ग्रामीण स्थानिक शासन संस्था स्वाध्याय

ग्रामीण स्थानिक शासन संस्था स्वाध्याय

ग्रामीण स्थानिक शासन संस्था स्वाध्याय इयत्ता सहावी नागरिकशास्त्र

1. योग्य पर्यायासमोर (✓) अशी खूण करा.

1) प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार…………..करते.

ग्रापंचायत ✓

पंचायत समिती

जिल्हा परिषद

2) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान …………….. सभा होणे बंधनकारक असते.

चार

पाच

सहा ✓

3) महाराष्ट्रात सध्या …………….. जिल्हे आहेत.

34

35

36 ✓

2. यादी तयार करा.

पंचायत समितीची कामे

उत्तर :

i) रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका तयार करणे.

ii) सार्वजनिक आरोग्याच्या सोई करणे. रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध करून देणे.

iii) जलसिंचनाच्या सोयी व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.

iv) रस्त्यांची स्वच्छता ठेवणे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे.

v) शेती व पशुधन सुधारण्यासाठी मदत करणे.

vi) प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे.

vii) हस्तोद्योग व कुटीरोद्योगांना प्रोत्साहन देणे.

viii) दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.

ix) समाज कल्याणच्या विविध योजना राबवणे.

x) गावागावांना जोडणाऱ्या वस्त्यांची दुरुस्ती करणे.

3. तुम्हांला काय वाटते ते सांगा.

1) ग्रामपंचायत विविध कर आकारते.

उत्तर :

कारण – i) गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे.

ii) हा पैसा उभारण्यासाठी ग्रामपंचायत विविध करांची आकारणी करते.

2) महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे.

उत्तर :

कारण – i) महाराष्ट्रातील मुंबई (शहर) जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी जिल्हापरिषदा नाहीत.

ii) महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. अर्थात महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे.

4. तक्ता पूर्ण करा.

माझा तालुका, माझी पंचायत समिती

1) तालुक्याचे नाव……………

उत्तर :

उमरी

2) पंचायत समिती सभापतीचे ……………

उत्तर :

श्री. प्रशांत बांगरे

3) पंचायत समिती उपसभापतीचे नाव …………….

उत्तर :

श्री. किशोर साहारे

4) गटविकास अधिकाऱ्याचे नाव……………..

उत्तर :

श्री. सुशील राऊत

5) गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव…………….

उत्तर :

श्री. प्रकाश रोकडे

5. थोडक्यात माहिती लिहा.

1) सरपंच

उत्तर :

i) ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. म्हणून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात.

ii) ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात.

iii) गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते.

iv) योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो.

v) जेव्हा सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो.

2) मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर :

i) जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो.

ii) या अधिकाऱ्याची नेमणूक राज्यशासन करते.

iii) मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवकाची नेमणूक करतो.

Leave a Comment