सफर मेट्रोची स्वाध्याय

सफर मेट्रोची स्वाध्याय

सफर मेट्रोची स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते ?

उत्तर :

मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. नंतर खूप कठीण अशी चाचणी परीक्षा पास व्हावे लागते. यानंतर मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते. मग मुलाखत घेतली जाते. मुलाखतीत निवड झाल्यावर मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. मेट्रो पायलट होण्यासाठी या सर्व टप्प्यातून जावे लागते.

आ) पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती ?

उत्तर :

पहिल्यांदा मेट्रो चालवताना ‘मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही?” अशी रुपालीच्या मनात थोडी धाकधूक होती. पण तिने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली.

इ) मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता ?

उत्तर :

मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती. रेल्वेपेक्षा मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होती. या सर्वांना मेट्रोमधून घेऊन घेऊन जायचे होते आणि तेही रुपालीला ! म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता.

प्रश्न. 2. मेट्रोबाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा.

अ) केबिन

उत्तर :

पायलटसाठी बंद केबिन असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते.

आ) कॅमेरे

उत्तर :

डब्यात व स्टेशनवर सी.सी. टीव्ही. कॅमेरे लावलेले असतात.

इ) मेट्रोचा प्रवास

उत्तर :

पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो. बोगद्यातून जाताना जगाशी तुटल्यासारखा भासतो.

ई) जिने

उत्तर :

प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात.

उ) दरवाजे

उत्तर :

मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात. मात्र ते आपोआप बंद होत नाहीत. ते पायलटला बंद करावे लागतात.

ऊ) प्रवासी संख्या

उत्तर :

मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात.

ए) इंजिन

उत्तर :

मेट्रोला लोकलप्रमाणेच दोन्ही बाजूंना इंजिन असते.

ऐ) तिकीट

उत्तर :

मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते. टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट. रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते.

प्रश्न. 3. खालील आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 4. मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा.

उत्तर :

मेट्रो म्हणेल, “बघा मुलांनो, मी विज्ञानाची देण आहे. माझ्यामुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी व सुखकारक होतो. पावसाळ्यात उड्डाण पुलावरून माझ्यामधून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल. मुलांनो, तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा, अशी माझी इच्छा आहे.”

प्रश्न. 5. तुम्हांला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल ? का ते सांगा.

उत्तर :

आम्हांला मोठे झाल्यावर मोटरकार चालवायला आवडेल. कारण कारमध्ये माझे कुटुंब बसलेले असेल. माझे कार चालवण्याचे कौशल्य पाहून त्यांना समाधान तर वाटेलच पण माझा अभिमानही वाटेल. शिवाय मला त्यांची सेवाही करता येईल. एक दीड तास झाला की कार चहाच्या टपरीजवळ थांबवता येईल. आवश्यकतेप्रमाणे कार कुठेही थांबवू शकेन. डोंगरावरचा सूर्यास्त त्यांना खाली उतरवून दाखवू शकेन. कौटुंबिक सहलीचा आनंद फक्त कारमध्येच मिळू शकतो. म्हणून मला मोठे झाल्यावर कार चालवायला आवडेल.

प्रश्न. 6. तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.

उत्तर :

i) इतर उद्योग सोडून आपण हा धंदा का स्वीकारला ?

ii) तुमच्या घरी कोणकोण आहेत ?

iii) उच्च शिक्षण का घेतले नाही ?

iv) वडिलांचा व्यवसाय कोणता होता ?

v) तुमची मुले काय करतात ?

vi) तुमचे राहणे कुठे आहे ?

vii) तुमचे वय किती आहे ?

viii) तुम्ही हे काम केव्हा पाहून करता ?

ix) तुम्ही जेवण केव्हा घेता ? कारण दिवसभर रिक्षा चालवता.

x) एवढे परिश्रम करून तुम्हाला मिळकत किती होते ?

आपण समजून घेऊया

पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा.

वाक्यकर्ताकर्मक्रियापद
1. तेजवंत फुटबॉल खेळतो.
2. शिक्षक कविता गातात.
3. निशा निबंध लिहिते.
4. जोसेफ रस्त्यात पडला.
5. दादा घरी आला.
6. सुरेश उद्या पुण्याला जाईल.

उत्तर :

वाक्यकर्ताकर्मक्रियापद
1. तेजवंत फुटबॉल खेळतो. तेजवंतफुटबॉलखेळतो
2. शिक्षक कविता गातात. शिक्षककवितागातात
3. निशा निबंध लिहिते. निशानिबंधलिहिते
4. जोसेफ रस्त्यात पडला. जोसेफ…..पडला
5. दादा घरी आला. दादा…..आला
6. सुरेश उद्या पुण्याला जाईल. सुरेश…..जाईल

Leave a Comment