चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय
चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी ………………….. व …………………. या संमिश्रांचा उपयोग केला जातो.
उत्तर :
औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी कोबाल्ट व निकेल या संमिश्रांचा उपयोग केला जातो.
2) चुंबकीय क्षेत्र ………………….. व …………………. यांमधून आरपार जाऊ शकते.
उत्तर :
चुंबकीय क्षेत्र पाणी व पुठ्ठा यांमधून आरपार जाऊ शकते.
3) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ………………… रेषांच्या साहाय्याने दर्शवतात.
उत्तर :
चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषा रेषांच्या साहाय्याने दर्शवतात.
4) चुंबकाची खरी कसोटी ………………….. ही आहे.
उत्तर :
चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे.
प्रश्न. 2. सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) होकायंत्र 2) कपाटाचे दार 3) प्रतिकर्षण 4) चुंबकीय ध्रुव | अ) सर्वाधिक चुंबकीय बल आ) सजातीय ध्रुव इ) चुंबक ई) सूचीचुंबक |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1) होकायंत्र 2) कपाटाचे दार 3) प्रतिकर्षण 4) चुंबकीय ध्रुव | ई) सूचीचुंबक इ) चुंबक आ) सजातीय ध्रुव अ) सर्वाधिक चुंबकीय बल |
प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) कृत्रिम चुंबक तयार करणाऱ्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा.
उत्तर :
कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोनपद्धती पुढीलप्रमाणे आहे.
i) ‘निपरमॅग’ हा चुंबक लोह, निकेल, अँल्युमिनीअम व टायटॅनिअम यांच्या संमिश्रणापासून बनवतात. तर ‘अल्निको’ हा चूंबक अँल्युमिनीअम निकेल व कोबाल्ट यांच्यापासून बनवतात.
ii) या दोन्ही पद्धतीत अँल्युमिनीअम व निकेल धातू सारखा आहे. परंतु पहिल्या पद्धतीत लोह व दुसऱ्या पद्धतीत कोबाल्ट हे दोन्ही धातू वेगवेगळे वापरले आहे.
2) विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थाचा उपयोग करता येतो ?
उत्तर :
विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खिळा, तांब्यांची तार, एक बॅटरी या पदार्थाचा उपयोग करता येतो.
3) टीप लिहा.
चुंबकीय क्षेत्र
उत्तर :
i) चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते, त्यास ‘चुंबकीय क्षेत्र’ म्हणतात.
ii) चुंबकाभोवतीचे हे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते.
iii) एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात, त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते.
iv) फॅरेडे या वैज्ञानिकाच्या मते, चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांवरून काढता येते.
v) चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतील, तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते, तर जेथे त्या एकवटलेल्या असतात, तेथील तीव्रता जास्त असते.
4) होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर का केला जातो ?
उत्तर :
i) होकायंत्र दिशादर्शक यंत्र आहे. त्याचा वापर दिशा निश्चित करण्यासाठी होतो.
ii) चुंबकीय सुई ही दक्षिणोत्तरच स्थिर होत असल्यामुळे दिशा ठरवताना त्यांचा उपयोग होतो. म्हणून होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर केला जातो.
5) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर :
एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात, त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते. मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो. या वरून दिशा दर्शवली जाते.
प्रश्न. 4. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशाप्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना त्यांना दिशा ओळखणे कठीण जायचे. त्यासाठी ते सोबत चुंबकीय सूची ठेवायचे. ती मुक्तपणे फिरवली की दक्षिणोत्तर दिशेस स्थिरावते. म्हणून दिशा ओळखण्यास त्यांना सोयीचे जायचे. अशाप्रकारे ते चुंबकाचा वापर करायचे.