गती व गतीचे प्रकार स्वाध्याय

गती व गतीचे प्रकार स्वाध्याय

गती व गतीचे प्रकार स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. गतीचे प्रकार ओळखा.

अ. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ……………

उत्तर :

नियतकालिक गती

आ. छताला टांगलेला फिरणारा पंखा ……………

उत्तर :

वर्तुळाकार गती

इ. आकाशातून पडणारी उल्का ……………

उत्तर :

एकरेषीय गती

ई. जमिनीवरून उडवलेले रॉकेट ……………

उत्तर :

एकरेषीय गती

उ. पाण्यात पोहणारा मासा ……………..

उत्तर :

यादृच्छित गती

ऊ. सतारीची छेडलेली तार …………….

उत्तर :

आंदोलित गती

2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(एकरेषीय, नैकरेषीय, वर्तुळाकार, एकरेषीय समान, एकरेषीय असमान, समान वर्तुळाकार, असमान वर्तुळाकार, यादृच्छिक)

अ. इमारतीच्या गच्चीवरुन चेंडू सोडून दिल्यास तो …………….. गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो ……………. गतीने जमिनीवर येईल.

उत्तर :

इमारतीच्या गच्चीवरुन चेंडू सोडून दिल्यास तो एकरेषीय समान गतीने खाली येतो तर गच्चीला समांतर रेषेत गच्चीबाहेर जोरात फेकल्यास तो नैकरेषीय गतीने जमिनीवर येईल.

आ. धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती …………….. असते.

उत्तर :

धावपट्टीवरून धाव घेणाऱ्या विमानाची गती एकरेषीय असते.

इ. आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार …………….. गतीने उडते.

उत्तर :

आकाशातून भक्ष्याचा शोध घेत उडणारी घार वर्तुळाकार गतीने उडते.

ई. फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती ……………., तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती ………….. असते.

उत्तर :

फिरत असलेल्या आकाशपाळण्यामध्ये बसलेल्या मुलांची गती समान वर्तुळाकार, तर मेरी गो राऊंडमध्ये बसलेल्या मुलांची गती असमान वर्तुळाकार असते.

3. आमच्यातील वेगळेपण काय ?

अ. आंदोलित गती व रेषीय गती

उत्तर :

आंदोलित गतीरेषीय गती
i) आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला ‘आंदोलित गती’ असे म्हणतात.
ii) उदा. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, घड्याळाचा फिरणारा लंबक.
i) एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनास ‘रेषीय गती’ म्हणतात.
ii) उदा. रेल्वेगाडी, रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने.

आ. रेषीय गती व यादृच्छिक गती

उत्तर :

रेषीय गती यादृच्छिक गती
i) एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने होत असलेल्या वस्तूच्या विस्थापनास ‘रेषीय गती’ म्हणतात.
ii) रेषीय गती ही एका सरळ रेषेतच गती दाखवितात.
उदा. रेल्वेगाडी, सैनिकांचे संचलन.
i) ज्या वस्तूच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते, त्या गतीला ‘ यादृच्छिक गती’ म्हणतात.
ii) यादृच्छिक गतीतील वस्तू एका सरळ रेषेत जात नाही या गतीची दिशा व चाल बदलत असते.
उदा. रांगणारे बाळ, भटकी जनावरे.

इ. यादृच्छिक गती व आंदोलित गती

उत्तर :

यादृच्छिक गती आंदोलित गती
i) ज्या वस्तूच्या गतीला कोणतीही निश्चित दिशा नसते, त्या गतीला ‘ यादृच्छिक गती’ म्हणतात.
ii) यादृच्छिक गतीची दिशा व चाल बदलत असते.
उदा. रांगणारे बाळ, पंखा.
i) आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला ‘आंदोलित गती’ असे म्हणतात.
ii) आंदोलित गतीला निश्चित दिशा असते.
उदा. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल, झोपाळ्याचा झोका.

4. प्रत्येकी एका उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

अ. रेषीय गती

उत्तर :

i) एकाच रेषेत वस्तूचे विस्थापन होत असेल, तर त्या वस्तूच्या गतीला ‘रेषीय गती’ असे म्हणतात.

ii) रेषीय गती दोन प्रकारची असते.

1) रेषीय एकसमान गती

2) रेषीय असमान गती

iii) उदा. खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. सैनिकांच्या संचलनाची गती ही ‘रेषीय एकसमान गती’ आहे. व घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ‘रेषीय असमान गती’ असते.

आ. आंदोलित गती

उत्तर :

i) आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.

ii) आंदोलित गती ही नैकरेषीय गतीचा प्रकार आहे.

iii) उदा. झोपाळा नेहमी एका टोकाकडून परत येतो. त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या या हेलकाव्याला ‘आंदोलित गती’ असे म्हणतात.

इ) वर्तुळाकार गती

उत्तर :

i) वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात.

ii) उदा. घड्याळाचे काटे वर्तुळाकार फिरतात. त्याचप्रमाणे पंखा, आकाशपाळणा, मेरी गो राउंड वर्तुळाकार मार्गाने त्यांची एक फेरी पूर्ण करतात. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या गतीला ‘वर्तुळाकार गती’ म्हणतात.

ई) यादृच्छिक गती

उत्तर :

i) ज्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला ‘यादृच्छिक गती म्हणतात.

ii) उदा. बागेतील फुलपाखरांच्या मागे धावतांना मुले एका निश्चित मार्गावरून किंवा एकाच दिशेने धावत नाही. फुटबॉलच्या खेळातील खेळाडुंची गतीसुद्धा याच प्रकारची असते.

उ) नियतकालिक गती

उत्तर :

i) ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठरावीक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते, त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात.

ii) उदा. काही वस्तू या ठरावीक कालावधीत एक फेरी किंवा एक आंदोलन पूर्ण करतात. जसे घड्याळाचा मिनिट काटा बरोबर 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो. वस्तुंमधील या गतीला ‘नियतकालिक गती’ म्हणतात.

5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ) आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये कोणत्या प्रकारच्या गती दिसतात ?

उत्तर :

आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या हालचालींमध्ये i)आंदोलित गती ii) यादृच्छिक गती iii) रेषीय गती दिसते.

आ) रस्त्यावरून सायकल चालवतांना तुम्हांला कोणकोणत्या गतींचा अनुभव येतो.

उत्तर :

i) रस्त्यावरून सायकल चालवतांना सुरुवातीला सायकलचा पॅडल मारावा लागतो. त्यावेळी वर्तुळाकार गतीचा अनुभव येतो.

ii) सायकलने प्रवास करतांना दिशा निश्चित करून प्रवास करावा लागतो. तेव्हा प्रवासाच्या दिशेने रेषीय गतीत सायकल चालवावी लागते.

iii) कधी कधी सायकल कमी-जास्त वेगात चालवितो तेव्हा रेषीय असमान गतीचा अनुभव येतो.

iv) काही वेळा मुले एकाच ठिकाणी वर्तुळाकार सायकल फिरवतात तेव्हा आंदोलित गतीचा अनुभव असतो.

6. खालील कोडे सोडवा.

1) घड्याळातील काट्यांची गती

2) झाडावरून पडणाऱ्या फळांची गती

3) गोफणीची गती

4) मैदानावर खेळणाऱ्या मुलांची गती

उत्तर :

Leave a Comment