मानवाची वाटचाल स्वाध्याय
मानवाची वाटचाल स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) लॅटिन भाषेत ……………… या शब्दाचा अर्थ आहे मानव.
उत्तर :
लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव.
आ) शक्तिमान मानव प्रामुख्याने …………….. मध्ये वस्ती करत होता.
उत्तर :
शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहां मध्ये वस्ती करत होता.
2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) हातकुऱ्हाड कोणी बनवली ?
उत्तर :
ताठ कण्याच्या मानवाने हातकुऱ्हाड बनवली.
आ) आनुवंशिकता म्हणजे काय ?
उत्तर :
माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात, या बाबींना ‘आनुवंशिकता’ असे म्हणतात.
3. पुढील विधानांची कारणे लिहा.
अ) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.
उत्तर :
i) आफ्रिका खंडातून आशिया-युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही.
आ) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.
उत्तर :
i) बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते.
ii) त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती.
iii) त्याला लवचीक जीभही लाभली होती म्हणून.
4. पुढील शब्दकोडे सोडवा.
उत्तर :
आडवे शब्द
1. ताठ कण्याचा मानव xxxxx
उत्तर :
होमोइरेक्टस
2. ताठ कण्याच्या माणसाला xx निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते.
उत्तर :
अग्नी
3. शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले xxx.
उत्तर:
जर्मनी
7. बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे xx काढू लागला.
उत्तर :
चित्रे
9. xxxx म्हणजे बुद्धिमान.
उत्तर :
सेपियन
10. शक्तिमान मानवाने आपले हत्यारे xxx पासून बनवली.
उत्तर :
दगड
उभे शब्द
1. कुशल मानव xxxxx
उत्तर :
होमोहॅबिलिस
4. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा xxx या देशाच्या परिसरात मिळाला.
उत्तर :
केनिया
5. ताठ कण्याचा मानव xxxxx सारखी हत्यारे बनवत असे.
उत्तर :
हातकुऱ्हाड
6. बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये xxxx या नावाने ओळखले जाई.
उत्तर :
कोमॅनॉन
8. शक्तिमान मानव जुजबी आवाज काढून xxx साधत असावा.
उत्तर :
संवाद