सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. सांगा, मी कोणाशी जोडी लावू ?

‘क’ गट ‘ब’ गट
अ. उभयचर
आ. पृष्ठवंशीय
इ. खवले असणारे
1. माकड
2. साप
3. बेडूक

उत्तर :

‘क’ गट ‘ब’ गट
अ. उभयचर
आ. पृष्ठवंशीय
इ. खवले असणारे
3. बेडूक
1. माकड
2. साप

2. आमच्यात वेगळा कोण ?

अ. बुरशी, भूछत्र, शेवंती, स्पायरोगायरा

उत्तर :

शेवंती

आ. आंबा, वड, ताड, हरभरा

उत्तर :

ताड

इ. द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद

उत्तर :

जास्वंद

ई. सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी

उत्तर :

वड

उ. पेरू, मुळा, गाजर, बीट

उत्तर :

पेरू

ऊ. हरीण, मासा, मानव, कृमी

उत्तर :

मासा

3. आमच्यात फरक काय आहे ?

अ. सपुष्प वनस्पती – अपुष्प वनस्पती

उत्तर :

सपुष्प वनस्पतीअपुष्प वनस्पती
i) ज्या वनस्पतींना फुले येतात, त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात.
ii) अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने हे अवयव असतात.
i) ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत, त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात.
ii) अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने अवयव असतातच असे नाही.

आ. वृक्ष – झुडूप

उत्तर :

वृक्षझुडूप
i) वृक्ष उंच वाढतात. त्यांचे खोड टणक व मजबूत असते.
ii) त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात.
iii) वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात.
i) झुडूप जमिनीलगत वाढतात. त्यांचे खोड जाड व टणक असते.
ii) जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात.
iii) वृक्षांच्या तुलनेत झुडूपांची उंची व आकार लहान असतो.

इ) पृष्ठवंशीय प्राणी – अपृष्ठवंशीय प्राणी

उत्तर :

पृष्ठवंशीय प्राणीअपृष्ठवंशीय प्राणी
i) पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय म्हणतात.
ii) साप, मानव, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत.
i) पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय म्हणतात.
ii) गोगलगाय, झुरळ, गांडूळ, अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत.

4. सत्य की असत्य ओळखा.

अ. गोगलगाय हा जलचर प्राणी आहे.

उत्तर :

असत्य

आ. उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात.

उत्तर :

सत्य

इ. पृष्ठवंशीय प्राण्यांत मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते.

उत्तर :

सत्य

ई. अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे.

उत्तर :

असत्य

5. दोन नावे लिहा.

अ. सपुष्प वनस्पती

उत्तर :

गुलाब, शेवंती, मोगरा, आंबा करवंद

आ. अपुष्प वनस्पती

उत्तर :

शेवाळ, नेचे

इ. वृक्ष

उत्तर :

वड, पिंपळ, आंबा, चिंच, साग

ई) झुडूप

उत्तर :

निवडुंग, कण्हेर, जास्वंद, कोरांटी

उ. वेल

उत्तर :

द्राक्ष, भोपळा, कलिंगड, मनिप्लांट

ऊ. वार्षिक वनस्पती

उत्तर :

ज्वारी, सूर्यफूल

ए. द्विवार्षिक वनस्पती

उत्तर :

गाजर, बीट

ऐ. बहुवार्षिक वनस्पती

उत्तर :

आंबा, गुलमोहर, फणस

6. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ. वनस्पतीचे अवयव कोणते ?

उत्तर :

मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे हे वनस्पतीचे अवयव आहेत.

आ. मुळांची कार्ये कोणती ?

उत्तर :

मुळांची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

i) माती घट्ट धरुन ठेवते.

ii) वनस्पतीला आधार देते.

iii) जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्त्वाचे शोषण व वहन करणे.

iv) गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते.

इ. सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे ?

उत्तर :

i) पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. त्यामुळे सजीवांमध्ये बऱ्याच प्रमाणात विविधता आढळून येते.

ii) ते ओळखता यावे आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करता यावा म्हणून सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे.

ई. सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात ?

उत्तर :

सजीवांचे वर्गीकरण करतांना i) सजीवांची पेशीनुसार रचना, आकार, उंची

ii) त्यांचे निरनिराळे अवयव

iii) सजीवांचा परस्परातील साम्य-भेद

iv) सजीवांमध्ये असणारी वैशिष्ट्ये

v) त्यांचा आधिवास इत्यादी निकष विचारात घेतले जातात.

उ. वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर :

i) वेलींचे खोड अतिशय लवचीक, मऊ व हिरवे असते. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते.

ii) काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात.

iii) मनिप्लांट सारख्या वेलीला तणाव असतात तर काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात.

ऊ. रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या.

उत्तर :

i) रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात.

ii) रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडुपांच्या तुलनेत अतिशय लवचीक व हिरवी असतात.

iii) रोपटी काही महिने ते दोन वर्षे जगतात. उदा. सदाफुली, तुळशी, मोगरा इत्यादी.

ए. प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल ?

उत्तर :

i) प्राण्यांचे वर्गीकरण करणारे निकष – पेशीरचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व त्यांचा अधिवास.

ii) वनस्पतींचे वर्गीकरण करणारे निकष – वनस्पतींच्या खोडांचे आकार व उंची, जीवनक्रम कालावधीनुसार व त्यांचा अधिवास

ऐ. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते ?

उत्तर :

i) काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक आवरण असते. उदा. कासव

ii) काही प्राण्यांच्या अंगावर खवले असतात.

iii) काही प्राणी वर्तणुकीतून स्वतःचे संरक्षण करून घेतात तर काही प्राण्यांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी निसर्गत: खास अवयव दिलेले असते. उदा. वाघ, सिंह यांना तीक्ष्ण दात, नखे आहेत.

7. आकृत्या काढा.

वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग दाखवा.

उत्तर :

Leave a Comment