आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय
आपणच सोडवू आपले प्रश्न स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक ………………… बनतात.
उत्तर :
समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात.
आ) परिसरातील ………………. ओळखणे, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे.
उत्तर :
परिसरातील गोष्ट ओळखणे, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे.
2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) सार्वजनिक समस्या म्हणजे काय ?
उत्तर :
आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यांना ‘सार्वजनिक समस्या’ असे म्हणतात.
आ) सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात ?
उत्तर :
सार्वजनिक समस्या सर्वाच्या प्रयत्नाने आणि सर्वाच्या सहभागातून सुटू शकतात.
इ) स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले ?
उत्तर :
संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेने महत्त्व पटवून दिले आहे.
3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) ‘ श्रमदानातून ग्रामसफाई’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तर :
एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परा विचाराने व सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते. गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे. अशा रितीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे.
आ) शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करतात येईल ?
उत्तर :
आपल्याला शांततेला पूरक वातावरण पुढील प्रकारे निर्माण करता येईल –
i) समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत.
ii) प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे.
iii) समाजातील विषमता कमी करून शोषण थांबले पाहिजे.
iv) सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे.
v) शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे.
4. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?
अ) वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे.
उत्तर :
वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्गप्रमुखाला पुढील मदत करीन –
i) एखादी सामुदायिक कती करण्याचे आवाहन करीन.
ii) गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगीन.
iii) दुसऱ्या शिक्षकांना बोलावून आणीन.
आ) गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत.
उत्तर :
i) शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्याना करीन.
ii) गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगीन.
इ) क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
उत्तर :
वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे, ते सांगीन. दोन्ही गटांची समजूत घालीन. वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगीन.