एक होती समई स्वाध्याय

एक होती समई स्वाध्याय

एक होती समई स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. चौकटी पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 2. खालील घटनांचे परिणाम लिहा.

घटनापरिणाम
अ) अनुताईचे निधन.
आ) ताराबाईंनी अनुताईचे अश्रू पुसले.
इ) ताराबाईचे निधन.

उत्तर :

घटनापरिणाम
अ) अनुताईचे निधन.कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले.
आ) ताराबाईंनी अनुताईचे अश्रू पुसले.दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीने उभ्या राहिल्या.
इ) ताराबाईचे निधन.अनुताई बालशिक्षण केंद्राच्या संचालक झाल्या आणि त्यांनी या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले.

प्रश्न. कार्यक्षेत्र लिहा.

उत्तर :

प्रश्न. 4. का ते लिहा.

अ) शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.

उत्तर :

एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व अनुताईची कोसबाडच्या परिसरात केल्या. त्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिल.

आ) अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.

उत्तर :

रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं होती. शिवाय स्थितिशील समाजही त्यांच्या कार्यात वारंवार अडथळे आणत होता.

प्रश्न. 5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा.

i) भातुकलीचा खेळ

उत्तर :

लहान मुली संसाराचा लटका खेळ खेळतात आणि काही वेळानंतर ते खेळ मोडूनही टाकतात. त्याप्रमाणे एखादी गोष्ट सहज गंमत म्हणून करणे व नंतर ती मोडून टाकणे याला भातुकलीचा खेळ म्हणतात. अनुताईचा संसार अवघ्या सहा महिन्यातच मोडला. जसा भातुकलीचा खेळ मोडावा तसा.

ii) ज्ञानयज्ञ

उत्तर :

यज्ञ करणे हे धार्मिक दृष्टीने पुण्यकार्य असते आणि यज्ञाकरिता अनेक लोक जमतात. त्याप्रमाणे अनेक लोकांना ज्ञानदान करणे म्हणजे ज्ञानयज्ञ होय. अनुताईनी शिक्षण प्रसाराचे कार्य करतांना स्वतःच्या जीवनाची आहुती दिली. या त्यांच्या कार्याला ज्ञानयज्ञ म्हटले आहे.

iii) ज्ञानगंगा

उत्तर :

गंगा नदी पवित्र मानली जाते. तिच्यात स्नान करणारा पावन होतो. त्याप्रमाणेच ज्ञान पवित्र असून ज्ञान मिळवणे हे पवित्र कार्य होय. अनुताईनी समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी शिक्षणाचा प्रसार केला. या त्यांच्या कार्यालाच ज्ञानगंगा म्हटले जाते.

iv) पाऊलखुणा

उत्तर :

वाटेवरून जात असताना पावलांच्या खूणा उमटतात. त्यावरून तो कोणत्या वाटेने कुणीकडे गेला हे लक्षात येते. यावरून एखाद्याने विचार कोणत्या दिशेचे होते हे कळणे पाऊलखुणा होय. अनुताईनी शिक्षणाचा प्रसार करतांना जे काही केले त्यांच्या आठवणी म्हणजेच पाऊलखुणा होय. या त्यांच्या पाऊलखुणा जपून ठेवणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

प्रश्न. 6. खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.

उत्तर :

प्रश्न. 7. खाली दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

उदा. 1) सापेक्ष X निरपेक्ष 2) अनावृष्टी X अतिवृष्टी

1) अनाथ X

उत्तर :

अनाथ X सनाथ

2) दुश्चिन्ह X

उत्तर :

दुश्चिन्ह X सुचिन्ह

3) सुपीक X

उत्तर:

सुपीक X नापीक

एकमत X दुमत

4) पुरोगामी X

उत्तर :

पुरोगामी X प्रतिगामी

5) स्वदेशी X

उत्तर :

स्वदेशी X विदेशी

6) विजातीय X

उत्तर :

विजातीय X सजातीय

प्रश्न. 8. स्वमत

1) अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

समई जशी आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकते. त्याप्रमाणेच अनुताईनी कोसबाडचा परिसर ज्ञानाने उजळला व अज्ञानाचा अंधार नाहीसा केला. समई जशी शांतपणे प्रकाश देते तिचा झगमगाट नसतो. त्याचप्रमाणे अनुताईनी लोकांना ज्ञानप्रकाश दिला पण त्यात प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास नव्हता. अनुताईचे व्यक्तिमत्त्व समईसारखे होते. त्यांच्याजवळ डामडौल नव्हता. भपका नव्हता. त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या. मुलांवर रागावून त्यांना दम देऊन गप्प बसवणाऱ्या नव्हत्या. त्यांना आदिवासी मुलांबद्दल अमाप माया होती. त्यामुळे आदिवासी मुलांना अनुताईच्या सहवासात असतांना मायेची ऊब मिळे. अनुताईचा सहवास त्या मुलांना जणू समईचा प्रकाशच वाटे. समई जशी तिच्यातील तेल संपेपर्यंत जळतच राहते त्याप्रमाणे अनुताईही त्यांची प्राणज्योत विझेपर्यंत कार्यरत होत्या. या सर्व कारणांनी अनुताई वाघ यांना दिलेली समईची उपमा सार्थ ठरते.

2) ‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर :

हे विधान सर्वार्थाने अर्थपूर्ण आहे. समई देवाजवळ लावली जाते. घरात प्रकाश मिळावा म्हणून अन्य दिवे वापरतात. समई नव्हे. देवाजवळची, गाभाऱ्यातली समई सतत तेवती राहावी याची काळजी घेतली जाते. म्हणून सतत तेवणारी ती समई. समईमध्ये सातत्य सामावलेले आहे. समई संपूर्ण महाल किंवा मंदिरातला गाभारा उजळते, पण उजळते म्हणजे झगझगीत प्रकाश पसरवित नाही. तिचा मंद प्रकाश डोळ्यांना, मनाला शांत निवांत करणारा असतो. हा प्रकाश मर्यादित प्रमाणात राहावा, जणू हीच तिची वृत्ती असते. म्हणून ती संयमी वाटते. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उच्च उदात्त भावनेने भारलेला असतो. ही भावना माणसाला फार मोठे समाधान देते. असे समाधान देता येणे हे समईचे सामर्थ्य आहे. समई मध्येच न विझता सतत जळत असते. ती संयमी वृत्तीची असल्याने तिचा विजेप्रमाणे झगमगाट दिसत नाही आणि अंधाराला नष्ट करण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. म्हणून समई सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.

भाषाभ्यास

दृष्टांत अलंकार :

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा. चंदनाचे हात | पायही चंदन

तुका म्हणे तैसा | सज्जनापासून

पाहता अवगुण | मिळेचिना (संत तुकाराम)

1) संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टींची तुलना करतात ?

उत्तर :

चंदन आणि सज्जन

2) अ) चंदनाचा विशेष गुण –

उत्तर :

सर्वागाने सुगंधित असणे.

आ) संतांचा विशेष गुण –

उत्तर :

कोणताही अवगुण नसणे.

खालील ओळी वाचा व चौकटी पूर्ण करा.

लहानपणा देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |

ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||

1) संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात.

उत्तर :

लहानपण दे

2) रत्नासारखा थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो.

उत्तर :

अंकुशाचा मार

3) मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते.

उत्तर :

साखरेचा रवा.

4) संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात.

उत्तर :

मोठेपणापेक्षा लहानपणा श्रेष्ठ होय.

5) मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात.

उत्तर :

ऐरावताला अंकुशाचा मार मिळतो.

Leave a Comment