नकाशाप्रमाण स्वाध्याय
नकाशाप्रमाण स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल
प्रश्न. 1. अ) खालील बाबींच्या नकाशांचे बृहद्प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.
i) इमारत ii) शाळा iii) भारत देश iv) चर्च v) मॉल vi) जगाचा नकाशा vii) बगिचा viii) दवाखाना ix) महाराष्ट्र राज्य x) रात्रीचे उत्तर आकाश
उत्तर :
आ) 1 सेमी = 100 मी व 1 सेमी = 100 किमी अशा प्रमाणाचे दोन नकाशे आहेत. यांपैकी बृहद्प्रमाणाचा नकाशा व लघुप्रमाणाचा नकाशा कोणता ते सकारण लिहा. या नकाशांचे प्रकार ओळखा.
उत्तर :
i) 1 सेमी = 100 मी हे बृहद्प्रमाणाच्या नकाशाचे प्रमाण आहे. कारण जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त व्यापतो ते बृहद्प्रमाण नकाशे असतात. म्हणजेच लहान प्रमाण असलेले नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. गाव, शेत, शहर, शाळा, नगर ही बृहद्प्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत.
ii) 1 सेमी = 100 किमी हे लघुप्रमाण नकाशा प्रमाण आहे. कारण जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते लघुप्रमाण नकाशे असतात. म्हणजेच एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती दाखविण्यासाठी लहान प्रमाण वापरुन लघुप्रमाण नकाशे तयार केले जातात. नकाशासंग्रहातील नकाशे, जगाचा नकाशा, देशाचा नकाशा ही लघुप्रमाण नकाशाची उदाहरणे आहेत.
प्रश्न. 2. नकाशासंग्रहातील भारताच्या नकाशातून खालील शहरांमधील अंतर सरळरेषेत नकाशा प्रमाणाच्या साहाय्याने मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा.
शहरे | नकाशातील अंतर | प्रत्यक्ष अंतर |
---|---|---|
मुंबई ते बंगळुरू | 1000 किमी | 983.9 किमी |
विजयपुरा ते जयपूर | 1300 किमी | 1438 किमी |
हैदराबाद ते सुरत | 900 किमी | 982 किमी |
उज्जैन ते शिमला | 1100 किमी | 1195.1 किमी |
पटना ते रायपूर | 640 किमी | 771.6 किमी |
दिल्ली ते कोलकाता | 1520 किमी | 1491 किमी |
उत्तर :
1 सेमी = 200 सेमी
मुंबई ते बंगळूरू – 5 सेमी X 200 किमी = 1000 किमी
विजयपुरा ते जयपूर – 6.5 सेमी X 200 किमी = 1300 किमी
हैदराबाद ते सुरत – 4.5 सेमी X 200 किमी = 900 किमी
उज्जैन ते शिमला – 5.5 सेमी X 200 किमी = 1100 किमी
पटना ते रायपूर – 3.2 सेमी X 200 किमी = 640 सेमी
दिल्ली ते कोलकाता – 7.6 सेमी X 200 किमी = 1520 किमी
प्रश्न. 3. अ) जमिनीवरील अ व ब या दोन ठिकाणांमधील अंतर 500 मी आहे. हे अंतर कागदावर 2 सेमी रेषेने दाखवा. कोणतेही एक नकाशाप्रमाण काढा व हे नकाशाप्रमाण कोणते, ते शेजारी लिहा.
उत्तर :
2 सेमी = 500 मी ………………………. (शब्दप्रमाण)
1:500,00,000 ………………………. (संख्याप्रमाण)
आ) 1 सेमी = 53 किमी या शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रूपांतर करा.
उत्तर :
1 सेमी = 53 किमी या शब्दप्रमाणाचे अंकप्रमाण हे
1:53,00,000 आहे
इ) 1:100000 या अंकप्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात रूपांतर करा.
उत्तर :
1:1,00,000 या अंकप्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात 1 सेमी = 1 किमी असे आहे.
प्रश्न. 4. यांना मदत करा. त्यासाठी नकाशासंग्रहातील महाराष्ट्र राज्याचा रस्ते व लोहमार्ग नकाशा वापरा. नकाशातील प्रमाणाचा उपयोग करा.
अ) अजयला कौटुंबिक सहलीचे आयोजन करायचे आहे. बीड-औरंगाबाद-धुळे-नाशिक-मुंबई-पुणे-सोलापूर-बीड या मार्गातील पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या आहेत. गाडीला दर किमीला 12 रु. प्रवास भाडे आहे. तर एकूण प्रवासासाठी त्यांना अंदाजे किती खर्च येईल ?
उत्तर :
बीड ते औरंगाबाद अंतर – 127.6 किमी
औरंगाबाद ते धुळे अंतर – 149.2 किमी
धुळे ते नाशिक अंतर – 158.5 किमी
नाशिक व मुंबई अंतर – 167.3 किमी
मुंबई ते पुणे अंतर – 149.4 किमी
पुणे ते सोलापूर अंतर – 253.8 किमी
सोलापूर ते बीड अंतर – 182.2 किमी
एकूण अंतर – 1,188 किमी
अजयच्या कुटुंबाचा एकूण प्रवास = 1,188 किमीचा
1,188 किमी X 12 रु = 14,256 रु
एकूण प्रवासासाठी त्यांना अंदाजे रु 14,256 खर्च येईल.
आ) सलोनीला तिच्या वर्गशिक्षिकेने सहलीचे नियोजन करण्यास सुचवले आहे. सहलीसाठी तिने खालील ठिकाणे निवडली आहे.
बुलढाणा-औरंगाबाद-परभणी-हिंगोली-अकोला-बुलढाणा तर त्यांचा एकूण प्रवास किती किमी होईल ?
उत्तर :
बुलढाणा ते औरंगाबाद अंतर – 139.2 किमी
औरंगाबाद ते परभणी अंतर – 195.5 किमी
परभणी ते हिंगोली अंतर – 75.3 किमी
हिंगोली ते अकोला अंतर – 126.4 किमी
अकोला ते बुलढाणा अंतर – 99.1 किमी
एकूण अंतर – 635.5 किमी
सहलीसाठी त्यांचा एकूण प्रवास 635.5 किमी होईल.
इ) विश्वासरावांना अलिबागहून (जि. रायगड) नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्या मालवाहू गाडीमधून मालवाहतूक करायची आहे. त्यांना जाण्या-येण्यासह अंदाजे किती किमी अंतराचा प्रवास करावा लागेल ?
उत्तर :
अलिबाग ते नळदुर्ग अंतर 437.6 किमी इतके आहे.
जाणे – 437.6 किमी
येणे – 437.6 किमी
म्हणजेच जाणे व येणे यासाठी = 437.6 + 437.6
= 875.2 किमी
त्यांना जाण्या-येण्यासाठी अंदाजे 875.2 किमी अंतराचा प्रवास करावा लागेल.