परिसंस्था स्वाध्याय

परिसंस्था स्वाध्याय

परिसंस्था स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

प्रश्न. 1. खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

1) हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील ……………………. घटक होय.

(भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय)

उत्तर :

हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय.

2) परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे ……………….. परिसंस्थेची उदाहरणे आहे.

(भूतल, जलीय, कृत्रिम)

उत्तर :

परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे जलीय परिसंस्थेची उदाहरणे आहे.

3) परिसंस्थेमध्ये ‘मानव’ प्राणी …………………… गटात मोडतो.

(उत्पादक, भक्षक, विघटक)

उत्तर :

परिसंस्थेमध्ये ‘मानव’ प्राणी भक्षक गटात मोडतो.

प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा.

उत्पादकपरिसंस्था
1) निवडुंग
2) पाणवनस्पती
3) खारफुटी
4) पाईन
अ) जंगल
आ) खाडी
इ) जलीय
ई) वाळवटीय

उत्तर :

उत्पादकपरिसंस्था
1) निवडुंग
2) पाणवनस्पती
3) खारफुटी
4) पाईन
ई) वाळवटीय
इ) जलीय
आ) खाडी
अ) जंगल

प्रश्न. 3. माझ्याविषयी माहिती सांगा.

1) परिसंस्था

उत्तर :

i) पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक म्हणजे परिसंस्था होय.

ii) परिसंस्था ही संज्ञा ‘परि’ (भोवतालचे) हा उपसर्ग ‘संस्था’ या शब्दाला जोडून तयार झालेली आहे.

iii) परिसंस्थेत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती इत्यादी) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.

iv) परिसंस्थेत जे घटक असतात त्यांना एकत्रित राहण्यासाठी सक्षम अशी स्थिती असते आणि तिच्यात स्वयंविकासाची क्षमता असते. कोणत्याही परिसंस्थेत सजीव-सजीव-पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात.

v) त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो.

vi) काही परिसंस्था नैसर्गिक प्रदेशाएवढ्या विशाल तर काही परिसंस्था नदी, तळे, वने अशा लहान विस्ताराच्या असतात.

vii) परिसंस्थेतील विविध घटक परस्परांवर अवलंबून असतात. अन्न, निवारा, प्रजनन अशा उद्देशाने या घटकांत निरंतर आंतरक्रिया होत असते.

viii) परिसंस्था व त्यातील आंतरक्रिया कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह आणि पोषकद्रव्याचे चक्रीभवन या प्रक्रिया आवश्यक असतात.

2) बायोम्स

उत्तर :

i) पृथ्वीवरील काही भागांत बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात.

ii) त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना ‘बायोम्स’ असे म्हणतात.

iii) या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो.

iv) पृथ्वी सुद्धा एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर दोन मुख्य ‘बायोम्स’ आढळतात. अ) भू-परिसंस्था आ) जलीय परिसंस्था

3) अन्नजाळे

उत्तर :

i) परिसंस्थेतील स्वयंपोषक स्तरांकडून विविध प्रकारचे भक्ष्य आणि भक्षकाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण होते.

ii) या प्रकीयेद्वारे परिसंस्थांतील ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे जात असते.

iii) अन्नसाखळीतील सर्व सजीव अन्न आणि पर्यायाने ऊर्जा मिळविण्यासाठी परस्परांवर अवलंबून असतात. निसर्गात अशा अनेक अन्नसाखळ्या आहेत. त्या एकमेकांमध्ये गुंफल्या जाऊन अन्नजाळे तयार होते.

iv) म्हणजेच अन्नजाळे हे परिसंस्थेतील अनेक अन्नसाखळ्यांचे गुंतागुतीचे व अनेक शाखा असलेले जाळे होय.

प्रश्न. 4. शास्त्रीय करणे द्या.

1) परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात.

उत्तर :

कारण – i) परिसंस्थेतील वनस्पती या सूर्याच्या ऊर्जेच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करून स्वयंपोषी उत्पादक असतात.

ii) हरित वनस्पती आणि शैवाल हे प्रकाश संश्लेषणाद्वारे पर्यावरणीय असेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पोषक घटक स्वरूपात स्वत:चे अन्न तयार करतात. त्यांनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी ग्रहण करतात.

iii) त्यामुळे वनस्पती स्वत:चे अन्नाचे उत्पादन करीत असल्यामुळे वनस्पतींना उत्पादक किंवा स्वयंपोषी म्हणतात.

2) मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.

उत्तर :

कारण – i) धरण बांधणी करिता मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते.

ii) परिणामत: धरणबांधणीमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली येते.

iii) या कारणाने संबंधित भागातील जंगले व गवताळ प्रदेश हे जलीय परिसंस्थेत रूपांतरित होतात.

iv) याचबरोबर नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह धरणांमुळे कमी होतो. परिणामत: मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात.

3) दुधता जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

उत्तर :

कारण – i) दुधता जंगलात दीड शतकापूर्वी एकशिंगी गेंड्याची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

ii) तेथील अनिर्बध शिकारीमुळे विसाव्या शतकात गेंडा हा प्राणी तेथे नामशेष झाला. त्यामुळे तेथील परिसंस्था ढासळू नये म्हणून व त्याचा समतोल राखण्याच्या उद्देशाने दुधवा जंगलात गेंड्यांचे 1 एप्रिल 1984 रोजी पुनर्वसन करण्यात आले.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले ?

उत्तर :

लोकसंख्या वाढीचे परिसंस्थेवर होणारे विपरित पुढीलप्रमाणे आहेत.

i) परिसंस्थेमध्ये मानवप्राणी ‘भक्षक’ या गटात मोडतो.

ii) मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्यावाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला.

iii) जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थावर ताण वाढला.

iv) त्याचबरोबर टाकाऊ पदार्थाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले.

2) नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे का होतात ?

उत्तर :

i) जमीन, पाणी, खनिजसंपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा व मतभेदांतून युद्ध होते.

ii) युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉबवर्षाव सुरुंग स्फोट केले जातात.

iii) यामुळे जीवितहानी बरोबर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात.

iv) स्वार्थासाठी अशाप्रकारे आर्थिक व राजकीय नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी युद्धे होतात.

3) परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया स्पष्ट करा.

उत्तर :

i) परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटक यांची सतत आंतरक्रिया होत असते.

ii) परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटकांचा (हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता) त्यातील जैविक घटकांवर परिणाम होत असतो.

iii) एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते.

iv) सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात. किंवा उत्सर्जित करत असतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी-जास्त होत असते.

v) परिसंस्थेतील प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम होत असतो.

vi) परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला ‘निश’ म्हणतात.

vii) अशाप्रकारे परिसंस्थेत आंतरक्रिया घडून येते.

4) सदाहरित जंगले व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा.

उत्तर :

i) सदाहरित जंगले व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक म्हणजे गवताळ प्रदेशात झाडे व झुडुपे कमी असतात तर सदाहरित जंगलात विविध प्रकारची वृक्ष आढळतात.

ii) तसेच सदाहरित जंगलात गवताळ प्रदेशापेक्षा मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते.

प्रश्न. 6. खालील चित्रांचे वर्णन लिहा.

उत्तर :

अ) उष्ण वाळवंटातील परिसंस्था –

अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकूण राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे उष्णवाळवंटीय परिसंस्थेने एक जैविक वैशिष्ट्य आहे.

i) निवडुंग कुटुंबातील व त्या कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे सर्वत्र आढळतात.

ii) सरडा, साप यांसारखे सरपटणारे प्राणी आढळतात.

iii) उंदीर, खार यांसारखे कृदंत वर्गातील प्राणी आढळतात.

iv) गिघाडे व गुरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी आढळतात.

v) काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.

vi) मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.

vii) ऊंट हा प्राणी याच वातावरणात आढळतो.

आ) सदाहरित जंगलातील परिसंस्था –

सदाहरित जंगलामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळून येते. हरिताच्छादनामध्ये समुद्र, खाडी किंवा जलस्थानांचा परिसरामधील खारफुटीचाही समावेश होतो.

i) सदाहरित जंगलामध्ये आशीयाई हत्ती, बाघ, गेंडा अशा प्रकारचे प्राणी आढळतात.

ii) कॉनिफर्स, लाईव्ह, ओक, हाॅली, निलगिरी, बाभूळ, बॅक्सिया या प्रकारची वृक्षे आढळतात.

iii) तसेच मैना, पोपट, घुबड, धनचिडी, हिरवे कबूतर, वेडा राघू, सुतार याप्रकारचे पक्षी आढळतात.

iv) अनेक सरपटणारे प्राणी, कीटक सुद्धा या परिसंस्थेत मोठ्या प्रमाणावर आढळतात.

v) जलस्थल असल्याने ही परिसंस्था परिपूर्ण परिसंस्था मानली जाते. कारण यामध्ये सर्व प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती आढळतात.

Leave a Comment