माहेर स्वाध्याय

माहेर स्वाध्याय

माहेर स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे ?

उत्तर :

कवितेत ‘तापी’ नदीचा उल्लेख केलेला आहे.

आ) या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता ?

उत्तर :

ही नदी काठची चिकण माती आहे

इ) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे ?

उत्तर :

कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.

ई) कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे ?

उत्तर :

कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे.

प्रश्न. 2. काय ते लिहा.

अ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती ……………….

उत्तर :

चिकण माती

आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ ………………..

उत्तर :

सोजीचे

इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन …………………..

उत्तर :

रथ

प्रश्न. 3. चिमणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.

उत्तर :

चिकण मातीचा ओटा – ओट्यावर जाते मांडणे – जात्यावर सोजी दळणे – सोजीचे लाडू – लाडू शेल्यात बांधणे – भाऊराया येईल – रथ आणील – रथाला नंदी जुंपीन – रथातून माहेराला जाईल – दंगामस्ती करीन.

खेळूया शब्दांशी

‘नदी’ या शब्दातील ‘न’ या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना, वाचताना विसरला, तर ‘नदी’ हा वेगळा शब्द तयार होतो. या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो.

नंदी – नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा. त्यांतील शब्दांचे अर्थ सांगा.

उत्तर :

i) कंथा – गोधडी कथा – गोष्ट

ii) मंद – हळू मद – गर्व

iii) कंप – थरथरणे कप – चहा पिण्याचे स्थान

iv) दंगा – मस्ती दगा – फसवणूक

v) कुंडी – मातीचे भांडे कुडी – शरीर

vi) खोंड – तरुण बैल खोड – दोष, झाडाचा बुंधा

vii) गंड – गर्व गड – किल्ला

viii) जंग – लढाई जग – दुनिया

Leave a Comment