वसंतहृदय चैत्र स्वाध्याय
वसंत हृदय चैत्र स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी
1) पाठाच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा.
वैशिष्ट्ये | झाडाचे /वेलीचे नाव |
---|---|
अ) निळसर फुलांचे तुरे | |
आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी | |
इ) गुलाबी गेंद | |
ई) कडवट उग्र वास | |
उ) दुरंगी फुले | |
ऊ) तीन पाकळ्यांचे फूल | |
ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे |
उत्तर :
वैशिष्ट्ये | झाडाचे /वेलीचे नाव |
---|---|
अ) निळसर फुलांचे तुरे | कडुनिंब |
आ) गुलाबी रंगांची कोवळी पालवी | पिंपळ |
इ) गुलाबी गेंद | मधुमालती |
ई) कडवट उग्र वास | घाणेरी |
उ) दुरंगी फुले | घाणेरी |
ऊ) तीन पाकळ्यांचे फूल | नारळ |
ए) पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळे | फणस |
2) खालील संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
1) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे.
उत्तर :
फाल्गुन, चैत्र व वैशाख हे तीन महिने वसंत ऋतूत येतात. पण त्यातही चैत्र हाच महिना वसंतऋतूचा आत्मा आहे. तो गोड महिना आहे.
2) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
उत्तर :
चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची, वाटोळी, पसरट गोल अशी विविध प्रकारची घरटी बांधतात. त्यांचा आकार स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह असा वाटत असतो. ते पक्ष्यांच्या विरामाचे स्थान असते. म्हणून लेखिका म्हणते की ही काळीकबरी घरटी चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात.
3) योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) लांबलचक देठ | अ) माडाच्या लोंब्या |
2) अर्धवर्तुळ पांढरी टोपी | आ) कैऱ्याचे गोळे |
3) भुरभुरणारे जावळ | इ) करंजाची कळी |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) लांबलचक देठ | आ) कैऱ्याचे गोळे |
2) अर्धवर्तुळ पांढरी टोपी | इ) करंजाची कळी |
3) भुरभुरणारे जावळ | अ) माडाच्या लोंब्या |
4) खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द | अर्थ |
---|---|
निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
निर्गध | ………………. |
निर्वात | …………………. |
निगर्वी | …………………. |
नि:स्वार्थी | …………………. |
उत्तर :
शब्द | अर्थ |
---|---|
निष्पर्ण | पाने निघून गेलेला |
निर्गध | वास निघून गेलेला |
निर्वात | वारा नसलेला |
निगर्वी | गर्व नसलेला |
नि:स्वार्थी | स्वार्थ नसलेला |
5) खालील वाक्यांत योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(रुंजी घालणे, कुचेष्टा करणे, पेव फुटणे, व्यथित होणे)
अ) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
उत्तर :
लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.
आ) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
उत्तर :
रुंजी घालत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
इ) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
उत्तर :
मोठ्या माणसांची कुचेष्टा करणे हा सुद्धा अपराधच.
ई) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
उत्तर :
सध्या घरामध्ये उंदरांची पेव पुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
6) खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.
शब्द | प्रत्यय | त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द |
---|---|---|
1) अतुलनीय | ……………. | ……………. |
2) प्रादेशिक | ……………. | ……………. |
3) गुळगुळीत | ……………. | ……………. |
4) अणकुचीदार | ……………. | ……………. |
उत्तर :
शब्द | प्रत्यय | त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द |
---|---|---|
1) अतुलनीय | ईय | प्रशंसनीय |
2) प्रादेशिक | इक | भौगोलिक |
3) गुळगुळीत | ईत | मिळमिळीत |
4) अणकुचीदार | दार | दाणेदार |
7) खालील वाक्यांतील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटींत लिहा.
अ) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते.
उत्तर :
विशेषनाम, सामान्यनाम
आ) अजय आजच मुंबईहून परत आला.
उत्तर :
विशेषनाम, विशेषनाम
इ) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते.
उत्तर :
विशेषनाम, भाववाचकनाम
ई) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे.
उत्तर :
विशेषनाम, भाववाचकनाम
8) खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.
जो आपल्या आनंदात सोबत असतो, दुःखात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडुन आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.
अ) कर्ण –
उत्तर :
कर्ण – कान
आ) सोबती –
उत्तर :
सोबती – मित्र
इ) मार्ग –
उत्तर :
मार्ग – वाट
ई) हर्ष –
उत्तर :
हर्ष – आनंद
9) स्वमत
अ) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
चैत्रातल्या पिंपळाची नवी पालवी हातात रेशमी पताका नाचवत उभी आहेत असे वाटते. ही गुलाबी पाने चमकतात तेव्हा सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते.
आ) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.
उत्तर :
वाक्य वाचताना आपण विरामचिन्हांच्या जागी थोडे थांबत असतो, विश्रांती घेत असतो. चैत्रात पक्षी लोंबत्या आकाराची, वाटोळी, पसरट गोल अशी विरामचिन्हांच्या आकाराची घरटी बांधत असतात आणि तेथे विश्रांती घेत असतात. म्हणजे घरट्यांचे विरामचिन्हांशी दिसणे व विश्रांती घेणे या दोन्ही गोष्टींचे विरामचिन्हाशी साम्य असते. म्हणून हे विधान सत्य आहे.
इ) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.
उत्तर :
आता जगातील ऋतूमानच बदलले आहे. उन्हाळ्यात पाऊस येतो, पावसाळ्यात नावापुरता पाऊस येतो, हिवाळ्यात गरमी होते. चैत्रपौर्णिमेला आम्ही मित्र रामटेकच्या गडमंदिराकडे सायकलने जायला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात जोरदार पाऊस झाला. आम्ही भिजलो, कुडकुडू लागलो. अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले. पाऊस रात्रभर सुरू होता. हीच माझी वसंत ऋतूशी निगडीत आठवण आहे. आता वसंत वसंत राहिला नाही.