंदाची, चैतन्याची कारंजीच थुई थुई उडत असतात. त्यामुळे मनावर आलेले मळभ नाहीसे होते व मन आनंदते.
प्रश्न. 6. ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या वचनातील विचार स्पष्ट करा.
उत्तर :
पाऊस आला की काही मुले पावसात आनंदाने नाचतात तर काही मुले भिजण्याला घाबरून घरात बसतात. तहान लागली असताना कुणी आपल्याला पाणी आणून दिले तर ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे हे पाहून काहींना आनंद होतो तर काहींना अर्धा ग्लास रिकामा असण्याचे दु:ख होते. आनंद किंवा दु:ख आपल्या दृष्टीवर अवलंबून असतात.
प्रश्न. 7. ‘भाषेतील सौंदर्य’ या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा. उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.
उत्तर :
i) ….. तितकीच सुंदर, बहुरंगी व बहुढंगी फुलपाखरे उडत होती.
ii) जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत.
iii) जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे.
खेळूया शब्दांशी
खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा.
अ) सतीश वारंवार आजारी पडतो.
उत्तर :
क्रियाविशेषण अव्यय
आ) रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती.
उत्तर :
शब्दयोगी अव्यय
इ) आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते.
उत्तर :
उभयान्वयी अव्यय
ई) शाब्बास ! तू खूप छान खेळलास.
उत्तर :
केवल प्रयोगी अव्यय
लिहिते होऊया
‘मी फुलपाखरू झालो/झाले तर…….’ या विषयावर निबंधलेखन करा.
उत्तर :
मी फुलपाखरू झालो तर ……..
मी फुलपाखरू झालो तर एखाद्या बागेत जाईन आणि नुसता या फुलावरुन त्या फुलावर बागडत राहीन. फुलावर बागडणे मला खूप आवडते. खरं तर फुलांशी खेळणे हेच तर माझे जीवन आहे.
माझे रंगीबेरंगी व विविधरंगी पंख पाहून अनेकांना हेवा वाटते. गुलाब, मोगरा, जाई, पारिजातक इत्यादी फुले केवळ एकरंगी असतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक रंग मला लाभले आहेत. झेनियाची फुले मात्र माझ्याशी रंगाच्या बाबतीत स्पर्धा करणारी असली तरी त्यांचा रसास्वाद घेता येत नाही.
मी जीवनाचा खराखुरा आस्वाद घेईन. इतर पक्ष्यांसारखा नुसता हवेत उडणार नाही. जीवनाचा आस्वाद घ्यायचा म्हणजे कुणाशी तरी मैत्री जोडावी लागते. फुलांशी मी कायम मैत्री करीन.
एक मुलगी तर मलाच विविधरंगी फूल समजून तोडायला माझ्याजवळ आली. मी पटकन उडलो. तेव्हा तिच्या लक्षात आले की मी फूल नसून फुलपाखरू आहे. पण याच घटनेने आपण फुलापेक्षाही सुंदर दिसतो, याची जाणीव मला झाली आणि मला माझ्या रंगांचा अभिमानही वाटला.
आमचे आयुष्य फारच अल्प असते. पण त्याचे मला मुळीच दु:ख वाटत नाही. कारण जीवन किती जगलो यापेक्षा ते कसे जगलो, हेच महत्त्वाचे असते.
शब्दकोडे सोडवूया
खालील शब्दकोड्यामध्ये नामे, सर्वनामे, विशेषणे व क्रियापदे लपली आहेत, ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा.
उत्तर :
नामे | रमेश, साक्षी, नयन, निरजा, रश्मी, तुषार, अनया |
सर्वनामे | त्याला, आम्ही, तुम्ही, तो, तुला, मी |
विशेषणे | सुंदर, कल्पक, टवटवीत, हुशार, ताजातवाना |
क्रियापदे | जाणे, राहणे, करणे |
आपण समजून घेऊया
खालील वाक्ये वाचा व अभ्यासा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
अ) चंद्राचा उदय झाला. | इ) चंद्रोदय झाला. |
आ) दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. | ई) दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली. |
उत्तरे लिहा.
अ) दोन्ही गटांतील वाक्याचा अर्थ एकच आहे का ?
उत्तर :
होय
आ) दोन गटांतील शब्द सारखे आहेत का ?
उत्तर :
नाही
इ) ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा.
‘अ’ गट – साधे शब्द
‘ब’ गट – सामासिक शब्द