आपली अस्थिसंस्था व त्वचा स्वाध्याय
आपली अस्थिसंस्था व त्वचा स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ. ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात, त्या जोडणीला ………………. म्हणतात.
उत्तर :
ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात, त्या जोडणीला सांधा म्हणतात.
आ. बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत ………………. नावाचे रंगद्रव्य असते.
उत्तर :
बाह्यत्वचेच्या थरांमधील पेशींत मेलॅनिग नावाचे रंगद्रव्य असते.
इ. मानवी त्वचेचे ………………… व ……………….. हे दोन थर आहेत.
उत्तर :
मानवी त्वचेचे बाह्यत्वचा व अंतत्वचा हे दोन थर आहेत.
ई. मानवी अस्थिसंस्था ………………….. भागात विभागली जाते.
उत्तर :
मानवी अस्थिसंस्था दोन भागात विभागली जाते.
2. सांगा की कोणाशी जोडी लावू ?
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1. उखळीचा सांधा 2. बिजगिरीचा सांधा 3. सरकता सांधा | अ. गुडघा ब. मनगट क. खांदा |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1. उखळीचा सांधा 2. बिजगिरीचा सांधा 3. सरकता सांधा | क. खांदा अ. गुडघा ब. मनगट |
3. चूक की बरोबर ते लिहा. जर वाक्य चुकीचे असेल, तर दुरुस्त करून लिहा.
अ. हाडांची रचना मऊ/मृदू असते.
उत्तर :
चूक. हाडांची रचना कठीण असते.
ब. मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतरेद्रियांचे रक्षण करते.
उत्तर :
बरोबर
4. योग्य त्या ठिकाणी ✓ अशी खूण करा.
अ. शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे ………….
उत्सर्जन संस्था
श्वसन संस्था
अस्थिसंस्था ✓
रक्ताभिसरण संस्था
आ. पायांची व हातांची बोटे यांत ……………….. प्रकारचा सांधा असतो.
बिजगीरीचा सांधा
उखळीचा सांधा
अचल सांधा
सरकता सांधा ✓
5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
अ. तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्ये करते ?
उत्तर :
i) शरीराच्या अंतरंगाचे जसे स्नायू, हाडे, इंद्रियसंस्था इत्यादींचे रक्षण करते.
ii) शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यात मदत करणे,
iii) ‘ड’ जीवनसत्त्वाची निर्मिती करणे.
iv) शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.
v) उष्णता, थंडी यांपासून संरक्षण करते.
vi) त्वचा स्पर्शेद्रिय म्हणून कार्य करते.
आ. तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?
उत्तर :
i) हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी रोज नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
ii) रोज दैनंदिन जीवनातील कामे नियमितपणे केली पाहिजे.
iii) रोज संतुलित आहार घ्यावा. कॅल्शिअमयुक्त व दुग्धजन्य पदार्थाचा आहारात समावेश असावा.
इ. मानवी अस्थिसंस्थेची कार्ये कोणती ?
उत्तर :
i) शरीराचे व शरीरातील इंद्रियांचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था करते.
ii) हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो.
iii) अस्थिसंस्थेमुळे शरीराची हालचाल होण्यास मदत होते. तसेच हाडांमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरसचा साठा करण्यास मदत करते.
ई. आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा.
उत्तर :
i) कधी कधी खेळतांना पडणे.
ii) अपघातात हाताचे किंवा पायाचे हाड मोडते.
iii) गाडीवरून पडणे.
iv) पाय घसरून पडणे.
v) सायकल चालवतांना किंवा गाडी चालवितांना पडणे.
vi) म्हातारपणी हाडे कमकुवत झाल्याने ती मोडण्याची शक्यता जास्त असते.
उ. हाडांचे प्रकार किती व कोणते ?
उत्तर :
हाडांचे चार प्रकार आहेत.
i) चपटी हाडे.
ii) लहान हाडे
iii) अनियमित हाडे
iv) लांब हाडे.
6. काय होईल ते सांगा.
अ. जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले, तर ?
उत्तर :
ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात. सांधे नसले तर हाडांची हालचाल होणार नाही. शरीराचे भाग वाकवता किंवा फिरवता येणार नाही. हाडांची साधे नसेल तर हाडे एकमेकांशी जोडली जाणार नाही.
आ. आपल्या त्वचेमध्ये ‘मेलॅनिन’ नावाचे रंगद्रव्यच नसले, तर ?
उत्तर :
जर त्वचेमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य नसते तर त्वचेचा गोरेपणा – काळेपणा ठरला नसता. त्वचेचे व आतील भागांचे अतिनिल किरणांपासून संरक्षण झाले नसते. मेलॅनिन रंगद्रव्य नसते तर केसांचा रंग सुद्धा ठरला नसता.
इ. आपल्या शरीरातील मणक्याच्या 33 हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते, तर ?
उत्तर :
शरीरातील मणक्याच्या 33 हाडांच्या साखळीला पाठीचा कणा म्हणतात, एकच सलग हाड असते तर मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण झाले नसते आणि शरीरातील लवचिकता नसती आणि आपले शरीर वाकवता आले नसते. डोक्यापासून पाठीपर्यत हालचाल करता आली नसती आणि शरीर पण वाकवता आले नसते.
7. आकृती काढा.
अ. सांध्यांचे विविध प्रकार
उत्तर :
आ. त्वचेची रचना
उत्तर :