मुंग्यांच्या जगात स्वाध्याय
मुंग्यांच्या जगात स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते ?
उत्तर :
मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.
आ) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात ?
उत्तर :
अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात.
इ) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात ?
उत्तर :
स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.
प्रश्न. 2. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?
उत्तर :
कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात.
प्रश्न. 3. वाक्यात उपयोग करा.
i) माग काढणे
उत्तर :
वाक्य : चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले.
ii) सावध करणे
उत्तर :
वाक्य : कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले.
iii) फवारा सोडणे
उत्तर :
वाक्य : लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला.
iv) तत्पर असणे
उत्तर :
वाक्य : दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे.
v) पळ काढणे
उत्तर :
वाक्य : पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.
vi) दाह होणे
उत्तर :
वाक्य : जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो.
vii) हाणून पाडणे
उत्तर :
वाक्य : समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाडला.
प्रश्न. 4. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
अ) माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते ? त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो ?
उत्तर :
दंश करणारे कीटक : मच्छर (डास), खेकडा, विंचू
दंशाचा परिणाम : फोड येतो, जखम होते, माणसाच्या रक्तात विष भिनते.
आ) ‘अन्नसाखळी’ म्हणजे काय ? शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
एका सजीवावर दुसरा सजीव अन्नासाठी अवलंबून असतो. अन्नासाठी सजीव अशा रितीने परस्परांशी साखळीप्रमाणे जोडलेले असतात. म्हणजेच एकमेकांना खाऊन प्राणी आपले पोट भरतात. त्यास ‘अन्नसाखळी’ म्हणतात. छोटा प्राणी मोठ्या प्राण्याचे अन्न असतो.
उदा. माशीला बेडूक → बेडकाला साप → सापाला गरुड खातो.
ही अन्नसाखळी आहे.
इ) मुंग्यांप्रमाणे अन्नासाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राणी यांची नावे लिहा. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांतून माहिती मिळावा.
उत्तर :
अन्नसाठा करणारे कीटक : मधमाशी, मुंगी
अन्नसाठा न करणारे कीटक : माशी, झुरळ
अन्नसाठा करणारे प्राणी : उंट, माकड
अन्नसाठा न करणारे प्राणी : वाघ, हत्ती
प्रश्न. 5. या पाठात आलेले मुंग्यांचे कोणते गुण किंवा वैशिष्ट्ये तुम्हांला आवडली ते सांगा.
उत्तर :
मुंग्यांचे गुण : उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार
मुंग्यांची वैशिष्ट्ये : i) त्यांच्या अंगांत रासायनिक गंधकण असतात.
ii) त्यायोगे मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात.
iii) स्वत:चे व वसाहतीचे संरक्षण करण्यास मुंग्या तत्पर असतात.
iv) स्वत:च्या संरक्षणासाठी मुंग्या विषारी दंश करतात व आम्लाचा फवारा शत्रुवर सोडतात.
v) काही जातींच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते.
vi) मुंगी हा समाजप्रिय कीटक आहे.
प्रश्न. 6. मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा.
उत्तर :
कवितेचे नाव : मुंगी बाई मुंगी बाई काम करतेस फार
प्रश्न. 7. ‘मुंगी’ या शब्दाची वेगवेगळी रुपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखाद्या शब्दाची वेगवेगळी रुपे लिहा.
उत्तर :
i) मुंगी : मुंग्या, मुंग्यांच्या, मुंग्यांना, मुंगीला, मुंगीच्या, मुंग्यांनी, मुंग्यांचा.
ii) कीटक : कीटकाने, कीटकाला, कीटकांनी, कीटकास, कीटकाचा, कीटकांची.
खालील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा.
अ) बंडूची इजार चार बोटे लांब झाली.
उत्तर :
बंडू, इजार, बोटे
आ) आईने इजार एका कोनाड्यात फेकली.
उत्तर :
आई, इजार, कोनाडा
इ) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत.
उत्तर :
माणूस, मुंग्या
ई) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे.
उत्तर :
कविता, भारत, धावपटू
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी योग्य नामे घाला.
अ) ………………. माधवला म्हणाली.
उत्तर :
आई माधवला म्हणाली.
आ) आंब्याच्या झाडावर ………………. लटकत होत्या.
उत्तर :
आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या.
इ) घसरगुंडी खेळायला आम्ही ………………. गेलो.
उत्तर :
घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेलो.
ई) ……………….. विषय मला खूप आवडतो.
उत्तर :
मराठी विषय मला खूप आवडतो.
उ) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून ………………. मंत्रमुग्ध झाला.
उत्तर :
राष्ट्रपतींचे भाषण ऐकून अमित मंत्रमुग्ध झाला.
ऊ) महागाई वाढल्याने ………………. महागल्या.
उत्तर :
महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.