गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.
उत्तर :
गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.