बल व बलाचे प्रकार स्वाध्याय
बल व बलाचे प्रकार स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान
1. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा.
अ. …………….. वस्तूची ……………. बदलण्यासाठी ………………. लावावे लागते.
(बल, गतिमान, दिशा)
उत्तर :
गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते.
आ. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर ………….. , …………. व……………. ही बले लावलेली असतात.
(स्नायू बल, यांत्रिक बल, गुरूत्वीय बल, घर्षण बल)
उत्तर :
हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर स्नायू बल, घर्षण बल व गुरूत्वीय बल ही बले लावलेली असतात.
इ. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची …………… बदलायची असेल, तर त्यावर …………… लावावे लागेल.
(बल, गती, गुरुत्वाकर्षण)
उत्तर :
एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची गती बदलायची असेल, तर त्यावर बल लावावे लागेल.
ई. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या ……………. कार्य करते.
(दिशेने, विरोधात)
उत्तर :
घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते.
2. शोधा पाहू, माझा सोबती कोण ?
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1. बैलाने गाडी ओढणे. | अ. चुंबकीय बल |
2. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. | आ. स्थितिक विद्युत बल |
3. ताणकाट्याने वजन करणे. | इ. स्थानू बल |
4. सायकलला ब्रेक लावणे. | ई. गुरूत्वीय बल |
5. घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे. | उ. घर्षण बल |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1. बैलाने गाडी ओढणे. | इ. स्थानू बल |
2. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. | अ. चुंबकीय बल |
3. ताणकाट्याने वजन करणे. | ई. गुरूत्वीय बल |
4. सायकलला ब्रेक लावणे. | उ. घर्षण बल |
5. घासलेल्या प्लॅस्टिक पट्टीने कागदाचे कपटे उचलणे. | आ. स्थितिक विद्युत बल |
3. खालील उदाहरणांमध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा.
अ. उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू –
उत्तर :
गुरूत्वीय बल
आ. आकाशातून जाणारे विमान –
उत्तर :
यांत्रिक बल
इ. उसाच्या चरकातून रस काढताना –
उत्तर :
घर्षण बल, स्नायू बल, यांत्रिक बल
ई. धान्य पाखडले जात असताना –
उत्तर :
स्नायू बल, गुरूत्वीय बल
4. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अ. स्नायू बल
उत्तर :
स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल म्हणतात. उदा. ऊसाच्या चरकातून रस काढणे, धान्य पाखडणे, वजन उचलणे या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या साहाय्याने हालचाली घडून येतात.
आ. गुरूत्वीय बल
उत्तर :
पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास ‘गुरूत्वीय बल’ म्हणतात. एखादी वस्तू बल लावून वर फेकली, की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. ती गुरूत्वीय बलामुळे. पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. उदा. झाडावरील फळे जमिनीवर पडणे. वर फेकलेला चेंडू परत खाली येणे.
इ. यांत्रिक बल
उत्तर :
यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो. उदा. शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर.
ई. स्थितिक विद्युत बल
उत्तर :
घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट यांसारख्या पदार्थावर विद्युतभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते. त्याला ‘स्थिनिक विद्युत बल’ म्हणतात. उदा. प्लॅस्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून कागदाच्या बारीक तुकड्यांवर फिरवून पहा. स्थितिक विद्युत बलामुळे ते कागदाचे तुकडे उचलले जातात.
उ. घर्षण बल
उत्तर :
दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले गेले की त्यामध्ये घर्षण निर्माण होते. त्यालाच ‘घर्षण बल’ म्हणतात. उदा. सायकल चालवतांना ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल थांबते. सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन बसतो.
ऊ. चुंबकीय बल
उत्तर :
चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला ‘चुंबकीय बल’ म्हणतात. उदा. टेबलावर एक चुंबक ठेवा. एक लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या. तो खिळा चुंबकाला चिकटतो.
5. असे का ?
अ. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.
उत्तर :
i) अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्राचा वापर करतो. या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते.
ii) यंत्रांना तेल दिले नसेल तर त्याच्या निरनिराळ्या भागांचे घर्षण होते. त्यामुळे यंत्राचे घर्षण बल वाढते. यंत्राच्या कामाच्या गतीला विरोध होईल. यंत्रे सुरळीत चालायला हवी यासाठी यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते.
आ. वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.
उत्तर :
i) पृथ्वी आपले बल लावून वस्तूंना खेचते त्यास गुरूत्वीय बल म्हणतात.
ii) पृथ्वीवरून वर फेकलेली प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खालच्या दिशेला खेचली जाते. म्हणून वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते.
इ. कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.
उत्तर :
i) कॅरम खेळताना कॅरम बोर्डवरून सोंगट्या लवकर घसरल्या पाहिजे. कॅरम बोर्ड आणि सोंगटी यामध्ये घर्षण निर्माण होते.
ii) हे घर्षण बल कमी होऊन सोंगट्याची घसरण्याची गती वाढावी. यासाठी कॅरम बोर्डवर पावडर टाकतात.
ई. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.
उत्तर :
i) रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग गुळगुळीत असला तर तो एकमेकांवरून सहज घासता येतात. त्यांमध्ये घर्षण बल कमी असल्याने लोक पाय घसरून पडतील.
ii) आणि खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येत नाही, त्यामधील घर्षण बल कमी असते. असे पाय घसरून पडून नये व सर्वजण सुरक्षित राहावे. यासाठी रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो.
6. आमच्यातील वेगळेपणा काय ?
अ. स्नायू बल व यांत्रिक बल
उत्तर :
स्नायू बल | यांत्रिक बल |
---|---|
i) स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला ‘स्नायू बल’ म्हणतात. ii) स्नायू बल हे शरीरात असते. iii) स्नायू बलासाठी अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर केला जातो. | i) यंत्राच्या साहाय्याने लावलेल्या बलाला ‘यांत्रिक बल’ म्हणतात. ii) यांत्रिक बल हे यंत्रात असते. iii) यांत्रिक बलासाठी इंधन किंवा विद्युत ऊर्जेचा वापर केला जातो. |
आ. घर्षण बल व गुरूत्वीय बल
उत्तर :
घर्षण बल | गुरूत्वीय बल |
---|---|
i) घर्षण बल हे दोन वेगवेगळया पृष्ठभागापासून निर्माण होते. ii) घर्षण बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूच्या गतीच्या विरोधात कार्य करते. | i) गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निर्माण होतो. ii) पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. |
7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. बल लावून काय काय करता येते ?
उत्तर :
i) वल्ह्याच्या साहाय्याने नाव पाण्यात पुढे नेता येते.
ii) बैलागाडी पुढे जाण्यासाठी मदत होते.
iii) फुटबॉल खेळता येतो.
iv) वजन उचलता येते.
v) सायकल चालवणे.
vi) गाडी चालवणे.
vii) वस्तूचा आकार बदलता येतो.
viii) शिलाई मशीन वर कपडे शिवता येतात.
ix) ओझे वाहता येतात.
x) कॅरम खेळता येतो.
xi) लाकडी फळीनी चिखलात अडकलेली गाडी बाहेर काढता येते.
आ. वजन म्हणजे काय ?
उत्तर :
वस्तूवरील गुरूत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. उदा. ताण. काट्यावर टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते, त्याच वेळी स्प्रिंगच्या ताणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्या वेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते म्हणजेच वस्तूचे वजन समजते.
इ. स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती ?
उत्तर :
वल्ह्याच्या साहाय्याने नाव पाण्यात पुढे ढकलणे. धान्य पाखडणे, हातगाडी, सायकल चालवणे, सायकल शिक्षा, बैलगाडी ही स्थायू बलाने चालणारी यंत्रे आहेत.
8. खालील शब्दकोडे सोडवा.
उभे शब्द
1. बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी ………………. बल लावावे लागते.
2. सांडलेल्या पिना उचलण्यासाठी…………… बलाचा उपयोग करता येतो.
आडवे शब्द
3. ………….. लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो.
4. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा ……………. बल लावले गेले.
5. ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर …………….. बलामुळे पडतात.