पाड्यावरचा चहा स्वाध्याय

पाड्यावरचा चहा स्वाध्याय

पाड्यावरचा चहा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

पाड्यावरचा चहा या पाठावरती MCQ टेस्ट द्यायची असे तर पुढील लिंक वरती क्लिक करा.

https://swadhyaybooks.com/2025/01/padyavarcha_chaha_prashn_uttar/

प्रश्न. 1. पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा.

अ) खोपटे वसण्याचे ठिकाण –

उत्तर :

पाडा, साधारण उंच वाट्यावर झाडांच्या सावलीत

आ) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य –

उत्तर :

फार कमी लाकडे, कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्या, पळसाची पाने, पेंढा

इ) दारे, खिडक्या व छप्पर –

उत्तर :

एकच दार, कारव्या किंवा कामट्या मोडल्या की खिडकी, घरावर पेंढा किंवा पळसाची पाने यांचे छप्पर, कवचित कौलारू छप्पर.

ई) दालन –

उत्तर :

बहुतेक घरे एकदालनी

प्रश्न. 2. पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा.

अ) माची –

उत्तर :

लहान टेबलासारखी असते. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवली जाते.

आ) लहान लहान खड्डे –

उत्तर :

यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले असते.

इ) सरावलेला ओटा –

उत्तर :

याचा उपयोग माणसांना बसवण्यासाठी.

प्रश्न. 3. आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 4. कारणे लिहा.

अ) लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले, कारण …………….

उत्तर :

तिची ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल होती.

आ) लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण…………….

उत्तर :

मुलांकरवी निरोप पाठवूनही बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना. भूक व तहान तीव्रतेने भासू लागली होती.

प्रश्न. 5. लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा.

उत्तर :

प्रश्न. 6. पाठाच्या आधारे लिहा.

अ) चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.

उत्तर :

वारली लोकांना जेवण कसे तयार करायचे हे माहीत होते पण चहा कसा करायचा हे माहीत नव्हते. जेवणाची सामुग्री त्यांच्या घरात होती पण चहासाठी लागणारे साहित्य कोणाच्याही घरात नव्हते. त्यांच्याकडे साखर नव्हती. कारण त्यांना साखरेची जरुरच नसे. चहाची पावडरही नव्हती. ती त्यांना तीन मैल लांब असलेल्या दुकानातून आणावी लागणार होती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण होते. यामुळे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते.

आ) तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चाह करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

आमच्या घरी चहा करण्याची पद्धत अशी, किती कप चहा बनवायचा आहे, त्या प्रमाणात भांड्यात पाणी घेणे. भांडे गॅसच्या शेगडीवर ठेवणे. गॅस सुरू करणे. त्यात विशिष्ट प्रमाणात चहाची पूड व साखर टाकणे. पाण्याला उकळी फुटू देणे, नंतर महशीचे दूध त्यात टाकणे, चहाला उकळी फुटू देणे. वारली लोकांत चहासाठी पाणी, दूध, साखर किंवा गूळ आणि दूध यात काहीच प्रमाण नसते. पातेल्यात पाणी भरून पातेले चुलीवर ठेवतात. असेल तेवढा गूळ व चहाची भुकटी टाकतात. नंतर द्रोणात आणलेले दूध त्याच्यात ओततात. पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळखळा उकळतात.

खेळूया शब्दांशी

अ) जोड्या लावा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) ब्रह्मांड आठवणे अ) कायमची गरिबी असणे.
2) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. आ) शांत पडून राहणे.
3) निपचित पडणे. इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता
4) हुरहुर वाटणे. ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) ब्रह्मांड आठवणे ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.
2) अठरा विश्वे दारिद्र्य असणे. अ) कायमची गरिबी असणे.
3) निपचित पडणे. आ) शांत पडून राहणे.
4) हुरहुर वाटणे. इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता.

आ) खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा – गडगडाट

अ) कोंबड्यांचा

उत्तर :

कोंबड्यांचा – कलकलाट

आ) पाखरांचा –

उत्तर :

पाखरांचा – चिवचिवाट

इ) पाण्याचा –

उत्तर :

पाण्याचा – खळखळाट

इ) खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

अ) गैरहजर X

उत्तर :

गैरहजर X हजर

आ) उंच X

उत्तर:

उंच X ठेंगणी

इ) भरभर X

उत्तर :

भरभर X हळूहळू

ई) अदृश्य X

उत्तर :

अदृश्य X दृश्य

उ) उशिरा X

उत्तर :

उशिरा X लवकर

आपण समजून घेऊया

1) उपमा अलंकार

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी |

अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय –

उत्तर :

तुझा रंग

आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान –

उत्तर :

पावसाळी नभ

इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म –

उत्तर :

सावळेपणा

ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द –

उत्तर :

परी

2) उत्पेक्षा अलंकार

खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा.

हा आंबा म्हणजे जणू सारखच !

अ) प्रस्तुत वाक्यातील उपमेय –

उत्तर :

आंबा

आ) प्रस्तुत वाक्यातील उपमान –

उत्तर :

साखर

इ) प्रस्तुत वाक्यातील समान धर्म –

उत्तर :

गोडी

ई) प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द –

उत्तर :

जणू

खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.

वाक्य उपमेय उपमानसाम्यवाचक शब्द
अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.
आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.
इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.
ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

उत्तर :

वाक्य उपमेय उपमानसाम्यवाचक शब्द
अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. आईचे प्रेम सागर जणू
आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे. तुझी माया आभाळ गत
इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. अक्षर मोती सारखे
ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. गुलाबी उषापरमेश्वराचे प्रेम जणू

Leave a Comment