कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय

कीर्ती कठीयाचा दृष्टान्त स्वाध्याय इयत्ता नववी मराठी

प्रश्न. 1. कोणासं उद्देशून म्हटले आहे ते लिहा.

1) वानरेया –

उत्तर :

वानरेया – भटोबास

2) सर्वज्ञ –

उत्तर :

सर्वज्ञ – चक्रधरस्वामी

3) गोसावी –

उत्तर :

गोसावी – चक्रधरस्वामी

प्रश्न. 2. आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 3. प्रस्तुत दृष्टान्तातील उपदेश तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

‘कीर्ती कठीयाचा दृष्टान्त’ या पाठात म्हाइंभटानी दृष्टांताच्या माध्यमातून अतिशय सुंदर उपदेश दिला आहे. प्रत्येक मनुष्याचा जीव विकारात अडकलेला असतो. आपल्या अंगी असलेल्या चांगल्या-वाईट विकारांपासून कोणीही दूर नाही. केवळ वाईट विकारच गृहीत धरतो. परंतु चांगल्या गोष्टींचा गर्व देखील विकारच आहे. म्हणून आपले मन सर्व विकारांपासून अलिप्त ठेवले पाहिजे. आपल्या हातून चांगली कृती घडली की त्याची प्रशंसा सहज कोणीही करतो, म्हणून त्याचा अहंकार बाळगू नये. हा अहंकार म्हणजे विकार होय. सर्व विकारांपासून अलिप्त राहून मन शुद्ध ठेवणे हे खऱ्या वैराग्याचे लक्षण आहे. कीर्तिलाभासाठी केलेले कार्य हे श्रेष्ठ कार्य नसते, कारण त्यामुळे कीर्ती मिळत असली तरी परमेश्वर मिळत नाही.

प्रश्न. 4. पुढील शब्दांना प्रमाणभाषेतील शब्द सांगा.

उत्तर :

प्रश्न. 5. ‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर :

एक देवस्थानाची चाकरी करणारा गुरव होता. तो लोकांच्या स्तुतीने फुगून जाऊन देवस्थानाची अधिकाधिक सेवाशुश्रुशा करू लागला. स्तुती केली की ते काम अधिकाधिक करणे हा त्याचा गुण होता. या कार्यामुळे त्याला कीर्ती प्राप्त झाली पण त्यामुळेच त्याला परमेश्वरप्राप्ती झाली नाही. त्याचा गुण हाच अवगुण ठरला.

प्रश्न. 6. पाठातील दृष्टान्त वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा.

उत्तर :

एक क्रिकेटर होता. त्याला धावांचे शतक ठोकण्याची हौस होती. त्याने शतक ठोकले की लोक त्याची खूप प्रशंसा करीत. मग तो शतक ठोकण्यासाठी व त्याकरिता नाबाद राहण्यासाठी ओव्हरचे ओव्हर निर्धाव खेळत असे. परिणाम असा होई की त्याचे शतक होत असे पण त्यामुळेच चमू मात्र कमी चेंडूत जास्त धावा काढणे शक्य नसल्याने पराभूत होत असे त्याचे शतक म्हणजे त्याच्या चमूचा पराभव हे जणू ठरूनच गेलेले असे.

भाषाभ्यास

व्यतिरेक अलंकार :

खालील उदाहरण वाचा व समजून घ्या.

उदा., ‘अमृतहूनि गोड नाम तुझे देवा’

वरील उदाहरणातील

i) उपमेय –

उत्तर :

उपमेय – नाम

ii) उपमान –

उत्तर :

उपमान – अमृत

खालील उदाहरण अभ्यास व तक्ता पूर्ण करा.

तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतल |

पाणियाहूनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/ गुरू)चंद्र
पातळपणा

उत्तर :

उपमेय उपमान समान गुण
तू (परमेश्वर/ गुरू)माऊलीमायाळूपणा
तू (परमेश्वर/ गुरू)चंद्र शीतलता
तू (परमेश्वर/ गुरू)पाणी पातळपणा

Leave a Comment